भारतीय इतिहास -२२

भारतीय इतिहास

महाराणा प्रताप 
गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. प्रतापसिंह गुहिलोत ह्या नावाने हा राजस्थानात प्रसिद्ध आहे.
राणीचा जाहीरनामा (१८५८) 
राणीचा जाहीरनामा (१८५८) : अठराशे सत्तावनचा उठाव शमल्यानंतर हिंदुस्थानातील प्रजेला उद्देशून इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने काढलेला जाहीरनामा. १८५८ च्या गव्हर्मेंट ऑफ इंडिया या अधिनियमानुसार हा जाहीरनामा घोषित करण्यात आला.
रामचंद्रपंत अमात्य 
रामचंद्रपंत अमात्य : (सु. १६५०? – १७१६). शिवकाळातील एक मुत्सद्दी व राजनीतीवरील आज्ञापत्र या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता. त्याचा जन्म तत्कालीन सुशिक्षित ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याच्या जन्ममृत्यूंचे सन व तारखा यांबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही.
रामशास्त्री प्रभुणे 
रामशास्त्री प्रभुणे : ( ? –१७२० – १५ ऑक्टोबर१७८९). उत्तर पेशवाईतील प्रसिद्ध न्यायाधीश. त्यांचा जन्म साताऱ्याजवळच्या माहुली तीर्थक्षेत्रात ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील विश्वनाथ व आई पार्वतीबाई. ते रामशास्त्रींच्या बालपणीच वारले.
राष्ट्रकूट वंश 
राष्ट्रकूट वंश : भारतातील एक प्राचीन इतिहासप्रसिद्ध राजवंश. त्याची अधिसत्ता प्रामुख्याने महाराष्ट्र व त्यालगतच्या प्रदेशांवर इ.स. ७५३ ते ९७५ यांदरम्यान होती. राष्ट्रकूट हे एक प्राचीन अधिकारपद होते. राज्याच्या मोठ्या विभागाला राष्ट्र म्हणत. प्राचीन ताम्रपटांत ग्रामकूटांप्रमाणे राष्ट्रकूटांचा उल्लेख येतो. ग्रामाचा मुख्य तो ग्रामकूट व राष्ट्र या विभागाचा प्रशासक तो राष्ट्रकूट.
रो, सर टॉमस 
रो, सर टॉमस : (१ १५८१-६ नोव्हेंबर १६४४). एक इंग्रज मुत्सद्दी व भारतातील मोगल दरबारातील वकील. त्याचा जन्म लो लिटन (इसेक्स-इंग्लंड) येथे सधन कुटुंबात झाला. त्याच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याचे शिक्षण मॅग्डलन महाविद्यालयात (ऑक्सफर्ड) झाले.
रोहिले 
रोहिले : अयोध्या प्रांताच्या उत्तर-पश्चिमेस लागून हिमालयाच्या पायथ्याशी असलेला प्रदेश अठराव्या शतकात रोहिलखंड या नावाने संबोधला जात असे. हा प्रदेश अत्यंत सुपीक असून त्याचा विस्तार ३३,१४८ चौ. किमी. होता. या प्रदेशातील बव्हंशी प्रजा हिंदू असून राज्यकर्ते हे रोहिले म्हणजे पठाण, अफगाण इ. हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील लोक होते.
लतिफ, सय्यिद मुहम्मद 
लतिफ, सय्यिद मुहम्मद : ( ११८४७?-?). पंजाबमधील एक सनदी अधिकारी आणि इतिहासकार. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. त्याच्या जन्म मुस्लिम धर्माची पंरपरा असणाऱ्या सय्यिद उपज्ञातीतील कुटुंबात झाला. त्याला पारंपरिक धार्मिक शिक्षणाव्यतिरिक्त उदार शिक्षणही मिळाले.
लॅन्सडाउन, लॉर्ड हेन्री चार्ल्स कीथ पेटी-फिट्ससमॉरिस
लॅन्सडाउन, लॉर्ड हेन्री चार्ल्स कीथ पेटी-फिट्ससमॉरिस : (१४ जानेवारी १८४५ -३ जून १९२७). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील एक गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (१८८८-९४). त्याचा जन्म राजकारणाची परंपरा असलेल्या आयरिश सधन कुटुंबात लंडन येथे झाला.
लिअपोल्ड, दुसरा 
लिअपोल्ड, दुसरा : (९ एप्रिल १८३५-१७ डिसेंबर १९०९). बेल्जियमचा राजा पहिला लिअपोल्डचा हा लिअपोल्डचा हा मूलगा. जन्मस्थान ब्रूसेल्स (बेल्जियम) येथे. वयाच्या एकविसाव्या वर्षी तो गादीवर बसला. तत्पूर्वी याचे बेल्जियम व जर्मनीमध्ये लष्करी शिक्षण झाले होते.

Comments