संजय सोनवणी
- Get link
- X
- Other Apps
Showing posts with label आत्मचरित्र. Show all posts
Sunday, December 29, 2019
धनगर आणि मी
काय झालं, आम्हाला जळगांव जिल्ह्यात असतांना शाळेत रेव्हरंड टिळकांनी लिहिलेली एक प्रार्थना होती.
"मेंढपाळ हा प्रभु कधी ने हिरव्या कुरणी मला
कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला"
कधी मनोहर जलाशयावर घेऊनी मज चालला"
खरे तर मेंढपाळात प्रभु कसा असतो हे मला पहिली-दुसरीत समजणे शक्य नव्हते. तिसरीत आलो ते पार पुणे जिल्ह्यात आणि आमच्या वरुडे गांवाजवळच शिंगाडवाडी. तेथे धनगरांची वस्ती.
मेंढपाळ दिसला की मला ती प्रार्थना आठवे. धनगर मला प्रभुच वाटायचा. ती कोकरं, मेंढरं आणि त्यांच्यात हरवलेला धनगर पाहुन हरखुन जायला व्हायचं. धनगर हा प्रभु नसतो...ती वर्चस्वतावादी समाजाची एक रम्यात्मक कल्पना आहे हे मला समजायला वेळ लागला. असे असले तरी माझ्या कल्पनेतील धनगर हा सृजनाच्या महोत्सवाचा सर्जक वाटला.
धनगर समाजावर माझे अतोनात प्रेम आहे. मी धनगरांची बाजु लावून धरतो म्हणुन बहुतेक लोक मला धनगरच समजतात आणि चक्क "जातीयवादी"ही म्हणतात. मला त्यांची पर्वा नसते हे तर उघडच आहे. का मी एवढे प्रेम करतो? केवळ यशवंतराव होळकरांसारखे अद्वितीय पुरुष या समाजातुन आले म्हणुन की काय? केवळ धनगरांचा इतिहास हाच मानव जातीचा इतिहास आहे म्हणून की काय? ते खरे तर दुय्यम भाग आहेत. केवळ ते वंचित, शोषित आहेत म्हणुनही माझे त्यांच्यावर प्रेम नाही.
मी सर्वांवर प्रेम करतो पण धनगरांवर जास्त करतो हे वास्तव आहे. हा माझा दुजाभाव आहे असे अनेक मित्र मला म्हणतात पण मला तो दुजाभाव असला तरीही प्रिय आहे. याचे कारण एवढेच आहे की मला मानवतेच्या जेवढ्या खुणा येथे जतन केलेल्या दिसल्या त्या अन्य समाजांत त्या प्रमाणात नाही.
साधेपणा, भोळेपणा आणि केवळ माणुसकीची जाण यापोटी स्वत:चे नुकसान धनगर सहज करुन घेतो. निसर्गाशी आणि खुलेपणाशी त्याची जुळलेली नाळ आजही कायम आहे. या गोष्टी मला आवडलेल्या आहेत. पण त्याच वेळीस मुजोर समाज त्यांना दाबत त्यांच्या नैसर्गिक आशा-आकांक्षाची जेंव्हा गळचेपी करतो तेंव्हा मला संताप येतो.
धनगरांनी आपली मुल्ये कायम ठेवत आधुनिक जगातील विकासाचा केवळ भागीदार नव्हे तर नेतृत्व करावे असे मला वाटते. त्या नेतृत्वाचा त्यांच्याकडे चंद्रगुप्तापासुनचा इतिहास आहे.
आज अंधार आहे हे खरे असले तरी उजाडतच नाही असेही नसते. मग ते पुन्हा नेतृत्व करत मानवतेचा, समतेचा इतिहास पुन्हा रचु शकणार नाहीत असे नाही. आणि ही क्षमता धनगर समाजात आहे यावर माझा विश्वास आहे.
त्यांना कोणाचे उसणे नेतृत्व घेण्याची गरज नाही. फक्त इतिहास आणि क्षमता नव्याने समजावून घेणे गरजेचे आहे. ही सर्जकता नव्याने उफाळून येईल असे मला वाटते खरे.
Friday, November 3, 2017
मीच माझं आभाळ चोरलंय...

मी गेली साताठ वर्ष संगणकावर लेखन करतो. म्हणजे टायपतो. उजव्या हातालाच खिडकी आहे. मला खुले अवकाश फार आवडते. मी येथे रहायला आलो तेंव्हा या खिडकीपार कोणतीही इमारत नव्हती. आता एक उंचच उंच इमारत उभी राहतेय. माझं आभाळ चोरलं गेलय. खरं म्हणजे हाताने लिहायची मजा टायपण्यात नाही. मनात येणा-या विचारांचा धो-धो प्रवाह आणि या टायपण्याचा वेग काही केल्या मॅच होत नाही. हातातून सरळ मन झरतं, संगणकावर तसे होत नाही. पण माझं हस्ताक्षर इतकं भयंकर होऊन जातं त्या वेगात लिहितांना की आता ते बरोबर वाचून टायपणारे डीटीपीचे लोकही राहिले नाहीत. टायपतच लिहिणे भाग आहे. शिवाय प्रकाशकांपासून संपादकांची सोयही त्याने होते. पण माझं अवकाश संकुचित झालं आहे. मी हातानं जे लिहिलं असतं ते असं नक्कीच लिहिलं नसतं. हात कागदाशी बोलायचे. ते आता बंद झालं आहे. अनेकदा असं वाटतं, माझ्यातल्या लेखकाला मी छाटुन आधुनिकीकरणाच्या छोट्याशा पेटा-यात कोंबला आहे. मीच माझं आभाळ चोरलं आहे.
कसं आहे हे जग? पहायला मी खूप पाहिलं. म्हणजे भौतिक जग म्हणाल तर अर्धे जग तर नक्कीच. ते मनसोक्त भोगलेही. तरीही पाहिलं काय म्हणावं तर फार फार तर काही जागा सांगता आल्या, अनुभव सांगता आले तरी काहीही पाहिलं नाही हेही तेवढेच खरे. शरीराचा सांगाडा इकडून तिकडे हिंडला आणि सांगाडे पाहिले, अनुभवले, भोगले एवढेच. खरे तर जग पाहतांना मला जगाबद्दल समरस भावना कधीच जागली नाही. म्हणजे जणू काही मी या जगाचा हिस्सा नाहीच. अनेकदा मलाही याचे आश्चर्य वाटत आलेय की मी कोणा परग्रहावरून तर नाही ना आलोय? म्हणजे बघा, तुमची धिंड निघालीय. अट्टल गुन्हेगारासारख्या बेड्या तुमच्या हातात घालून, बेड्यातून दोरखंड ओवत काढून बैलांना जसे रांगेत मिरवले जाते तसे रस्त्याने अट्टल गुन्हेगारांबरोबर नेले जातेय. काय वाटेल तुम्हाला? मला काहीच वाटले नाही. धिंडीचे वास्तव लक्षात आले आणि माझ्या शरीरातून आत्मा जसा बाहेर पडला, जवळच्या इमारतीच्या कौलांवर, झाडांच्या शेंड्यांवर बसून मी जसजसा नेला जात होतो तसा बसत राहिला. मला पहात राहिला. जसे काही हे माझ्याशी होत नव्हतेच. अत्यंत निर्विकारपणे मी बाजारपेठेतुन मलाच जातांना पहात होतो. लोकांच्या कुत्सित नजरा, उपहास आणि करमणूक मी स्वत:च एन्जोय करत होतो. जेंव्हा परत आणतांना मात्र मागच्या दाराने बिनबेड्यांचे आणले गेले तेंव्हा तर मी चक्क हसत होतो. कोणावर हे नाही माहित मला पण हसलो खरा.
समजा तुम्ही अकरा वर्षाचे आहात. तुमची तीन धाकटी भावंडे तुमच्यासोबत आहेत. सर्वात महत्वाची म्हणजे आई. तीही सोबत आहे. वडिल परागंदा झालेले आहेत. त्यांच्या शोधाला तुम्ही विनातिकीट निघाला आहात आणि एका रेल्वे जंक्शनवर आईच तुम्हा सर्वांना सोडून देते. एकटी तिच्या माहेरी निघून जाते. तुम्ही काय विचार कराल? किंवा आयुष्यात अशी घटना तुमच्यावर काय परिणाम करेल? एक लेखक म्हणून मी कल्पना करू शकतो. पण मला काय वाटले? काहीही नाही. आजही काहीच वाटत नाही. हे सारे एका सांगाड्याशी झाले. माझ्याशी नाही. बरे हे जाऊद्या. तुम्ही विवाहित आहात. एक मुलगी तुमच्या खूप प्रेमात पडते. इतकी की तिचे लग्न ठरले तरी ती तुमच्या कडून मुल मागते. तुम्ही देता. नंतर ती येते ती त्या मुलीला घेऊनच. त्या मुलीकडे पाहतांना तुम्हाला काय वाटेल? तिच्याकडे पाहतांना काय वाटेल? मला तरी काहीच वाटले नाही. म्हणजे मी बोलत होतो, हसत होतो वगैरे खरं. पण वाटलं काहीच नाही. आता ती कोठे आहे हेही मला माहित नाही. म्हणजे मी कधी चौकशीच केली नाही.
म्हणजे मी एक सांगाडाच नाही का? सांगाड्याला भावना नसतात. जगतांना मी भावना पाळल्या असं मला वाटत नाही. मी या फार थोड्या घटना सांगितल्या. एक विवाहित स्त्री माझ्या प्रेमात पडली. दोन वर्षात जवळपास ३०-३२ रात्री मी तिच्याबरोबर घालवल्या. असंख्य रोमांटिक क्षण आले. पण मी तिच्याशी एकदाही संभोग केला नाही. पण मी दोन लग्ने केलीत आणि निभावलीत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मला माणूस ठरवत नाहीत. माझे मित्र मला आत्मचरित्र लिहा म्हणतात. खरे आहे. जीवनात सांगण्यासारखे एवढे आहे की जगातील कोणत्याही जगप्रसिद्ध चित्तथरारक कादंबरीलाही त्यांची सर येणार नाही. पण मी नाही लिहित. म्हणजे तसा प्रयत्न केला नव्हता असे नाही. पण नाही जमले. खरे म्हणजे आत्मचरित्र लिहायचे म्हणजे स्वत:वर तरी प्रेम हवे की नको? मला माझ्याबद्दल प्रेम नाही. उदासीनता असली तर असेल. खरे तर मला आठवायचाही कंटाळा येतो. लिहायचा तर मला त्याहून मोठा कंटाळा.
असो. हे जरा व्यक्तिगत झालं. पण अर्चनाताई मला लेखकाच्या नजरेत्न लिहा म्हणून सांगताहेत तर त्यात व्यक्तिगतच येणार. व्यक्तिगत जीवन सांगाडा म्हणून जगलो असलो तरी सांगाड्याचे लेखकीय जीवन मात्र तसे नाही. ते रसरशीत आहे. म्हणजे मला तरी ते तसे वाटते. आणि तेही मला लेखक म्हनायचे ठरले तरच. मी जगाची पर्वा फारशी कधीच केली नाही. किंबहुना मी मला या जगाचा भाग कधीच समजलो नाही. माझे जग हे कल्पनांतले जग आहे जे माझ्यासाठी खरे आहे. माझी पात्रे वाचकांना निरस वाटली तरी माझ्यासाठी ती जीवंत आहेत. जगणारी आहेत. आणि त्यांच्या सोबतीत मी एवढा रमलेलो असतो की हे बाहेरचे जग काही वाटून घेण्याच्या गरजेचे आहे असे मला कधी वाटतही नाही.
म्हणजे बघा, मी एखादे भावपुर्ण गाणे ऐकतो किंवा मीच दिलेले संगीत अनाहतपणे कधी गुंजत असते तेंव्हा मी रडतो. तसे हास्यास्पद असले तरी पडद्यावरचे भावूक प्रसंग माझ्या डोळ्यात पाणी आनतात. मी लिहितांना माझ्या पात्रांशी समरस एवढा होतो की त्यांच्या वेदनांनी कळवळून मी रडतो. माझी पात्रे मीच निर्माण केलेल्या रहस्याशी झगडत असतात तेंव्हा मी त्या रहस्याच्या खोल डोहात तळाशी जाऊ पहात असतो. मला आणि माझ्या नायकांना एकाच वेळेस रहस्य उलगडते. मला माझ्या कादंबरीचा शेवट सोडा, पहिली ओळ लिहिल्यावर दुसरी काय असनार हेही मला माहित नसते. लिहिता लिहिता मलाच मी आणि माझी पात्रे उलगडली जातात. कादंबरीची कथा मला आधीच माहित झाली तर मी ती कादंबरी पुढे लिहितच नाही. मग आराखडा बनवणे, पात्रांचे परस्परसंबध आधीच निश्चित करुन मग बेतल्यासारखी कादंबरी लिहिणे तर दुरच.
खरे तर लिहिले आणि पुस्तके प्रसिद्ध झालीत म्हणून मला लेखक म्हणयचे. मी मला लेखक मानत नाही. कवी नाही की नाटककार नाही. संशोधकही नाही की तत्वचिंतकही नाही. म्हणजे बघा मी नीतिशास्त्र लिहित होतो तेंव्हा मी सहज माझ्या एका मित्राला सांगितलं. तो फिस्सकन हसला. मी आणि नीति? हसण्यासारखेच आहे हे खरे आहे. पण मी अशा असंख्य हास्यास्पद गोष्टी केल्या आहेत. नीतिशास्त्र मी पुर्ण कोठे केले तर तुरुंगात जामीनाची वाट पहात असतांना. तेही टिळक यार्डमध्ये. अहो, लोकमान्य टिळक देशभक्तीसाठी जेलमधे गेले आणि तेथे गीतारहस्य लिहिले आणि मी फसवणुकीच्या आरोपाखाली जेलमधे गेलो आणि नीतिशास्त्र लिहिले. आता हे हास्यास्पदच आहे हे तुम्हालाही पटेल.
तर काय सांगत होतो...लिहिण्याबद्दल. हां. तर मी लिहिले म्हणून लेखक. इतिहासाचे उत्खनन केले म्हणून संशोधक. तत्वज्ञानावर लिहिले म्हणून चिंतक. कविता लिहिल्या म्हणून कवी आणि नाटके लिहिली म्हणून नाटककार. आता लिहिले म्हणजे लेखक होतो हे खरे असले तरी न लिहिताही लेखक असू शकतातच. किंबहुना अशा महान लेखकांची संख्या अंमळ जास्तच भरेल. लिहायची कलाच सापडली नव्हती तेंव्हा किंवा आजही अनेक निरक्षर असतात याचा अर्थ त्यांच्याकडे कसलेच सांगण्यासारखे चिंतन, विचार अथवा कथा नसतात असे थोडीच आहे. तर काय तर मी लिहितो म्हणून लेखक. पण तसे तरी खरेच आहे काय? आता विचार करतोय तर हे पटते की मी लिहिले म्हणून लेखक. तसे पाहिले तर मी नसते लिहिले तरी चालले असते. पण तरीही लिहिले म्हणजे काहीतरी असले तर पाहिजे.
खरे म्हणजे मी एक शोधक आहे. शोधक म्हणण्यापेक्षा अन्वेक्षक म्हणणे योग्य राहील. एक खाजगी डिटेक्टीव्ह म्हणून मी असंख्य खाजगी रहस्ये उलगडली. जगणे हेही एक रहस्यच. कळू न म्हणता न कळनारे. या रहस्यात सुसंगतींपेक्षा विसंगतीच जास्त. आणि मला विसंगती पटकन दिसतात. समोरच असणारी सामान्य बाब दुर्लक्षित करत इतिहासकार असोत की उत्खननकार, ते जे निष्कर्ष काढतात त्यातल्या विसंगत्या मला मात्र लगेच समजतात. या विसंगत्यांना टिपत त्यांना सुसंगत करण्याचा माझा व्याप म्हणजे माझे लेखन. जगणेही अशाच विसंगत्यांनी भरलेले. त्या विसंगत्यांचे सुसंगत ताणेबाणे म्हणजे कादंबरी किंवा कथा. किंवा तत्वज्ञान. किंवा नाटक. अगदी चित्रपटही. नाट्य निर्माण होते तेच मुळी जीवनाच्या अपार विसंगतीतून! आणि या विसंगत्या कोठे नाहीत? त्या इतिहासात आहेत. त्या जगण्यात आहेत. त्या समाजात आहेत. विचारवंतांत आहेत. लेखकांत आहेत. त्यांच्या साहित्यातही आहेत.
आणि मी स्वत: तर विसंगतीचा मुर्तीमंत असुसंगत पुतळा आहे. माझ्या जगण्यात कसलीही सुसंगती नाही. त्या विसंगतीला सुसंगत करण्याचा मी कितीही प्रयत्न केला तरी ते सुसंगतपणे मला समजलेले नाही. म्हणजे जीवन कोणालाच समजत नाही हे खरे असले तरी किमान त्यात कोठेतरी सुसंगती लावता येते. मला ती लावता येत नाही. कारण सारेच विसंगत आहे.
मी एके काळी प्रचंड वाचक होतो. आजही आहे. पण वाचनाचे विषय बदलले आहेत. आधी मी कादंब-या खूप वाचायचो. आता इतिहास बोकांडी घेतला आहे. आणि मी मात्र कादंब-या लिहितोय पण वाचत एकही नाहीहे. म्हणजे प्रयत्न केला नाही असे नाही. पण नेमाड्यांच्या हिंदूमुळे माझा तो प्रयत्न अयशस्वीच ठरला. मी कादंब-या वाचायचो त्या काळात मला सुसंगती-विसंगती अस्पष्टपणे कळायच्या. त्यामुळे नावडत्या कादंब-या क्वचित असायच्या. पण आवडत्या म्हनावे तर तसेही काही नाही. आउटसाईडर वाचली तेंव्हा जरा अस्वस्थ झालो होतो हे खरे. कदाचित मी स्वत:ला नकळत आउटसायडर समजत असल्यामुळे तसे झाले असावे. पाडस आवडली ती त्यातील निरागस स्वप्नाळुपणाकडून निर्दय वास्तवी प्रौढतेकडे प्रवास करणा-या ज्योडीमुळे...नि त्याचा बाप पेनीमुळे. पण डोक्यात बसली अशी एकही कादंबरी नाही, नाटक नाही की कविताही नाही. पण सारे वाचलेले साहित्य मिळून एक विक्षिप्त कोलाज मात्र तयार झाला. Form समजण्यापलीकडे त्यांचा मला काही विशेष उपयोग झाला असे नाही. तत्वज्ञानातही तेच झाले. विसंगत्याच जास्त. मग ते ग्रीक तत्वज्ञान असो की भारतीय. बौद्ध तत्वज्ज्ञान तर विसंगत्यांचा पुतळाच.
आपला इतिहास पहावा तर तोही तसाच. म्हणजे बघा ना, आपल्या भटक्या मेंढपाळाला...धनगराला इतिहास नसतो. फासेपारध्याला नसतो की सुतार-लोहाराला नसतो. महार-मांग-ढोर तर इतिहासातही अस्पृष्यच. अलीकडे त्या त्या जातींनीच आपापला इतिहास शोधायचा प्रयत्न सुरु केलाय पण त्यातही भ्रमांनी भरलेला अभिनिवेशच जास्त. बरे, भ्रम येतात कोठून तर ज्या साहित्यात त्यांचा इतिहास सापडण्याची सुतराम शक्यता नाही त्या साहित्याचा संदर्भ घेत आपल्या समजुती त्यावर लादल्याने. बरे, काहींना इतिहास आहे आणि काहींना इतिहास नाही असे कसे होईल? प्रश्न पडला आणि शोधाची सुरुवात झाली. विसंगत्या सुसंगत करण्याच्या प्रयत्नांत अनेक जातींचाच नव्हे तर जातिसंस्थेचाच इतिहास लिहून झाला. आता, लोकांना विसंगत्यांतून शोधलेली सुसंगती आपल्या मनाविरुद्ध असेल, समजुतींविरुद्ध असेल, प्रस्थापित मतांविरुद्ध असेल तर तो कोणाला आवडण्याची शक्यता नसते. आपल्याला समजुतींवर जगणे जास्त आवडते. अणि तरीही आपण परत "आमचा इतिहास का लिहिला गेला नाही?" हे कंठशोष करून विचारतो. ही विसंगती आहे. विसंगत्याही सुसंगतपणे समजावून घ्याव्यात हे मात्र कोणाला वाटत नाही. बरे, इतिहासच शोधायचा तर खूप मागे जावे लागते. अगदी पुरा मानवापर्यंतच नव्हे तर सृष्टीच्या जन्माच्या इतिहासाकडेही जावे लागते. मी गेलो. सारे सिद्धांत तपासत त्यातील विसंगत्या शोधत मी नवाच सिद्धांत मांडला. विश्वनिर्मितीचा सिद्धांत. सारे विश्वच आले तरी कोठून हाच काय तो शोध. अंतिम उत्तर कोणाकडेही नाही, सापडण्याची सध्या तरी सुतराम शक्यता नाही. याचा अर्थ शोध घेऊच नये असा तर नाही?
मला मृत्युचे अनावर कुतुहल आहे. मला मृत्युची भिती वाटत नाही असे मला वाटत होते. पण एका अपघातातून वाचलो आणि त्यावर शिक्कामोर्तब झाले. एका गुंडाने खंडणीसाठी माझ्यावर पिस्तूल रोखले आणि तरीही त्याला मी जे उत्तर दिले ते तो अजुनही विसरला नसेल. ही घटना घडली आणि मी त्याच रात्री एक गीत लिहिले, संगीतही दिले आणि पहाटे फोन करून मित्रालाही ऐकवून त्याचे शिव्याशाप खाल्ले. ते जाऊद्या. पण तरीही मृत्युचे कुतुहल कधी सुटले नाही. सारे धर्म, सारी तत्वज्ञाने अखेर मृत्युच्या चिंतनाशी, त्याबद्दल वाटत असलेल्या भयापाशी येऊन थांबतात...दिलासा कोणी पुनर्जन्मात शोधतो तर कोणी आत्म्याच्या अजरामरतेत. कोणी इश्वरात शोधतो तर कोणी बुवा-बापुत. पण आत्मा आहे काय? परमेश्वर खरेच आहे काय? शोध थांबत नाही. मी नववीत असतांना चक्क एक धर्मच स्थापन केला होता व तो भर पडत गेलेल्या तेरा अनुयायांसह चक्क पाच-सहा वर्ष टिकलाही. मी द अवेकनिंग कादंबरी लिहिली तीच मुळी मृत्युच्या शोधासाठी. नीतिशास्त्र लिहिले तेच मुळात या सनातन भयाची तत्वमिमांसा करण्यासाठी. सांगाड्याशी काय होते आहे याचा विचार करायला मला कधी फारसा वेळ मिळाला नाही. किंबहुना व्यक्तिगत सुख-दु:खांनी मी कधी उद्वेलितही झालेलो नाही. सारे क्षणिक आणि तात्पुरते. कधी कशात रमलो नाही. अगदी पुस्तकही प्रकाशित होईपर्यंतच काय असते ती उत्सुकता. नंतर मी त्याकडे ढुंकुनही पहात नाही. माझी पुस्तके, इकडे-तिकडे प्रसिद्ध झालेले फुटकळ लेखन मी कधी जपले नाही.
खरे म्हणजे मी सामाजिक आजिबात नाही. लोकांत मिसळायला मला मुळीच आवडत नाही. मला आधीपासुन मित्रच कमी. त्यातले अनेक गेले त्याचीही खंत नाही. नवे होत गेले. पण हाताच्या बोटावर मोजता येतील तेवढेच. पण तेही कायम राहतील अशी आशाही मी कधी बाळगली नाही. आणि विसंगती ही की मी तरीही सामाजिक आहे. माणसांचा कल्लोळ नेहमी माझ्या मनात उसळत असतो. मी पालांवरील वडारांच्या, फासेपारध्यांच्या किंवा डोगरतळी मेंढरं चारणा-या धनगरांच्या, किंवा मानसिक द्वंद्वाने पछाडलेल्या दुभंग होताहेत की काय अशा धर्मांतरीत पुर्वास्पृष्यांच्या व्यथा, वेदना, आशा, आकांक्षांत जगत असतो. मला दु:ख हे नेहमी सामुहिक स्वरुपात दिसते. ते किंबहुना एक स्वतंत्र रुप धारण करत मला म्हणत राहते..."बघ माझ्याकडे...कसा करणार नष्ट मला?" आणि ते हसत असते. मला आव्हान देत राहते. हतबलतेने मी ग्रासून जातो. आशाही तशाच आणि आजवर मात करण्याच्या उमेदीही तशाच. अन्यायाचीही मी कधीही जातवार विभागणी करु शकलो नाही. अन्याय म्हणजे अन्याय. मी सोयीने कधी प्रतिगामी ठरवला जातो किंवा पुरोगामी. मी सोयीने कधी याचा द्वेष्टा ठरवला जातो किंवा त्याचा. सांगाड्याला याचा फरक पडत नाही. या सांगाड्यापार असलेला जो मी आहे तो यातुनही मानवी मनाचा आणि त्यातील अपरंपार विसंगत्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत रहातो. जमेल तसे उत्तर शोधत रहातो. ते सापडत नाही. त्याने मात्र मी उदास होतो. खिन्न होतो. पण पुन्हा पेटतो. नव्या दमाने उत्तरे शोधायला वेगवेगळे पवित्रे घेत स्वत:शीच लढत रहातो.
एक सांगाडा आहे आंणि एक मी आहे. हे द्वंद्व आहे. म्हणजे व्यक्तिगत सुख-दु:खे माझ्यावर कधी राज्यच करू शकली नाहीत. केले असेल तर अत्यंत तात्कालिक. कशातच रमणे हा मुळी माझा स्वभाव नाही. किंबहुना माझी पात्रेही बव्हंशी अशीच. अविरत कशा न कशाचा शोध घेणारी. माझी पुस्तकेही तशीच. माझ्या नजरेतून जग काही विशेष नाही. ते तसेच आहे जसे हजारो वर्षांपुर्वी होते. बदल बाह्य आहेत. समस्या नवनव्या लेबलात आहेत ख-या पण त्यांचा मुळगाभा तोच आहे. तत्वज्ञानही तेच आहे आणि वर्तनसापेक्षताही तीच आहे. संदर्भ बदलत असतील, माध्यमं बदलत असतील, पण आक्रोशही तोच आहे. या तोच तोच पणाचा लोकांना कंटाळा येत नाही हेच खरे नवल आहे. माझ्या दु:खात, सुखात, यशात किंवा अपयशात काहीच नवीन नाही. मग माझ्या नजरेतून जगात नवीन काय दिसणार? हो, दिसला, तर या कंटाळ्यावर मात करत प्रत्यक्ष जगण्याला सांगाडा करुन टाकत त्याहीपार असलेल्या अगणित ’स्वं’चा निरंतर शोध.
मी अनेक लेबले चिकटवला गेलेला माणुस आहे. मी निर्दय किंवा टोकाचा बेपर्वा वाटावा इतका अलिप्तही आहे. तथाकथित अनैतिक तर आहेच आहे. या लेबलांत मला अनेकजण शोधतात. त्यांना मी कसा सापडेल? या लेखात अगणित वेळा "मी" हा शब्द आलाय. पण तेही अपरिहार्य आहे. कारण मी आहेच. या "स्व" ला तिलांजलि देण्याचा मार्ग मला अजून तरी सापडलेला नाही. आणि भुतकाळातील लोकांनी दिलेल्या उत्तरांवर मी कधीच अवलंबूनही राहिलेलो नाही. पण माझ्या दोन मी आहेत. एक लेबलवाला, म्हणून अनेक दिसणारा - वाटनारा ’मी’ आणि दुसरा जीवनाचा निरंतर शोध घेणारा ’मी’. या दोन "मीं"मध्ये द्वंद्व होतच नाही असे नाही. पण जिंकतो तो दुसरा ’मी’.
तर, सांगायचा मुद्दा हा की मी लिहिलं म्हणून लेखक आहे. तसं काही मी ठरवलं नव्हतं. खरे तर जीवनात काय बनायचं हेही मी ठरवलेलं नव्हतं. कोणी मला तसं सांगितलंही नाही आणि सांगितलं असतं तर मी ऐकलं असत असंही नाही. जे होत गेलं ते मी होऊ दिलं. जीवन जसे आले तसे ते मी स्विकारत गेलो. हेच हवे नि ते नको असले नखरे मी केले नाहीत. हे असेच का ते तसेच का असले फालतू प्रश्न मला कधीच पडले नाही. हे हवे... ते नको याचा मग काही संबंधच नव्हता. मी उद्योजकही झालो ते काही महत्वाकांक्षेने वगैरे पेटून नव्हे. त्यामुळे उद्योग उभारले आणि ते डोळ्यांदेखत नष्टही झाले याचे मला तात्पुरते सोडले तर आनंद-दु:ख काहीच नाही. किंबहुना व्यक्तिगत गतकाळाकडे पहायला वेळही मिळत नाही आणि मिळाला तरी मागे पहायची गरजही वाटत नाही. कारण जीवनाचा शोध थांबत नाही. जीवन व्यक्तिगत असणे, त्यात रमणे, काटेरी जखमा कुरवाळत बसणे, गतकालीन यशांवर हुरहुरणे हे सारे करण्यासाठी लागणारे स्वप्रेम माझ्यात नाही. जेही झाले, बस...झाले.
तर शेवटी माझ्या नजरेतून काय आहे? माझे आभाळ चोरले गेले आहे आणि ते अज्ञात क्षितीज मला दिसेनासे झाले आहे. माझा आत्मा मला सामावून न घेऊ शकणा-या पेटा-यात बंदिस्त केला जातो आहे आणि ती तडफडच काय ती तेवढी मला अस्वस्थ करते आहे. या गगनचूंबी सामुदायिक आक्रोशांच्या तटबंद्या मला भेदता येत नाहीहेत. या वेदनांनी माझे आभाळ चोरले आहे. द्वेषांच्या उद्रेकणा-या सैतानी प्रेरणा मला एका पेटा-यात बंदिस्त करू पहात आहेत. जीवन विसंगतींनी भरलेले आहे. या विसंगतींचा शोध घेऊन घेऊन दमलो असलो तरी मी या अभेद्य वाटणा-या तटबंद्या एक दिवस कोसळवेल ही माझी अजरामर उमेद मात्र आजही कायम आहे. सांगाड्याचं काय...तो आज असेल उद्या नसेल. पण हा माझ्यातील "मी" हा सर्वांत असलेला "मी" आहे. आणि तो निरंतर शोधक आहे. असण्याचा आणि नसल्याचा, उत्पत्तीचा आणि विनाशाचा शोध घेणारा "मी". त्याला कसल्याही व्यक्तिगत व्यथा नाहीत कि वेदना नाहीत. आनंद नाही की दु:ख नाही. तो भावनोद्रेकी असुनही भावनाहीन असल्याने नैतिकही नाही की अनैतिकही नाही. या "मी" चा प्रवास अनादि आणि अजरामर आहे. जीवनात भरलेल्या अगणित विसंगत्यांना एक दिवस हे सर्व "मी" सुसंगत बनवत एका सुस्वर लयीत बदलवतील ही आशा आहे. मी लेखक नाही. मी जीवनाचा शोधक आहे.
(Published in "Dilasa" Deepavali issue, 2017)
Monday, January 4, 2016
माझ्या लग्नाची गोष्ट...
१९७९. मी एफ. वाय. बी. कोमला होतो. डा. अशोक वैद्य यांचा कंपाउंडर म्हणून काम करायचो. नियमित कोलेज कधे केले नाही. फक्त सेमिनार व परिक्षेपुरता जायचो. पाबळ (तेच मस्तानीचे) येथे रहायचो. कोलेज राजगुरुनगरला. एसटीचा पास ४० रुपयांत मिळायचा. तेवढे पैसे नसायचेच. त्यामुले ते कधी शक्य झाले नाही. सेमिनार-परिक्षेला वाळूच्या ट्रकने जायचो. डा. अशोक वैद्य यांचे एक मित्र होते पुण्याला. कलतारसिंग पंजाबी. त्यांच्याबरोबर एकदा पुण्यात आलो. त्यांच्या घरी गेलो. तेथे भेट झाली पुष्पा पंजाबीशी. तिचा नववीचा रिझल्ट आला होता. उत्साहाने दाखवत होती. मी प्रेमात पडलो.
कधी व्यक्त केले नाही. डायरी मात्र लिहू लागलो. पुण्याला मला एकटे येता येणे शक्यच नसायचे. पैसे कोठायत? गेलो तर वैद्यजींबरोबर. आम्ही गप्पा खूप मारायचो. त्या काळात मी रशियन कादंब-या अनेक वाचत असल्याने इंप्रेशन मारायला टोल्स्टाय ते शोलोखोव यांच्यावरच जास्त बोलायचो. कपडे म्हणाल तर पायजमा व छपरी शर्ट. ( त्या शर्टाचीही एक कहाणी आहे.) आपल्यातल्या न्यूनता माणूस दुस-या अंगाने भरुन काढायचा प्रयत्न करतो म्हणतात...मी माझी अक्कल पाजळायचा उद्योग केला.
ती दहावी पास झाली. तिला अकरावीला प्रवेश मिळावा म्हणून अनेक कोलेजांचे फोर्म रांगेत उभे राहून आणले. पण प्रयत्न होता सेंट मीराजचा. आणि लागला नंबर सेंट मिराजमद्ध्ये. कारण ती फक्त मुलींची शाळा-कोलेज वगैरे. किमान संभाव्य स्पर्धकांचा मी असा बालीश बंदोबस्त केला.
अजून तिला मी तिच्यावर प्रेम करतो हे माहित नव्हते. मी सांगायची हिंम्मत करणे शक्य नव्हते. वर्षामागून वर्षे गेली. मी एम. कोम. करायला पुण्यात आलो. आधी एका मराठी नंतर हिंदी पेपरमद्ध्ये काम करत शिकत होतो. पगार होता दिडशे रुपये. तेंव्हा खानावळ होती महिना २५० ते ३०० रुपयांची. एक वेळचीच खानावळ लावत महिना ५ रुपये भाड्याचे शनिवार वाड्याजवळील शिक्षकांच्या मुलांच्यासाठी असलेल्या होस्टेलमधे आधी आणि नंतर खुद्द दैनिकाच्याच कार्यालयात राहत होतो. डा. वैद्य पाबळलाच सुटल्याने तिच्या घरी जायला निमित्तही नव्हते. माझ्या मित्रांना पिडत तिच्या इमारतीखाली तासंतास उभा रहात ती दिसेल या आशेने उभा रहायचो.
एकदा तिच्या घरी जायची संधी मिळवली. माझ्या हाती त्या दिवशी माझी डायरी होती. घरी ती होती. तिची मम्मीही होती. (बाप महाखडूस) गप्पा मारत बसलो. तिने मला अचानक माझी डायरी मागितली. मी काही देईना. तिने घेतलीच. दोनचार पाने उलटली. मी आता जातो जीव कि नंतर असा बसलो. म्हटलो आता खा खेटर. या घरातला आजचा शेवटचा दिवस नि हे शेवटचे दर्शन. तिचा चेहरा गंभीर झाला. डायरी माझ्या हाती दिली. "तुज्याकडून ही अपेक्षा नव्हती..." ती म्हणाली. मी गारेगार झालो होतो. मी "येतो..." म्हणून जे सटकलो तो सटकलोच.
आता तिला माझ्या मनात काय आहे हे तर माहित होतेच. माझी आर्थिक स्थिती तर दरिद्र वस्त्रे घालून बसलेली. पण म्हणतात ना...दिल है कि मानता नहीं. मी तिला कोलेजच्या बाहेर तिष्ठत भेटायचा प्रयत्न करायचो...तर ती झुरळाकडे टाकावा तसा कटाक्ष टाके. तिच्या मैत्रिणींना माझी दया येई. माझी निष्ठा पाहून तर एक मैतरणी मला म्हणाली, असला लवर मला मिळायला हवा होता. (कोणता चित्रपट पाहून आली होती कोणासठाऊक!) ती काही त्या लायकीची मला वाटलीच नाही पण मी तिलाच माझा पोस्टवुमन बनवले. माझी प्रदिर्घ (तेवढी मी कथाही लिहित नाही) पत्रे तिच्या माध्यमातून तिला पाठवे. उत्तर कधी आले नाही. तिच्या वाढदिवसाला तर मी एकदा कोलेजच्या पत्त्यावर चक्क तार पाठवली. तिच्या मास्तरणीने तिला झाप झाप झापले हे मला नंतर समजले. पण मामला काही केल्या फिट होईना. उलट बिघडला.
सात वर्ष गेली. तोवर माझी काही पुस्तके प्रसिद्धही झाली होती. आवर्जुन धाकाकत्या हृदयाने मैत्रीणीमार्फत पाठवलीही होती. तिला त्याचे कसले कौतूक?
पण १९८६ साल पावलं. माझा प्री-थिसीस एका इंग्लंडमधील विद्यापीठाने स्विकारला आणि मला आशिया खंडातील धर्मांवर तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी निमंत्रित केलं. माझा जीव तर इकडे. मी कळवळून शेवटचं पत्र लिहिलं. "आता तरी हो म्हण...नाहीतर मी चाललो इंग्लंडला..." आणि काय चमत्कार....दुस-या दिवशीच मला उत्तर मिळाले. पहिले उत्तर!
झाले. इंग्लंड रद्द! ती भेटली बाहेर. हृदय तळहातावर ठेवून बोललो. तशी ती भावनिक नाही. पण त्या दिवशी तीही भावूक होती. मी अजून दरिद्रीच होतो. भविष्याची स्वप्ने दाखवायची माझी लायकीच नव्हती.
नंतर मी व्यवसायात पडलो...जाहिरात व्यवसायात. आणि पैशांचा माझ्याकडे ओघ सुरु झाला. भाड्याच्या सायकलने पुणे पालथे घालणारा मी चक्क एम-५० चा मालक झालो. नंतर फियाटही घेतली. (नंतर माझ्या आयुष्यात सगळ्या अत्याधुनिक कार्स येवून गेल्या) एम्प्रेस गार्डन हे आमचे संकेतस्थळ बनले. दर सोमवारी आम्ही भेटायचो. हा सोमवार एवढा मित्र-मैत्रीणींत गाजलेला कि अमिता नायडू "Waiting on Monday!" नांवाची कादंबरी लिहिन म्हणत होती.
१९८९ आले. मी तिला एम्प्रेस गार्डनमधुन तिच्या घराच्या जवळ कोप-यावर सोडायला आलो. कसे कोणास ठाऊक कलतारसिंग पंजाबींनी आम्हाला पाहिलं. काही बोलले नाहीत. घरी जाऊन पोरीवर जाळ काढला. ते तिला घेऊन दुस-या दिवशी माझ्या कार्यालयात रिक्षाने आले. प्रशांत पोखरकरांसोबत मी तेंव्हा चित्रपट पहायला गेलेलो. वाचलो. कारण महाराज सुरा बरोबर घेऊन आलेले.
पण नंतर वार्ता समजली. मी हतबुद्ध झालो. मी आमचे दादाजी उर्फ दिनेश गंगावणेंना कळवले. ते म्हणाले...आलोच! आम्ही भेटलो. आम्ही तिच्या घरावर धाड घालायचा निर्णय घेतला. त्याच सायंकाळी मी आणि दादाजी तिच्या घरात हजर. बापाने मला पाहिले आणि सन्नकण त्यांच्या मुलीच्या थोबाडीत वाजवली. काही चर्चा करावी अशी स्थिती नव्हती. मी राणीला (हे तिचे घरातील नांव) म्हणालो..."चल..."
एका सेकंदात ती बाहेर पडली. आम्हीही बाहेर पडलो. दार बंद करून बाहेरची कडी लावली. खाली आलो. दादाजींनी रिक्षा करुन दिली. सरळ चिखली गाठली. आईने आम्हा उभयतांना पाहिले. आया मनकवड्या. घरात घेतले. काही विचारत बसली नाही. दादा घरात आले...वेगळे वातावरण पाहून बालसुलभ प्रश्न विचारले...पंचांग काढले...म्हणाले...परवा आळंदीला जावून लग्न लावून टाकु.
तिचा जीव किती भांड्यात पडला मला माहित नाही...पण मला तर स्वर्ग जिंकलो असे झाले होते. खिशात पैसे नव्हते. पिंपरीला माझा क्लायंट होते. परमानंद झमतानी. त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी ड्रावरमधून एक सेकंदात ३,००० रुपये काढून दिले. खरे तर एक मराठी पोरगा सिंधी मुलीशी लग्न करतोय म्हटल्यावर त्यांनी, एकुणातील जातीय/प्रांतवादी स्थिती पाहता मदत नसती केली तरी वाईट वाटले नसते. पण केली. मी घरी येईपर्यंत माझ्या बहिणीचेही पिनाककांत दत्त यांच्याबरोबर प्रलंबित असलेले लग्न आळंदीलाच करायचे ठरले होते.
दुधात साखर.
आम्ही घरचे पाचसहा आणि नियोजित वधू-वर एका मालवाहतूक टेंपोत बसून-लटकून आळंदीला पोहोचलो. कोणत्यातरी देवळात आमचे लग्न लागले. दोन हजार रुपये खर्च आला. (दोन लग्नांचा, म्हणजे हजारी एक लग्न पडले.) सायंकाळी आम्ही नव्या भावनिक जगात जायला, नवी आव्हाने घ्यायला सज्ज झालो.
सासरे नंतर मुलगी झाल्यानंतरसुद्धा भेटायला आले नाहीत. सासू तर आईच. मी नसतांना लेकीला भेटून जायची. सास-यांना मी भेटलो लग्नानंतर तब्बल पंधरा वर्षांनंतर.
झमतानींना मी ३००० रुपये परत करू शकलो नाही...म्हणजे त्यांनी घेतलेच नाहीत. त्यांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी. त्यांचा फोन आला नाही असा एक वाढदिवस गेला नाही.
हे का सांगत आहे?
प्रेम ही शक्ती आहे. लग्नात तुम्ही किती उधळता याने तुमचे प्रेम किंवा प्रतिष्ठा ठरत नाही. प्रतिष्ठा ही नेक जगूनच मिळते. एकमेकांचे होऊनच मिळते. लग्न करतो म्हणजे आपण एकमेकांना वचन देतो...समाजासमोर! ते वैभव दाखवण्यासाठी नाही. निष्ठा आणि समर्पण दाखवण्यासाठी! मी नंतर चांगलाच वागलो असे नाही. मी रुढ सामाजिक संकेत धिडकारले आणि प्रेमाचे अद्वितीय आविष्कार भोगले...जगलो....पण तेही निष्ठेने,..सवंगपणे नाही.
लग्नात तुम्ही किती खर्च करता हे महत्वाचे नाही....तुम्हाला प्रेम करता येते का, निस्सीम मन:पूत जगता येते का...
हा खरा प्रश्न आहे!
Wednesday, July 23, 2014
कवट्या महांकाळ....
"सहदेव भाडळी" हे तांत्रिक पुस्तक आमच्या लहाणपणी फारच लोकप्रिय होते. त्यासोबत अशी अनेक तंत्र-मंत्रांची पुस्तके सर्क्युलेट व्हायची. मी मिळेल ती पुस्तके वाचत असे त्यात हीसुद्धा. त्यात काही प्रयोगशील असेल तर प्रयोगही करत बसायचो. म्हणजे कार्व्हरचे पुस्तक वाचले तर शेगदाण्यांपासून दूध बनवायचाही प्रयोग केला...त्याचा चहा करायला लावून तोंड वाकडेही करून घेतले. असो. आता या पुस्तकांचा पगडा बसला आणि तांत्रिक साधना करून अद्भूत शक्तींना वश करायचे मनावर घेतले.
मी तेंव्हा सातवीत होतो. मला तेंव्हा मित्र असे नव्हतेच. मी एकटा माझ्याच स्वप्नरंजनांत भटकत असे. त्यामुळे सारा परिसर पायतळी अनेकदा तुडवलेला. कोठे काय हे सगळे पाठ. साधनेला साधनं लागतातच. पहिली हवी होती ती माणसाची कवटी. ती तर हवीच. वरुड्याच्या शिवेजवळ एक जुनाट मसनवटा होता. दुर्लक्षित, झुडपांनी व्यापलेला...केवळ विशिष्ट आकारांच्या उंचवट्यांमुळे तेथे कधी काळी माणसं गाडली आहेत हे लक्षात यायचं. आता एखादं थडगं उकरणं भाग होतं. लोकांनी पाहिलं तर दगडं फेकून मारलं असतं. गांवाकडे सहा-सातनंतर सुमसाम व्हायची. वीज नव्हतीच. त्यामुळे रात्र म्हणजे काय सुम्म रात्रच. मी दिवस मावळल्यानंतरची वेळ ठरवली. एके दिवशी दिवसाच जावून कोणतं थडगं उकरायला सोपं जाईल याचा अदमास घ्यायचा प्रयत्न केला. जुनाट असल्याने वरची माती जाम घट्ट झालेली, त्यावर गवत उगवलेले..काहींना तर झुडपांनीच अदृष्य करुन टाकलेलं. आता थडगं किती खोल असतं हे मला काय बोडक्याचं माहित? पण एक निवडलं...आणि त्याच संध्याकाळी कपचीदार दगडानं उकराउकरी चालू केली.
प्रार्थना एकच होती जी बाजू उकरतोय ती डोक्याकडचीच निघू दे. कारण दगडानं उकरणं एवढं सोपं जात नव्हतं. अंधार वाढू लागला तसा सारी झुडपंही मला भुतांगत दिसायला लागली. पण म्हटलं...तुम्हाला लेको वश करून नाचवणार आहे...भेदर्लो असलो तरी बरच उकरलं...पण अजुन काय गवसेना...
बरंच खोदावं लागणर हे पुन्हा सकाळी जाउन पाहिल्यावर लक्षात आले. थोडी उकराउकर करत अंदाज घ्यायचा प्रयत्नही केला. पुन्हा अंधार पडायला लागल्यावर तिकडं.
तीन दिवसानंतर बराच खाली गेलो. त्याच्या दुस-या दिवशी मग दिवसाच उद्योग केला. थोड्या प्रयत्नांतच मी खजिन्याजवळ पोचलो. चक्क मान वळवलेली, मणक्यापासून सुटी झालेली कवटी दात विचकत पहुडलेली. वर उचलली. मातीचे ओघळ तोंडातून डोळ्यांतुन बदाबदा पडले. भराभरा जमेल तशी माती पुन्हा लोटली. जवळच एक छॊटा ओढा होता. निरगुडीच्या दाटीत लपवली. जागा लांबून दहा वेळा तरी पाहिली असेल...कारण तिला हलवायचे म्हणजे रात्रीच ते काम करावे लागणार होते. जागा विसरून चालणार नव्हतं.
आनंदाच्या लाटांवर स्वार मी घरी आलो. (शाळेत मी क्वचित जायचो.) त्या दिवशीची कामे केली. सायंकाळी परत तिकडे. कोणी नाही हे पाहून कवटीचा ताबा घेतला. माळ ओलांडला आणि ओढ्याला माळाईच्या डोहाजवळ आलो. तीच माझ्या साधनेची जागा असनार होती. त्या डोहाकाठी एक शमीचं वाळकुटलेलं खुजं जुनाट झाड झाड होतं. त्याखालीच माळाईचा शेंदरी तांदळा. मी झाडावरच्या दुबेळक्यातल्या फातलेल्या जागेत कवटी घुसवली. खाली उतरलो. कोणाला दिसनार नाही ना याचा अदमास घेतला. परतलो ते मध्यरात्री परत येण्यासाठीच.
आम्ही तेंव्हा जिजाबाच्या वड्यात रहायचो. म्हणजे चार बाय दहाची खोली होती. स्वयंपाकासाठी आणि जरुरी सामान ठेवण्यापुरती ती कामाची. बाकी आम्ही ओसरीत नाहीतर खालच्या अंगणात झोपायचो. सारे लवकर झोपी जात त्यामुळे सटकणे हे काही अवजड काम नव्हतेच.
अनावर उत्सुकतेने मी साधनेचे तंत्र पुन्हापुन्हा आठवत होतो. मंत्र तर पाठ कधीच झालेले. आपल्याला दिव्य शक्ती प्राप्त झाल्यावर काय काय करायचे याचे स्वप्नरंजन. सारे झोपलेत याची खात्री करत करत बराच वेळ गेला मग निघालो.
रात्र कितीही झाली तरी चांदण्याचा धुसर प्रकाश असतोच. खेड्यातल्या माणसाला तो पुरतो. मी माळ ओलांडला. शमीवरची कवटी ताब्यात घेतली. छती धडधडत होती हे खरे. पण आलो डोहाच्या काठावर. ब-यापैकी पानी होते. (आजही असते. हा डोह मी "...आणि पानिपत" मद्ध्ये एक पात्रच बनवून टाकला आहे. या डोहाशी माझ्या अनेक रमणीय आणि तेवढ्याच दु:खद आठवणी निगडित आहेत.)
शर्ट व चड्डी काढली. नागडा झालो. कवटी घेऊन पाण्यात उतरलो. छातीपर्यंत पाण्यात आलो. कवटी दोन्ही हातात घेतली. हात उंचावले. "ऒम -हीं क्लीं स्त्रीं..." पासुन पुनश्चरणे सुरू झाली. हळु हळु भिती गेली. मंत्र मी मोठ्यानेच म्हणत होतो. तेथे ऐकायला येणार तरी कोण होते म्हणा...
भुतांशिवाय?
किती वेळ गेला हे माहित नाही. पुस्तकातील वाक्य आठवत होतो...साधकाने संयम ठेवला पाहिजे...निष्ठेने वाट पहावी लागते वगैरे. माझ्यात सम्यमच संयम दाटून भरला असल्याने मला घाई नव्हती. पण मी भुतांना वश करणार होतो हे नक्की...
अनेक दिवस असेच गेले. काही खाडेही झाले. भूत काही दिसलं नाही मग वश काय होणार?
अजून काही दिवस गेले आणि मी कवटी डोहात फेकून दिली.
नवे प्रयोग समोर दिसायला लागले होते ना....!
प्ल्यंचेट आणि मी
अकरावीत होतो. पाबळला भाड्याच्या खोलीत आम्ही चार मित्र रहायचो. आमचे जेवण आम्हीच आळीपाळीने करायचो. माझ्या स्वयंपाकात प्रयोगच जास्त असल्याने कधी मजा तर कधी हजा व्हायची. तेथले वाचनालय हे खरे घर. वाचायला मनसोक्त मिळायचे. एकदा प्ल्यंचेटवरील एक पुस्तक वाचनात आले. मग सोडतो काय? मीही प्ल्यंचेट करायचे ठरवले. मित्रांना पटवायला लागलो. प्ल्यंचेटचे वाचलेले रसभरीत तर काही भयंकर किस्से सांगितले. मित्रांत एक साहेबराव म्हणून मित्र होता. आता तेवढेच नांव आठवते. त्यालाही मग मुड आला. मग बाकीचेही सारे पटले.
अमावस्येच्या रात्री प्ल्यंचेट यशस्वी होते असे लेखकाने आवर्जून सांगितले असल्याने तिची वाट आतुरतेने पाहू लागलो. आली. त्या दिवशी प्ल्यंचेटला लागणा्रे सामानही तयार केले होते. सामान म्हणजे काय...तर एक पाट (जो आमच्याकडे नव्हता...शेजा-याकडून आणला), ए टू झेड स्वतंत्रपणे लिहिलेला एक मोठा कागद आणि एक नाणे. लयच उत्सूक होतो आम्ही. बाकीच्यांत थोडे भयही होते. मी काय, अमावस्येच्या मध्यरात्री मानवी कवटी हातात घेऊन ओढ्याच्या डोहात कमरीवढ्या पाण्यात तंत्रसाधना करण्याचे दिव्य पराक्रम पुर्वी केलेच असल्याने निर्धास्त होतो. त्या दिवशी स्वयंपाकाची पाळी माझी होती. मला सहज जमणारी आणि भरपूर प्रयोग करायची संधी देणारी खिचडी त्यादिवशी कसलेही प्रयोग न करता भराभर त्या दिवशी बनवली. (म्हणून बहुदा चांगली झाली असावी...कारण त्या रात्री तरी कोणीच बोंब मारली नाही.)
रातचे बारा वाजेपर्यंत प्ल्यंचेट कसे करायचे याची आम्ही उजळनी करत बसलो. एकदाचे बारा वाजले. आम्ही पाटाभोवती न जमणारे गंभीर चेहरे करून बसलो. पाट, त्यावरील कागद आणि नाणे आधीच ठेवलेले होते. नाण्यावर चौघांनी बोट ठेवले.
आता मृतात्म्यांना आवाहन करायचे होते. ज्याचे बोट थरथरू लागेल त्याच्यात प्ल्यंचेट आले हे समजून इतरांनी प्रश्न विचारायचे होते. प्रश्न आधीच ठरलेले होते. (पोरी-बाळींशिवाय काय प्रश्न असणार आमचे?) उत्तरांची कमालीची उत्सूकता होती. आज ती मिळनारच याची खात्री होती.
आधी मनोमन आवाहने केली.
काहीच झाले नाही.
मग ओरडून आवाहने केली.
आमच्या ओरडण्याने आम्हीच हललो तेवढेच...मृतात्मा काही केल्या आमच्या हातात किंवा आमच्यात शिरायला तयार होईना.
शेवटी मस्तानीच्या रूहलाही आवाहन करून झाले.
करता करता वाजले दोन. पण कसचे काय?
मग यच्चयावत विश्वातल्या मृतात्म्यांना आणि ज्या कोणी नालायकाने प्ल्यंचेट हा चाळा शोधला त्याला घाल घाल शिव्या घातल्या. त्या शिव्यांचा जोर ओसरला...
तसे सारे माझ्यावर त्याच शिव्या मोठ्या प्रेमाने (?) बरसू लागले...
आता डा. दाभोळकरांचा खुनी शोधायला ज्या कोणी महामुर्खाला प्ल्यंचेटची कल्पना सुचली त्याला त्या शिव्या परत करतोय!
Saturday, November 16, 2013
मी नवा धर्म स्थापन केला होता त्याची गोष्ट!
धर्म स्थापन करायला एक ठार वेडेपणा लागतो. तो बहुदा माझ्यात असावा!
(अगणित धर्म कालौघात अशाच ठार वेड्यांनी स्थापन केले. काही टिकले...अगणित अदृष्य झाले तर काही स्मृतीशेष आहेत. पण धर्म जर चिरंतन असेल तर अनेक धर्म मुळात नष्टच का होतात? नवीन धर्म स्थापनच का होतात? धर्माचे नष्ट होणे नियत असेल तर शाश्वत धर्म असुच कसा शकतो? कि शाश्वत नसणे हेच धर्माचे मुलतत्व आहे? प्रश्न अगणित आहे कारण मीही तो येडचापपणा तथाकथित नकळत्या वयात केला होता. मी त्यालाच चिकटून नंतर जरा "हुशारीने" चमत्कारांचे वलय दिले असते तर काय सांगावे, आज तो कदाचित दखलपात्र धर्म झाला असता. पण ही हुशारी मानवविध्वंसक असते. धर्म बदनाम व त्याज्ज्य बनतात ते त्यामुळेच. मी तसा हुशार नव्हतो हे किती बरे झाले!
मी स्थापन केलेल्या धर्माची कथा अशीच बोधक आहे. अवश्य वाचा.)
मी नवा धर्म स्थापन केला तेंव्हा मी नववीत होतो. माझ्या धर्माचे नांव होते "जीवन धर्म". येथे जीवन हा शब्द "पाणी" या अर्थाने आहे. या धर्माला एकूण नऊ अनुयायी मिळाले. त्यात माझ्या वयाचे (१४-१५) पाच तर बाकी बाप्प्ये होते.
त्याचं असं झालं. मी तेंव्हा वरुडे (ता. शिरुर) या गांवात राहत होतो. माझे वडील प्राथमिक शिक्षक असल्याने तशी आम्हाला बरीच गांवे बदलावी लागली पण या गांवात मात्र आमचा मुक्काम प्रदिर्घ काळ (५-६) वर्ष होता. वरुड्यात चवथीपर्यंतच शाळा असल्याने पाचवीसाठी मी चिंचोलीच्या शाळेत जात होतो. तेथे सातवीपर्यंतची शाळा होती. रोज पायी जाणे-येणे व्हायचे. तसा पावसाळा मला पहिल्यापासुनच प्रिय. पावसाळ्यात माझा चालीव प्रवास फार मजेशीर असायचा...आनंदवणारा...सुखावणारा...सर आली कि चिंब भिजायची मजा मी कधी सोडली नाही.
पण त्याच वेळीस पिवळे ठक्क पडलेले गवताळ रानोमाळ हळुहळु ज्या नजाकतीने सरारुन हिरवाई धारण करे ते सावकाश होणारे परिवर्तन मला थक्क करे. पण त्याहून मोठी मौज वेगळीच होती. ती म्हणजे रस्याच्या कडेला खड्डे-चरांत पाण्याची जी डबकी बनायची त्यात हळुहळु चिकट-बुळबुळीत इवल्या करड्या-काळसर रंगाच्या अंड्यांच्या माळा दिसू लागत. मी रोज पाहत असे. ती अंडीही मोठी होतांना. एखाद चुकार दिवशी बेडुक-माशांची इवली पिल्ले आणि शेवाळ त्यांची जागा घेतांना दिसत. साताठ महिने कोरड्या ठक्क पडलेल्या त्या भेगा पडलेल्या भुतळावर हे जीवन कसे फुलते? मला प्रश्न पडायचा. अत्र्थात उत्तर नव्हते आणि मास्तरला विचारले तर तेही सांगत नसत.
सहावीला शाळेसाठी मी गणेगांवचा रस्ता धरला. गांवातील बरीचशी मुले गणेगांवलाच जात असत म्हणून! या मार्गावरही माझा पावसाळ्यातला एकमेव छंद म्हणजे पावसाळ्यात माळांचे होणारे विस्मित करणारे परिवर्तन आणि काहीच नसलेल्या डबक्यांत उलणारे जीवन. कोठुन येते हे जीवन? कोणी आणली ती अंडी? कोठुन आले ते शेवाळ?
प्रश्न आणि प्रश्नच.
मी वाचायचो खूप. कथा-किर्तनालाही हजेरी लावायचोच. एका बुवाला भीत भीत विचारलं तर तो सांगे "ही सगळी पांडुरंगाची कृपा...तो आहे म्हणून आपण आणि सारी प्राणिजात..." सहावीलाच असतांना मी पहिल्यांदा आणि शेवटचा पंढरपूरला आई-वडिलांसोबत गेलो. चंद्रभागेत लोक एस्टीच्या खिडक्यांतून नाणी फेकत होते. पांडुरंग पाहिला. ही दगडाची मुर्ती काही केल्या जीवनाचा निर्माता असू शकत नाही एवढेच काय ते माझ्या मनाने घेतले.
अशीच सातवीही गेली. आठवीला एक वर्ष पुण्यात पुणे विद्यार्थी गृहात होतो. तेथेही शिक्षकाने पहिल्याच दिवशी :"आज शिकवणार नाही. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारा..." असे सांगितले. मी धीर धरुन (खेड्यातून आलो असल्याने माझ्यात प्रचंड न्युनगंड होता.) "जर पृथ्वी जन्माला आली तेंव्हा उकळत्या रसाचा गोळा होती तर या पृथ्वीवर जीवसृष्टी कशी आली?" सरांनी उत्तर दिले नाही. म्हणाले, हे वर्ष संपल्यावर या प्रश्नाचे उत्तर देईल...! झालं. माझ्या शंकेचं काही कोणी हरण करेना आणि कितीही पुस्तकं वाचनालयातली वाचली तरी उत्तर मिळेना.
पुणे विद्यार्थी गृहाचं एकंदरीत धार्मिक. भारतीय संस्क्रुती आणि हिंदू धर्म किती महान असून तो जगभर कसा पसरला होता या आख्याईका आम्हाला देसाई नांवाचे एक निवृत्त शिक्षक मोकळ्या तासाला येऊन सांगायचे. तात्पुरता प्रभावितही व्हायचो...पण माझा मूळ प्रश्न काही केल्या सुटत नव्हता. गणपती अथर्वशिर्ष व गीतेचा सोळावा अध्याय त्यांनीच आमच्या कडुन तोंडपाठ करुन घेतलेला. गणपती अथर्वशिर्षाचा मज गरीबाला झालेला फायदा म्हणजे गणेशोत्सवात अगदी ब्राह्मण घरांतही आम्हा काही मुलांना घेऊन जात. ११ किंवा एकविस वेळा गणपतीसमोर ते म्हटले कि आम्हाला प्रत्येकी एक-दोन रुपयांची दक्षीणा मिळे व केळे किंवा अन्य एखादे फळही मिळे. थोडक्यात चंगळ व्हायची.
धर्माशी माझा दुसरा परिचय येथे झाला. म्हणजे खेड्यात किर्तनकार सांगत तो धर्म आणि येथे कळे तो धर्म वेगळे होते. दोन्हीही हिंदुच हा त्यातला एक भाग. पण विरोधाभासी. (हिंदुत्ववादी हा शब्द मी प्रथम येथे ऐकला.) येथे विनोबांची "गीताई" तोंडपाठ केलेली. "कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये" पासून ते "स्थिरावला समाधीत..." वगैरेंवर प्रवचनेही होत आणि मग माझे चिंतनही. (आठवीतल्या पोराच्या चिंतनाची योग्यता ती काय असनार...पण करत असे हेही खरे.)
परिस्थीतीमुळे माझे पुणे विद्यार्थीगृह सुटले. परत गांवी आलो. नववीला मी कान्हुर (मेसाई) येथे प्रवेश घेतला. वरुड्यावरुन रोज चालत जाऊन-येऊन असे. हे अंतर बरेच....साताठ किलोमिटरचे. माझे जुने निरिक्षण पुन्हा सुरु झाले. आणि एके दिवशी मला वाटले मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. मी त्या दिवशी दांडी मारली आणि एका डबक्याकाठीच त्यात विहरणा-या इवल्या मासोळ्या पाहत बसुन राहिलो.
पाणी...यालाच जीवनही म्हणतात. कशातच कोठे नसलेले जीवन पाण्यातच अवतरते. माणसाचे शरीरही बव्हंशी पाणीच आहे. इतर प्राण्यांचेही तसेच. म्हणजे पाणी हेच जीवनाचे निर्माते. बाकी सारे देव-बिव झुठ. सारे धर्म झुठ! आकाश आणि पाणी हेच आपले निर्माते. पाणी हाच सर्वांचा धर्म. बस्स ठरले...!
प्रशांत पोखरकर हा माझा पाचवीपासून बनलेला पहिला मित्र व सहाध्यायी. तो चिंचोलीत रहायचा. मी त्याला सायंकाळी घरी गाठले आणि त्याच्या एकाही प्रश्नाला उत्तर न देता ओढतच पठारावर घेऊन गेलो. त्याच्याच शेताच्या बांधावर बसून मी मला लागलेला "अलौकिक शोध" आणि नव्या धर्माची आवश्यकता यावर त्याला भरभरुन सांगत राहिलो. तो माझा नेहमीचाच नि:सीम श्रोता त्यामुळे त्याने शांतपणे सारे ऐकून घेतले. मग विचारले "आपल्या नव्या धर्माचे नांव काय?"
त्याने "आपल्या" म्हटल्याने मला अपार हुरुप चढला. "जीवन धर्म" मी म्हणालो आणो हेच नांव का हेही त्याला सांगितले. झाले. एका नव्या धर्माची उद्घोषणा झाली आणि पहिला अनुयायाही मिळाला.
आता धर्म म्हटले कि तत्वज्ञान आणि कर्मकांडही आले.
ते आम्ही हायस्कुलला दांड्या मारुन प्राथमिक का होईना तयारही केले, पुढे ते तीन-चार वर्ष विकसीतही होत राहिले.
येथे हे सांगायला हवे कि मला इतर धर्मांची काय माहिती होती? माझे वाचन प्रचंड होते. पंचक्रोशीतील एकही ग्रंथालय मी सोडलेले नव्हते. स्वत:ला "अतिशहाणा" "किंवा "वासरात लंगडी गाय शहाणी" म्हणता येईल एवढे इतरांच्या तुलनेत माझी माहिती बरीच होती. इतर धर्मांची फार माहिती नसली तरी तोंडओळख नक्कीच होती. मला त्यातला एकही धर्म पटलेला नव्हता. असो.
तर झाले. धर्माचे कर्मकांड म्हणजे...
१. पहिला पाऊस, मग तो कधीही येवो, धर्माच्या अनुयायांनी त्या पावसात साग्रसंगीत नृत्य करायचे आणि पावसाचे थेंब तोंडात घ्यायचे.
२. नदी-ओढ्यातील वाहत्या पाण्याची फुले वाहून पूजा करायची.
३. वाहत्या पाण्याकडे पाहतच पाण्याच्या वाहतेपणाशी तद्रूप व्हायचे...हे ध्यान.
४. वाहत्या अथवा जलाशयातील पाण्याला ओंगळ-अस्वच्छ होऊ द्यायचे नाही. असे आणि अनेक काही सोपी पण पाण्याशी निगडित कर्मकांडे तयार झाली.
यात मुर्तीपूजा नाही. व्रत-वैकल्ये नाही. सण नाही. आत्मा-मोक्ष काही नाही.
राहिली तत्वज्ञानाची गोष्ट. ते मी नववीतच लिहायला सुरुवात केले. अकरावीपर्यंत ६०-७० परिच्छेदही तयार झाले. प्रत्येक परिच्छेद "लोकहो..." या संबोधनाने सुरु व्हायचा. आठवतात त्यातील एक-दोन देतो...
"लोकहो,
मनावर ताबा मिळवायचा प्रयत्न करु नका
कारण मनाला गुलाम करणे
हे मनुष्यत्वाच्या विरुद्ध आहे."
किंवा;
"लोकहो,
शहाणे लोक पाण्याला भजतात
पाण्यापासुनच सर्व प्राण होतात
आणि त्यातच विसर्जित होतात
पाण्याचे पूजन आणि त्याचेच ध्यान
जो करतो
तोच खरा सुखी होतो..."
वगैरे.
दर्म्यान आमचा धर्मप्रसार सुरुच होता. जी कुचेष्टा व्हायची ती आठवता आज हसायला येते. पण तरीही आम्ही नेटाने आमचे धर्मपालन करत होतो. दहावीत आमचे कान्हुरचे तीन अधिक अनुयायी मिळवणुयात आम्ही यशस्वी झालो. दहावी सुटली. पुढचे शिकायला पाबळला. तेथेही हा प्रचार चालुच राहिला. काही विद्यार्थी अनुयायी बनले. गांवात मोठ्या माणसांशीही माझ्या धर्माबद्दल बोलायला मी बिचकत नसे. अनेकांनी माझी अर्थातच कुचेष्टा केली, हाकललेही. पण गांवातअला एक मारवाडीआणि एक पोस्टमास्तर (हा रजनिशांचा कट्टर अनुयायी होता. मी रजनिशांची अनेक पुस्तके यांच्यामुळेच वाचली.) हे बाप्पे माझे पहिले अनुयायी झाले. पोस्टमास्तर झाला याचे कारण म्हणजे माझा युक्तिवाद हा कि रजनिश दुसरे धर्म आणि महात्मे काय सांगतात त्याचेच निरुपन करतो...घडीत बुद्ध तर घडीत कृष्णावर येतो...काय हे? त्यापेक्षा बघा...मी काय सांगतो ते माझे आहे...आणि ही मात्रा लागु पडली. मग तो जीवनधर्माच्याच असलेल्या आणि संभाव्य तत्वज्ञानाबद्दल बोलत असे. असे थोडे वाढत एकुणात आमचे ९ अनुयायी झाले.
बारावीत असतांना मी मराठीत "भारतात नवीन धर्माची आवश्यकता का?" यावर लेख लिहिले पण ते कोणी छापले नाही. शेवटी मी "भारत में अब नये धर्म की जरुरत" आसा हिंदीत लेख लिहिला. अर्थात हा नवा धर्म म्हणजे जीवनधर्मच कि! हा लेख चक्क आज का आनंद या हिंदी पेपरने माझी दिव्य हिंदी दुरुस्त करुन प्रसिद्ध केला. त्याचा विशेष फायदा झाला नाही. पण पुढे उच्च शिक्षणासाठी पुण्यात आल्यावर मला तेथे बातमीदाराची नोकरी मिळाली.
धर्म तोवर संपला होता. धर्मग्रंथही, जो अपूर्ण होता, मागे पडता पडता जीवनातील पडझडींत नाहीसा झाला. आता आठवले कि हसू येते. पण इतरही धर्म कसे निर्माण झाले असतील यामागची प्रक्रियाही समजते. माझा नि:ष्कर्श एकच:
धर्म स्थापन करायला एक ठार वेडेपणा लागतो. तो बहुदा माझ्यात असावा!
(वरील माहिती मी संक्षिप्तरित्या माझ्या अजून अपूर्ण असलेल्या "दिवस असेही...दिवस तसेही" या आत्मचरित्रात दिलेली आहे. तो लेखमालिका स्वरुपात किर्लोस्करमद्धे २०१० मद्धे प्रसिद्ध झाला होता.)
(मी जपलेले माझ्या धर्माचे अवशेष मात्र माझ्यात पुरते रुजलेले आहेत. उदा. मी मुर्तीपुजा करत नाही...व्रतवैकल्य कधीच केले नाही. पाऊस आणि पाणी हे माझे पुजेचे नसले तरी अनावर प्रेमाचे विषय आहेत. मृत्युनंतर एका स्टीलच्या सिलेंडरमद्ध्ये माझे प्रेत घालुन, सीलबंद करून ते समुद्रात दूरवर फेकुन द्यावे असे मी मृत्युपत्रात नमूद करून ठेवलेले आहे.)
Thursday, July 18, 2013
मी तुरुंगात होतो ते दिवस...
सांगली येथील कारागृह नदीकाठीच आहे. याच कारागृहातुन वसंतराव पाटील यांनी कसे पलायन केले व नदी ओलांडुन पायात गोळी घुसुनही कसा इंग्रजांच्या हाती धत्तुरा दिला ही कथा मला आधीच माहित होती. आता मला याच तुरुंगात यावे लागेल व एक नाही दोन नाही तब्बल ४१ दिवस काढावे लागतील याची मला कल्पना नव्हती.
माझ्यासोबत माझा अनेक कंपन्यांपैकी एका कंपनीत स्टाफ असलेला आणि अत्यंत दुर्दैवाने या स्थितीत अडकलेला मुकुंद मुळे होता. माझा भाऊ विनोद मला जेलपर्यंत सोडायला आलेला होता. खालच्या कोर्टाने आमचा जामीन नाकारला होता. "मी व मुळे हे गुंड प्रव्रुत्तीचे असल्याने साक्षीदारांवर दडपण आणतील..." असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला होता आणि तो कोर्टाने ग्राह्य धरला होता. जामीन नाकारला होता त्यामागची गोम आम्हाला आधीच माहित असल्याने आश्चर्यही वाटलेले नव्हते. जेलकडे जातांना सोबत मुल्ला नांवाचा पोलिस शिपाई होता. वाटेत विनोद उद्याच सेशन कोर्टातुन जामीन करुन आणतो याचा विश्वास देत होता. माझ्या मनात तोवर कादंब-या वाचुन तुरुंगाविषयी अनेक भ्रामक कल्पना होत्या. म्हणजे आरोप सिद्ध शिक्षा न झालेल्या कैद्यांसाठी स्वतंत्र आणि चांगली व्यवस्था असेल अशी आशा वाटत होती. कच्च्या कैद्यांसाठी तुरुंगात वेगळी व्यवस्था असते का हा माझा प्रश्न मुल्ला अगदी ठामपणे उडवत म्हनत होता...साहेब, उद्या संध्याकाळी तुम्ही बाहेर...खालचा जज विकला गेला म्हणुन तुमच्यावर ही वेळ आली.
मुल्लावर विश्वास बसत होता कारण कस्टडीत असतांना त्यानेच मला घरुन चादर आणुन दिली होती. मच्छर चावतात म्हणुन ओडोमास तोच आणुन द्यायचा, अगदी सणाची पुरणपोळी त्यानेच डब्यातुन आणुन खावू घातलेली. मला सिगारेट प्यायची तल्लफ आली कि स्वत:हुन गजांजवळ येवुन विचारायचा..."साहेब...आलीय का?" (इतर कैदी लोकांना वाटायचे मला संडासला जायचे आहे.) मी हो म्हटलो कि तो ते कोठडीचे दार उघडायचा आणि मला बाजुच्या कोप-यात मनसोक्त सिगारेट पिवू द्यायचा.
पण आता एक रात्र का होईना जेलमद्धे काढावी लागणार यामुळे मी फारच अस्वस्थ झालो होतो. आता आपण खरेच एक क्रिमिनल आहोत यावर विश्वास बसु लागला होता. खरे तर आजचा दिवस सणाचा होता. जामीन झाला असता तर आम्ही दोघे घरी उशीरा रात्री का होईना पण पोहोचुन कुटुंबियांसह घालवु शकलो असतो...पण ते होणे नव्हते.
जेलचे द्वार अवाढव्य. ते पाहुनच उर दडपला. मुळे तर पार हबकुन गेला. गडी आधीच सुकडा आणि घाबरट...तोवर म्यजिस्ट्रेट कोठडी म्हनजे एखादा सभ्य प्रकार असेल असाच माझा आणि त्याचाही समज. पण काय, शिक्षा झालेल्या कैद्याप्रमाणे आत पहिल्या गेटात तपासणी. नागडेच केले नाही कारण मुल्ला! पैसे नाहीत...खिशातील सिगारेट नाहीत...खिशात गर्द वगैरे असे अंमली पदार्थ नाहीत वा ब्लेडादि शस्त्र नाही याची खात्री करुन घेत त्यांनी आम्हाला पहिल्या गेटमधुन आत सोडले. विनोद आणि मुल्ला वळुन पाहता दिसनार नाहीत कारण ते महाद्वार बंद झालेले. नंतर दुसरे झाडी ओलांडत आम्ही दुसरे महाद्वारही ओलांडले...परत तेही बंद झाले आणि मुक्त जगाशी असलेला काही तासांचा संबध तुटला. तत्पुर्वी आम्ही १० दिवस पोलिस कोठडीत बंदच होतो. त्या आमच्या सोबती जेलगार्डने दिलेली ओशट वास मारणारी एक कांबळ घेत मधल्या आमराईतुन वाट काढत अजुन एक दार ओलांडले आणि सांगली जेलचे दर्शन घडले. बराकींतुन येणारा उजेड सोडला तर बाहेर कोणाही जीवंत माणसांचे चिन्ह नव्हते. विनोद मागे पडला होता. ओळखीचे जग मागे पडले होते. हे एक वेगळेच अद्न्यात आणि अद्भुत जग होते. समोर डाव्या-उजव्या बाजुला दोन दुमजली इमारती आणि समोर एकमजली इमारत होती. गार्डने आम्हाला डावीकडील इमारतीत नेले. तो आमच्या एकही प्रश्नाचे उत्तर देत नव्हता त्यामुळे अद्न्याताचे भय वाढतच चालले होते.
गार्डचे नांव साठे आहे एवढेच त्या प्रवासात समजले होते. त्याने डावीकडील दुमजली इमारतीत नेले. चाव्यांनी ते बंद अवजड भरभक्कम गजाड दार उघडले. १०० फूट लांब आणि ३० फूट रुंद...( हे मी नंतर खुप दिवस रहावे लागल्याने पावलांनी अंदाज घेत मोजले) असा तो हाल. त्यात जवळपास १२५-१३० कैदी. दुस-या टोकाला टी.व्ही. (ब्ल्याक व्हाइट) आणि त्या परिसरात मात्र बरेच अंतर मोकळे आणि मर्यादित कैदी कोंडाळे करुन बसलेले. इतरत्र मात्र एवढी दाटी कि सांगता सोय नाही. साठेने आम्हाला मधल्या प्यसेजमद्धे झोपलेल्या कैद्यांना अक्षरश: लाथाडत त्या टोकाला नेले. तोवर टी. व्ही. बघण्यात मग्न असलेले त्या बराकीतील सर्वश्रेष्ठ कैदी जरा सावधान झाले. एक जण उठुन उभा झाला. तो या बराकीचा नेता, वार्डन, हे लगेच लक्षात आले. उंच-धिप्पाड आणि येशु ख्रिस्तासारखा दाढीधारी चेहरा. साठेने सांगितले, "यांची व्यवस्था लाव मुजा..." आणि तो निघुन गेला.
मी बावचळल्या अवस्थेत आता काय करायचे, या विचारांत तसाच उभा राहिलो. मुळे तर पार गळाठुन गेला होता. सर्वत्र एक कोंदट वास भरला होता. तो एकत्रीत वास बीड्या-गांजा आणि गर्दचा असतो हे नंतर कळाले.... सवयच झाली तेंव्हा. खिडक्यांवर नासके कपडे काय आणि साठवुन ठेवलेले अन्न काय...सर्वत्र सर्वांचा वास...येथे आम्हाला रहावे लागेल? होय...रहावेच लागेल. मी कोणत्याही परिस्थितीला सहज अडजस्ट होणारा...पण या बिचा-या मुळेचे काय? त्याला किती हाल-अपेष्टा सहन करु द्यायच्या?
एप्रील २००३. उन्हाळा कडक होता. जेलमद्ध्ये पंखे असण्याचे कारण नव्हते. ते लाड कोण पुरवणार? मला आता शिक्षा झालेल्या कैद्यासारखे वाटु लागले होते. संताप उमदळत होता. पण आलेले भोग भोगण्याखेरीज गत्यंतरही नव्हते...
एकाच दिवसाचा तर प्रश्न होता ना?
मुजा (त्याचे पुर्ण नांव मी येथे देत नाही.) मला म्हनाला..."बैठो भाईसाब...ये चद्दर छोडिओ...आपको बढिया देता..."
हे भाईसाब हे नांव मला जे चिकटले ते चिकटलेच. बसलो. मला वाटले मुजा आम्ही का कशासाठी जेलमद्धे आलो यावर वायफळ प्रश्न विचारेल आणि उत्तरे देण्यात आपल्याला आपला जी विचार करायची गरज वाटतेय ते काही होणार नाही. पण तो जास्तच सुज्ञ निघाला. त्याने काही प्रश्न विचारलाच नाही. त्याने हुकुम सोडला आणि काही वेळातच अंथरायला, पांघरायलाच काय उशालाही घेता येतील एवढ्या चादरी (कांबळी) आमच्याजवळ जमा झाल्या.
तुरुंगाबद्दल माझ्या समजुती वेगळ्या होत्या. तुमच्याही असतील. त्या सर्वच कोसळल्या हेही खरे. कोणच्याही वाट्याला असे दुर्दैव येवू नये. दुर्दैवातील सुख आणि तुरुंगवासीयांची माणुसकी काय असते हेच मला येथे सांगायचे आहे.
त्या रात्री झोपेपर्यंत ते माझ्याशी आणि मुळेशी सहज संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्या खाण्याच्या आग्रहाला नकार देत होतो. आश्चर्य म्हनजे त्यांना माझे नांव माहित होते. आमच्यावर काय आरोप होते हेही माझ्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने माहित होते...वर्तमानपत्रेच ती..कशाला कसर ठेवतील? मला वर्तमानपत्रे वाचायला मिळाली नसली तरी तुरुंगात वर्तमानपत्रे येतातच की हे मी विसरलोच होतो!. माझी एवढी प्रसिद्धी (?) वर्तमानपत्रांनी केलेली होती कि मी आज ना उद्या येथे येणारच हे या तुरुंगवासियांना माहितच होते...,मुजाने ते खात्रीशीरपने सांगितल्यावर आणि नंतर अनेक त्याच तुरुंगातील कैद्यांशी भेट झाल्यावर लक्षात आले...कि माझा संशय निराधार नव्हता,...अत्यंत सुडबुद्धीने कायदेप्रणाली राबवत माझा विनाश करण्याचा हा कट होता...आणि मी त्याचा एकटाच बळी नव्हतो...
असो. दुसरा दिवस उजाडला. सकाळी सहा वाजता सर्वांना उठवले गेले. मग सर्वांना जोडी-जोडीने एका रांगेत बसवण्यात येवुन गार्डने गिनती केली. रात्रीच्या गिनतीशी ती बरोबर म्यच झाल्यावर मग दार उघडले. आम्ही बाहेर पडलो.
उगवत्या उन्हातील जेलचे द्रुष्य रात्रीपेक्षा आल्हाददायक होते. दोन दुमजली बराकींच्या मधोमध एक पाण्याचा विशाल सिमेंट-कोंक्रीटचा ट्यांक होता व नळावर कैदी बांधव स्नान करत होते. खाली मैदानावर एकीकडे काही तरुण कैदी वोलीबाल खेळत होते तर डाव्या बाजुला एक काळाकुट्ट मध्यमवयीन माणुस कैद्यांकडुन व्यायाम करुन घेत होता. आम्हीही त्यात सामील व्हावे नाहीतर शिक्षा होईल असे एका कैद्याने म्हटल्यावर मग आम्ही दोघेही त्या व्यायामकर्त्या कैद्यांच्या रांगेत आलो आणि जमेतील तसे हातवारे करत व्यायाम शिकु लागलो. ते झाल्यावर मग साने गुरुजींचे "खरा तो एकची धर्म...जगाला प्रेम अर्पावे..."
मला मी दहिगांव (संत) येथे पहिलीत असतांनाचे दृष्य आठवले. आमचे आनंदा मास्तर हेच गीत डोळ्यांत अश्रु आणत आम्हाला पाठोपाठ म्हणायला लावायचे. गुरुजी भावूक होवून रडतात म्हणुन आमच्याही डोळ्यांत पाणी यायचे. येथेही डोळ्यांत अश्रु आले खरे, पण येथील परिस्थिती वेगळी होती. माणुसकीचे धिंडवडे निघाल्याचे पहावे लागल्यानंतर ही प्रार्थना म्हनावी लागणे हे त्या प्रार्थनेचेच एकार्थाने धिंडवडे होते. बाजुला वोलिबाल खेलणारे त्यांच्या नादात होते...त्यांचा नेम चुकला कि तो बाल इकडे येवुन आदळे. पण त्या कंडक्टर ओफ़ प्रार्थना सेरेमोनीची हिम्मत नव्हती कि त्यांना थांबवावे.
प्रार्थना संपली. मी व मुळे परत आमच्या बराकीकडे निघालो. वाटेत मुजा भेटला..."भाईसाब...कहां थे आप?"
मी त्याला सांगितले...तो म्हणाला, "आज के बाद कभी मत जाना...कोई जरुरत नहीं"
मी सुटकेचा निश्वास सोडला. मला कोठे हौस होती आणि मुजा हा काही जेलर नव्हता हे खरे... आणि मी अजुन जेलरला पाहिलेच कोठे होते?
पण एक संरक्षक कवच मिळाल्याचा आनंद होताच. कारण या नव्य जगात आम्ही तसे जगू शकण्याची सुतराम शक्यता नव्हती हेही खरे.
तेवढ्या वेळात दोन्ही इमारतींच्या वरांढयांत भलीथोरली पातेली घेवुन चहावाटप सोहोळा सुरु होता. हातात पाट घेवून कैद्यांची रांग लागली होती. पाट म्हनजे अल्युमिनियमचे भांडे. त्यात मिळेल तेवढा चहा घेतला जात होता. मुजाने आम्हाला चहापानासाठी बोलावले. त्या रांगेत उभे राहणे मला शक्यच नव्हते. मी तसे म्हणाल्यावर तो हसला...म्हणाला "भाईसाब...आप अंदर आवो...आपको कौन बोल रहा हैं कतार में खडा होने को?..."
मी आत गेलो. पहातो तर काय एक छोटी विटांची चुल पेटलेली होती आणि त्यावर चहा-पुनर्प्रक्रिया उद्योग सुरु होता. चहाची अधिकची पत्ती आणि त्यात साखर घालुन नव्याने चहा बनवला जात होता. आम्ही तरीही "नाही" म्हणत होतो. पण मुजाने तो चहा पाजलाच. तो दिव्य चहा केवळ आग्रहाने प्यायलो हेही खरे. नंतर सवयच झाली.
त्याचे आभार मानून आम्ही परत बाहेर आलो.
जेलमद्धे ही चहापत्ती आणि साखर कशी आली हा प्रश्न मला सतावत होताच!
त्याची उत्तरेही पुढे मिळाली...आणि असा चहापान आपचा दैनंदिन कार्यक्रम बनला हे मात्र खरे.
अन्य कैदी मात्र त्या जेलचा चहा...खरे तर त्याला चहा म्हनण्यापेक्षा गढुळलेले रंगीत पाणी यापेक्षा दुसरा शब्द वापरता येत नाही, तोच पित असत.
मला सिगारेटची प्रचंड तल्लफ आली होती. माझ्याकडे पैसे नव्हते. असते तरी तेथे कोणतेही दुकान नव्हते. मुळे मस्त निर्व्यसनी. पण त्याला माझी सवय माहित. पण तो आधीच एवढा गोंधळलेला...बावरलेला तो त्या या नव्य भयकारी व्युहात काय करनार?
मी आपला "काही तासांचा तर प्रश्न आहे..." अशी समजूत घालत वेळ कसा पुढे जात नाहीहे याचीच चिंता करण्यात मन रमवू लागलो.
आणि माझ्या कानावर हाक पडली..."सोनवणीसाब..."
मी बघीतले तर काय तर तात्या! एक वृद्ध गृहस्थ. मी इस्लामपुरच्या कोठडीत असतांना तेथे थंड फरशीवर झोपावे लागल्याने माझी पाठ दुखायला लागली होती. तेंव्हा हा तात्याही त्याच कोठडीत बुटलेगिंगच्या आरोपात (?) होता. त्यानेच रुपयाचा एक तेलाचा पाउच आणुन माझ्या पाठीची मस्त मालिश केलेली. त्याचे पोलीस कस्टडीतील असने हे पोलिसांच्या आपराधिक गणपुर्तीचे एक साधन.
पण तो येथे कसा? या जेलमद्धे? मला प्रश्न पडले...कारण काही गुन्ह्यांचा कोरम भरुन पोलिस अशा नेहमीच्या आरोपींना जामीन मिळू देतात असे मला तोच म्हणाला होता.
माझ्याकडे विचारायला खुप प्रश्न होते. पण माझ्यापेक्षा अधिक त्या नि:ष्पाप माणसाच्या विझत्या डोळ्यांत होते. तो उठला...अत्यंत दयनीय स्वरात म्हणाला..."सायेब...त्यांनी माझा जामीन केला नाही...फुकट लटकवले मला..."
मला महित होते कि बोगस केस केल्या कि आपली क्राइम रजिस्टरची आकडेवारी सिद्ध करत मग बुटलेगर्सना सोडुन द्यायचे ही खास पोलीसी रीत. पण तात्याच्या बाबतीत अघटीत झाले होते. त्याचा जामीन झालाच नव्हता. तो आमच्याप्रमानेच येथे एक कैदी म्हणुन आला होता.
तो पुढे आपले गा-हाने अधिक गाणार हे मला माहित होते आणि त्यात वावगे काही नव्हते. पण तो मला चकित करत म्हणाला..."साहेब, सिगारेट नाही?"
मी म्हटलो..."नाही..."
त्याने विचारले..."साहेब...काही पैसे आहेत तुमच्याकडे?’
मी म्हणालो "नाही."
खरे तर पाणी माझ्या डोळ्यांत तरळायला हवे होते...पण तोच रडु लागला. त्याचे रडने कसे आवरावे हेच मला कळेना. मुळे त्याच्या पाठीवर हात फिरवत त्याला शांत करायचा प्रयत्न करु लागला. पण एकाएकी तो सावरला...मला म्हणाला..."साहेब...थांबा...मी आलोच..."
आणि तो गेलाही.
आम्ही त्या जेलमधील प्रात:कालीन गोंधळाचे, भांडनांचे अलिप्त साक्षीदार होत तात्याची वाट पहात होतो. आज सायंकाळी आम्ही या जेलमद्धे नसणार हा दिलासाच किती आश्वस्त करनारा होता...मी कधीतरी हे अनुभव कथा कादंब-यांत वापरणार होतो...लिहिलेच कदाचित तर आत्मचरित्रातही. एका अर्थाने जशी इस्लामपुरची कोठडी, माझी निघालेली धिंड हे थ्रिल मी अलिप्तपणे अनुभवले होते तसेच हेही एक थ्रिल होते. मी निरपवाद मनाने हे सारे न्याहाळत होतो.
तात्या आला.
त्याच्या हातात दोन छोट्या विल्स सिगारेट होत्या. डोळ्यांत पाणी होते. म्हणाला...
"साहेब...माझ्या कशात मी दडवुन दोन रुपये आनले होते...आणि तेवढ्यात एवढेच मिळाले कि हो..."
कढ माझ्याही घशात दाटुन आला होता...पण मी त्याने दिलेल्या सिगारेट घेतल्या.
जेलमद्धे मिळते तरी काय काय हा प्रश्न मला आता सतावू लागला होता...
मी जेलमधुन बाहेर पडेपर्यंतही हा तात्या आतच होता. मी त्याला माझ्या अन्य स्थानिक मित्रामार्फत नंतर जामीन देवून त्याला मुक्त केले...मग त्याच्या गांवीही गेलो...तो उत्सव काही वेगळाच होता.
अकरा वाजले. (तुरुंगात घड्याळ ठेवता येत नाही. दर तासाला टोल पडतात.) कैदी अजुनही कोंडाळी करुन पटांगनात गर्दी करुन होते. तोवर जेवणही वाढले गेले होते. आम्हाला खाण्यात कसलाही रस नव्हता. पण तरीही हे सारे कैदी कशाची तरी वाट पहात होते. त्यांचे डोळे त्या मधल्या बंद द्वाराकडे लागले होते. त्यापलीकडे ती आमराई, छोटे शेत आणि मग उप-दरवाजा आणि कैद्याला मुक्त करणारा कडेकोट बंद असा महादरवाजा. मी मुळेशी पुण्यात काय चालले असेल, बाकी संचालक आणि व्यवस्थापक मंडळी दैनंदिन कामकाज कसे पहात असतील...यावर बोलायचा प्रयत्न करत होतो...पण मुळे मुकच होता. तो काहीतरी माझ्यापासुन लपवत आहे असे मला वाटु लागले. मला त्यावेळी वाटले होते कि तो अकारण या स्थितीत सापडल्याबद्दल खंतावलेला असावा. पण ते तसेही नव्हते. पुढे मला कळाले कि त्याने माझ्याशी पोलिसी दडपनाला बळी पडुन आणि स्वत:ला सुरक्षीत ठेवण्यासाठी गद्दारी केलेली होती. खरे तर त्याची काहीएक गरज नव्हती. त्याचा मुळात जेही काही असेल त्याशी काहीएक संबंधच नव्हता. पण त्याबाबत त्याने मला एकदाही सांगितले नाही कि स्वत:ला सुरक्षीत ठेवण्यासाठी पोलिस म्हणतील तसे स्टेटमेंट न्यायाधिशासमोर लिहून दिलेय......अगदी ५१ दिवस एकत्र असतांनाही त्यावर तो काही बोलला नाही. ते मला कळाले जवळपास दोन वर्षांनंतर...मग मात्र त्याने माझे तोंड चुकवले ते चुकवलेच! त्याचीही गरज नव्हती. कारण कसेही स्टेटमेंट दिले असले तरी सत्य बदलणार तर नव्हते!
असो. हे महत्वाचे नाही.
अकरा वाजले. एक गार्ड आला...एका विशिष्ट स्टाईलमद्धे त्याने ज्यांची पत्रे आली होती त्या नांवांचा पुकारा केला. ज्यांची आली होती ते खुष होते तर ज्यांची आली नाही ते निमुट होते. ज्यांना पत्रांची आशाच नव्हती ते आत बराकीत बसुन आपापल्या वाट्याचे ते कदान्न खात बसले होते.
नंतर अर्ध्या तासात अजुन एक गार्ड अवतरला. त्याचा पुकारा होता ज्यांचा जामीन झाला आहे आणि आता मुक्त आहेत अशांचा. हा पुकारा आदल्या दिवशी उशीरा ज्यांचा जामीण झाला असतो त्यांच्यासाठीचा. आमचा असणे शक्यच नव्हते. काल सायंकाळीच तर आमचा जामीण नाकारला गेला होता...पण आज सायंकाळी आमचाही जामीण-मूक्त असा पुकारा होनार यावर विश्वास होता...किती वेळ उरला बरे? सायंकाळी पाच वाजता? ओके. तेवढी वाट पाहण्याची हिम्मत होती.
आणि ज्यांचा जांमीण झाल्याचा पुकारा होत होता...ते ज्या आनंदाने आपापले सामान घ्यायला धावत होते...एकमेकांना मिठ्या मारत ऋणानुबंध जतावत बाहेर मुक्त हवेचा श्वास घ्यायला प्रमुदितपणे धावत होते...
बारा वाजता बंदी. म्हनजे सर्वांनी आत जायचे. मग गिनती. एक प्रथा. एक कैदी ज्यादा वा कमी भरता कामा नये. आकडे जुळले कि मग गार्ड बाहेरुन कुलुपबंद करणार. आम्हीही आत आलो. आजच बाहेर पडणार म्हणुन काही वेळ सहकैद्यांशी गप्पा मारण्यात, त्यांना जाणुन घेण्यत काय हरकत होती?
मुजा पहिला. मुजा स्वत:बद्दल बोलायला तयार नव्हता. दुसरा एक काळाकुट्ट पण लोखंडाच्या कांबीसारखी शरीरयष्टी असलेला आणि २८ चो-यांचे गुन्हे दाखल असलेला क्रुष्णा. (पैकी ८ गुन्हे त्याने खरोखरच केले होते आणि त्यांत मात्र तो निर्दोष ठरला होता. आणि जे त्याने केलेच नाहीत त्याबद्दल मात्र सुनावण्या सुरु होत्या...त्याची रोजच सांगली कोर्टात तारीख असे. त्याने एके दिवशी जजला सरळ सांगितले ...(त्याचा वकील नव्हता...अडानी तो स्वत:च स्वत:चा युक्तिवाद करत असे...) अहो महाराज जे गुन्हे मी केले त्यात तुम्ही निर्दोष ठरवलेत कि हो...आता मी हे काय बी गुन्हे केलेले नाहीत...सोडा कि आता तरी मला...त्यावर जज हसला होता म्हणे.) मी तेथे असेपर्यंत तरी त्याला मुक्त केले गेले नव्हते. असे म्हणतात कि जेलमधील सहकैद्याला चुकुनही स्वत:चा खरा पत्ता द्यायचा नसतो. पण मी त्याला दिला होता आणि म्हणालो होतो..."लेका...सरळ डोअरबेल वाजवुनच घरात ये...नाहीतर पाईपवरुन चढुन यायचास सरळ बेडरुममद्धे..." हा बराच काळ त्या जेलमधील विनोद बनला होता. पण क्रिष्णा कधी बेल वाजवुनही ना आला ना पाईपवर चढुन...)
अजुन एक वल्ली होता. त्याला शिक्षा झालेली नव्हती. (हे उप-कारागृह असल्याने येथे फक्त कच्चे कैदी ठेवले जात.) मध्यमवयीन पण काटक माणुस. पण तो गेली तीन वर्ष येथे होता. कारागृहीय शेतात काम करुन कमाई करुन पट्ठ्या जगत होता. तो एका सहकारी ब्यंकेत शिपाई होता. शिपाई म्हनजे येथे ओफिसबोय असे घ्यावे. आणि त्या ब्यंकेत म्हणे महाघोटाळा झाला आणि २०-२२ लोक पकडले गेले त्यातील हा महाभाग. बाकी सारे जामीनावर बाहेर...पण हा मात्र जामीण घेतच नव्हता. त्याचे म्हनने हे कि
शिक्षा किती होईल समजा झाली तर? तर ५ वर्षे. काय करायचे बाहेर जावून? सारे दळींदर लोक...हरामी बायको आणि कुत्र्याच्या अवलादीचा समाज...येथेच बरा आहे...आश्चर्यकारक खरे पण खरेही. बाहेरचा समाज हा या कैद्यांपेक्षा नालायक असतो हे मीही अनुभवत नव्हतो काय? तो त्या दिवशीही आमराईतुन कै-या घेवुन आला होता. त्या दिवशी जरी मी व मुळे जेवलो नसलो तरी त्या कै-या मात्र खाल्ल्या होत्या. नंतर तर जेलमधील, पण मुजाच्या हंडीतुन प्रक्रिया झालेले जेवण खातांना, चवीला त्याने आनलेल्या कै-या हा अम्रुततुल्य अनुभव असायचा.
हे चालले होते हे खरे पण मनात पाच कधी वाजतात हे होतेच. एक एक क्षण जड वाटत होता. ते ओझे वाढत होते आणि त्या ओझ्याखाली मी अनेक प्रश्नांची उत्तरे देत होतो,...प्रश्न विचारत होतो...हा माझा येथील अखेरचा दिवस...गोळा करता येतील तेवढे अनुभवाचे क्षण गोळा करुयात...
पुढचे ४० दिवस मला तेच करावे लागणार होते...फक्त मला त्याची त्यावेळी जाणीव नव्हती एवढेच.
चार वाजले. गिनतीनंतर गजाड दार उघडले. अतीव उत्सुकतेने आम्ही बाहेर आलो.
चार ते पाच...एक तास...खरे तर ६० मिनिटं...आणि अधिक खोलात जायचे तर ३६०० सेकंद. एक सेकंद केवढा जीवघेणा असु शकतो? जवळ येवुन विचारपुस करणा-यांबद्दल चीड. मी बाहेर पडताक्षणी जयंत पाटील ते विजय पाटीलांची प्रेस कोन्फरंस घेवून कशी वाट लावणार...इस्लामपुरच्या जजांपासुन ते मला अकारण अटक करणा-या पोलिस इन्स्पेक्टर सर्जेराव गायकवाडाला कसा हाय कोर्टापुढे खेचणार...माझ्या योजना ठरलेल्या होत्या. फक्त पाच वाजता माझा व मुळेचा जामीण यायला हवा.
पाच वाजले. पण ते द्वार उघडले नाही. मुळेचा चेहरा वेदनांनी पिळवटत चालला होता. मी त्याचा हात हाती घेतला...मुळे...काळजी करु नकोस...आपण काहीएक चुक केलेली नाहीहे... हे जे चाललेय ते एक दु:स्वप्न आहे...विरेल ते...नक्कीच विरेल...
पण तसे व्हायचे नव्हते.
जामीनाचा पुकारा आला. छाती फुटेल एवढ्या आवेगाने...कानांत आत्मा आणुन जामीण झालेल्यांचे नांव ऐकले...
आमचे नांव त्यात नव्हते.
मग जरा जेलमधील जीवन अंगवळनी पडले. बंधु विनोदने मला व मुळेला चड्ड्या, टूथपेस्ट-ब्रश आणि काही कपडे पाठवले. तेथेच लक्षात आले...आमचा जामीण सेशन कोर्टानेही नाकारला आहे. आणि आता हाय-कोर्टाखेरीज पर्याय नाही.
उन्हाळ्याच्या कोर्ट सुट्ट्या सुरु झाल्या होत्या. म्हणजे एकच बेंच बसनार. अवघ्या महाराष्ट्रातील कोणत्याही केसेस असोत त्या एकाच बेंचसमोर येणार....आणि त्यात आमचे दुर्दैवातील महादुर्दैव असे कि कर्णिक महोदयांची एम.पी.एस.सी. परिक्षा घोटाळ्याची केसही तेंव्हाच हाय कोर्टसमोर यायची होती.
असो. मीच नव्हे तर राज्यातील असे हजारो बंदी त्या उन्हाळी सुट्ट्या आणि अशाच दिर्घकालीन चालणा-या केसेसमुळे अडकुन पडले असतील.
त्यांत आम्हीही होतो हे आमचे नशीब!
जेलमद्धे दर मंगळवारी जेलर कांबळे कैद्यांची तपासणी करायला येत असत. खरे तर जेलमद्धे केस वाढवलेले असणे हे महत्पाप. कांबळे मुजाला त्याच्या या मस्तकीय आणि चेहरीय केसव्रुद्धीबाबत लेक्चर देत असे. मग नंतर मी. मला तो "लबाड...चोर...बदमाश" म्हणत पुढे जाई. मुळेला बोलायला त्याच्याकडे शब्द नसत. या पद्धतीने तो आपला साप्ताहिक कार्यक्रम उरकुन पुढे जाइ.
येथे या जेलर कांबळे महोदयांबद्दल थोडक्यात लिहिणे उचित ठरेल. हा माणुस महाभ्रष्ट होता, कैद्यांना जे अन्न ते औषधांचे अनुदान असे ते तो जवळपास स्वता: लाटत असे. जेलमद्धे कसलीही औषधे उपलब्ध नसत. उदा. मला डायबेटीस होता आणि ग्लायकोमेटच्या गोळ्या मला देणे हे जेल प्रशासनाला बंधनकारक होते. त्या मला कधीच मिळाल्या नाहीत. अर्थात जेलमधील जेवण हे (प्रक्रिया करुनही) एवढे भारी असे कि मला गोळ्या न घेता कधीही मधुमेहाचा त्रास जाणवला नाही. शरीरातील साखर वाढायला त्या अन्नात काही शर्करी असायला हवी कि नको? जगातल्या मधुमेहींनी ही खास तुरुंगीय ट्रीटमेंट घरातच घेतली तर मधुमेह नाहीसा होईल हे मी अनुभवाने सांगू शकतो.
दर शुक्रवारी जेलमद्धे सायंकालीन एक कार्यक्रम असे, म्हणजे सांगलीतील अनिरुद्धबापुंचे भक्त जेलमद्धे येत आणि कैद्यांना सत्संग घडवत. (हे मी नंतर येरवडा जेलमद्धेही पाहिले आहे.) या सत्संगींमुळे जेल पवित्र होईल असा काहीतरी समज असावा. मी एक कार्यक्रम आवर्जुन...मुजा फारच विरोधात होत आणि खरे तर नाईलाज म्हणुन मुद्दाम अटेंड केला. बाकीचे मात्र तो प्रत्येक कार्यक्रम उत्साहाने अटेंड करत असत. अनिरुद्ध बापुंच्या आई-वडील ते भाऊ-बहीणी या स्मरणानंतर अनिरुद्ध बापु हे क्रुष्णावतार असे वंदन झाले कि मानवी जीवनाचे तात्विक वाभाडे निघायला सुरुवात. मद्धेच भजने...आणि त्या साधकांच्या तत्वद्न्यानाची पोपटपंची बरसात.
माझे एवढे मनोरंजन कोणीच कधी केलेले नसेल!
तो तुरुंग होता. खरे आहे. तुरुंगाने तुरुंगासारखे असने यातच तुरुंगाची महत्ता आहे आणि त्यात वावगे वाटायचे कारण नाही. पण त्याच तुरुंगात गर्द, अफु आणि अन्य मादक द्रव्यांच्या आरोपात असनारे कैदी होते. पण तुरुंगात हीच सर्व द्रव्ये मुबलक उपलब्ध होती. उदाहरणार्थ याच जेलमद्धे आयुष्यातील पहिला गांजा मी प्यालो...
येथे साखर, मिठाया, तिखट ते साखर...सारेच उपलब्ध होते...पण पैसे द्यायची ताकद पाहिजे. आणि हे पैसे कसे येत? मी स्वत:च नंतर आणले असल्याने खात्रीशीर अनुभवाने सांगतो...जेलगार्डला बाहेर ५०० रुपये दिले कि तो ३०० रुपये मागवणा-यापर्यंत पोहोचवत असे. त्यात त्याला समजा १ किलो बटाटे घेवुन ये असे सांगितले कि त्यावेळी ५-६ रुपये किलोचा बटाटा २०-२२ रुपये किलोने तो आत आणुन द्यायचा. माझ्या सिगारेटी याच मार्गाने इम्पोर्ट होत! मी विनोदाने म्हणे "साला दुबईत रहिल्याप्रमाणे वाटतेय!"
मला पैसे कोण आणुन देत होते? एक काळे नावाचा माझा एक पुण्यातील स्टाफ होता. तो मी आत आहे म्हणुन सांगलीत येवुन काही काळासाठी स्थाइक झाला होता. त्याला ना माझ्या बंधुंचा पाठिंबा होता ना कंपन्यांची वाट लावून नंतर लगोलग राजीनामा देवुन मोकळ्या झालेल्या संचालकांचा. त्याने तेथील गार्ड पुरेपुर पटवुन मला सिगारेट ते पैसे स्वत:च्या खिशातुन खर्च करत आत पाठवले.
मी त्याचा क्रुतज्ञ आहे.
सांगली जेलमद्धे मी मानवी जीवनाची फसगत म्हणजे नेमके काय असते हे अनुभवले. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपली प्रत्येकाने फसगत केली आहे असे वाटतच असते. मीही या तत्वाला अपवाद नव्हतो. प्रत्येक माणसाची स्वत:ची एक बाजु असतेच. कोणती बाजु न्याय्य हे अन्यायी लोकांनी न्याय्य लोकांना सांगायचे कि न्याय्य लोकांनी अन्यायींना?
आणि काय न्याय आणि काय अन्याय याची व्याख्या नेमकी कोणी करायची?
कोणाची व्याख्या खरी धरायची?
चार भिंतीआंत गाडुन बसना-यांसाठी ते ठीकही असते कारण त्यांनी मुळात जीवनाचा हा नग्न चेहरा कधी पहिलेलाही नसतो.
दिवसांमागुन दिवस जात होते. तो एम.पी,एस.सी.चा प्रश्न माझी केस हायकोर्टासमोर येवु देत नव्हता. आमचा जामीण होता होत नव्हता.
जेलीय रुटीन मीच बदलले. हीही एक गम्मतच आहे. आयुष्यात मी कधी नशीबावर विश्वास ठेवला नव्हता...आता जरा बसतोय...पण ते नंतर. झाले काय एके सकाळी मी उदास मुळेचा हात हाती घेतला आणि त्याच्या हस्तरेषा बघु लागलो. माझे वडील उत्तम ज्योतिषी आहेत. शिकायला माझ्यासारखा विद्यार्थी नसेल. मी खरे तर मुळेला धीर देण्यासाठी काही भुलथापा मारणार होतो. पण गम्मत सांगतो...मी मुळेचा हात पहातोय हे दिसताच २०-२५ कैदी बाजुला जमा झाले आणि आपापले हात चोळत माझ्याकडे अपार उत्सुकतेने पहायला लागले.
तुम्हाला नवल वाटेल...उर्वरीत २५-२६ दिवसांत मी किमान ७-८०० हात पाहिले. प्रत्येकाचा अंतरात्मा मला हे काकुळतीने विचारु पाही कि जामीण कधी होनार? कोणी साध्या मारामारीत आत होता तर कोणी कौटुंबिक अदावतीत आत आला होता. कोणी चोर होता तर कोणी गर्द-गांजा अशा मादक पदार्थांच्या विक्रीप्रकरणी आत होता. एक पत्रकार बायकोने बलात्काराची तक्रार केली म्हणुन आत होता. कोणी आपण निर्दोष असल्याचे सांगत होता तर कोणी कोणाच्या तरी बदली म्हणुन आत आलेला होता.
खरे काय खोटे काय हे सांगायला मी तज्ञ नव्हे, पण बव्हंशी लोक अमावस्या...अष्टमी व पौर्णिमेचा जवळपास अटक झाले होते वा त्यांचे अपराध त्याच काळात झाले होते.
सायंकाळचा मीच एक प्रवचनकारही बनलो. धर्म काय...विश्वनिर्मिती काय...आणि जगण्याचा अर्थ काय असे मी मलाच जीवन यत्किंचितही न कळता ठोकुन देवु लागलो.
वेळ जात होता ना...
आणि लोकांनाही खूप प्रश्न असत...स्वत:चे असत तसेच जगाबाबतही असत.
जमेल तेवढी उत्तरे देण्यापलीकडे मी काय करू शकत होतो?
खरे तर मला तरी कोठे काय माहित होते? साधा माझा जामीन कधी होनार हेही माहित नव्हते. मी येथे का आहे हे तर त्याहुनही माहित नव्हते. बाह्य जगाशी पुरता संपर्क तुटलेला होता. काळे चिठ्ठ्यांमधुन कळवे तेवढेच त्रोटक...
माझे प्रवचन टी. व्ही. सुरु करतावेळी संपायचे.
एकच दूरदर्शनचा च्यनेल...तीच "ठंडा ठंडा डर्मी कूल"ची जाहिरात..त्या असह्य उकाड्यात हवीशी वाटायची....कसलाही कार्यक्रम असो...पाहिलाच जायचा...
खालच्या मजल्यावरील टी.व्ही. वरच्या मजल्यावर गेला कि मुजा आम्हाला वर घेवुन जाई. त्याचा मोठाच वट होता तिथे.
तो आत का?
त्याने म्हणे त्याच्या बायकोला ठार मारले होते.
पार विधानसभेत त्याच्या या कृत्यावर गदारोळ झाला होता.
पण त्याच्या बायकोचे प्रेतच अद्याप सापडले नसल्याने कायदाही त्याला फक्त आत ठेवत होता...काहीच करु शकत नव्हता.
आम्ही या जेलमधुन बाहेर यायच्या तीन दिवस आधी एक कन्नडीगा वयोव्रुद्ध कैदी याच जेलमद्धे आला. त्याला स्वाभाविकच सर्व कैद्यांची रांग संपते तेथे, म्हणजे संडासाशेजारी, जागा मिळाली. तो आजारी होता. त्याला उठवत नव्हते. मी मुजाला विनंती केली. मुजाने जेलर कांबळेला भेटुन विनंती केली कि त्या शरणाप्पाला दवाखान्यात दाखल करावे. कांबळेने ऐकल्याचे नाटक केले.
तो कैदी तसाच पडुन राहीला. मी व मुजाने त्याला जे आमच्याकडे सर्वोत्क्रुष्ठ होते ते त्याला भरवायचा प्रयत्न केला. त्याने ते सारे ओकुन काढले. आम्ही चिंतेत पडलो. त्याची तब्बेत पराकोटीची बिघडत गेली. पण रात्र झाली होती. दार बंद होते. कोणी गार्ड तेथे नव्हता.
दुस-या दिवशी सकाळीच आम्ही त्याला बाहेर काढले. गार्डना हाक मारली. ते त्याला मेन गेटजवळ घेवुन गेले. मुजा त्यांच्यासोबत गेला.
काही वेळाने मुजा परत आला...तो अस्वस्थ होता...
तुरुंगाच्या दारापाशीच तो बिचारा शरणाप्पा मरुन गेला होता
.
पण त्याचा म्रुत्यु जाहीर असा झाला कि जणु तुरुंग प्रशासनाने आजारी शरणाप्पाला सिव्हिल होस्पिटलमद्धे दाखल केले होते तेथे उपचार करत असतांना त्याचा म्रुत्यु झाला.
आणि त्यानंतर दोनच दिवसांनी माझ्या व मुळेच्या जामीनाचा आदेश आला.
आम्ही मुक्त झालो.
आम्हाला घ्यायला विनोद आणि त्याचे सासरे आले होते. दादासाहेब आढावांनी आम्हा दोघांना जामीण दिला होता. जेलचा दरवजा आम्हाला बाहेर काढुन परत बंद झाला.
मी बाहेर आल्यानंतर प्रथम काय केले असेल तर शरणाप्पाच्या म्रुत्युबद्दल जेल प्रशासन ते ग्रुहमंत्र्यांना पत्रे पाठवली...
त्याची दखल एवढीच कि जेलर कांबळेसाहेबांची बदली झाली.
कायद्याकडुन आपण काय अपेक्षु शकतो?
त्यानंतरची माझी लढाई काय होती हे नंतर कधीतरी...
तत्पुर्वी मी मुळात आत कसा गेलो हे समजावुन घेण्यासाठी या http://sanjaysonawani.blogspot.com/2011/07/blog-post_5657.html लिंकला भेट द्यावी ही विनंती.
Saturday, May 7, 2011
दिवस तसेही...दिवस असेही...(प्रकरण ९)
साहेबाच्या देशात!
हीथ्रो विमानतळावर विमान उतरले तेंव्हा अपेक्षेप्रमाणे ढगाळ वातावरण होते. जो सळसळता उत्साह मला नेदरल्यंडमद्धे जाणवला होता तसा उत्साह येथे जाणवला नाही. पण विमानतळ होता अवाढव्य आणि आधुनिक. कस्टमने येथेच पहिल्यांदा अडवले. माझ्याजवळ लोहभुकटॆएचे नमुने होते. त्यांना वाटले ही गर्द तर नाहीना? मी त्यांना समजावून सांगितले पण त्यांना लोहभुकटी नावाचे उत्पादन असते हेही समजेना. मी म्हणलो चुंबक आणा...आणि पहा...आणि गर्द वजनाने एवढी जड असते का? तेंव्हा कोठे माझी सुटका झाली. हसुन त्यांनी मला निरोप दिला.
इंग्लंडच्या अंडरग्राउंड रेल्वेसेवेबद्दल खूप ऐकले होते. आता प्रवास करतांना मजा आली. मी किंग्ज क्रोस येथे उतरलो. मला किंग्ज क्रोस रेल्वे टेर्मिनसवरुनच पुढील प्रवास करायचा होता...पण अर्थात दुस-या दिवशी. मी जवळच एक होटेल शोधले आणि रुम घेतली. फ़्रेश होवुन बाहेर पडलो. सायंकाळ झली होती. मी बकिंगह्याम राजवाड्यच्या परिसरात आलो. राणीचे जगप्रसिद्ध गार्डसजा एक घोड्यावरुन ऐटीत जाणारा जथा पाहिला, व्हाईट हाल पाहिला आणि परत फिरलो. येथे एक मोठी गैरसोय दुर झाली ती म्हणजे भारतीय रेस्टारंटस्ची कमतरता नव्हती त्यामुळे मनसोक्त जेवण झाले.
दुस-या दिवशी ट्रेन खरे तर दुपारी होती. मला अजुनही काही जागा पहाता आल्या असत्या...उदा. वेस्टमिनिस्टर ब्रीज. पण मी बाहेर न पडता पुढील भेटीसाठीची तयारी करत बसलो. त्यामुळे थेम्स नदी माझ्या दर्शनाला मुकली. आणि मी पुन्हा पुन्हा भविष्यात येथे येणारच होतो...या गोष्टी नंतरही पहाता येतील असा विश्वास होताच...(अर्थात तो कधी खरा झाला नाही ही बाब वेगळी.) मला जायचे होते नाटिंगह्यम कौंटीत. रात्रीपर्यंत एका विवक्षीत स्टेशनवर पोहोचुन रात्री तेथे मुक्काम करुन सकाळी पुढचा प्रवास करायचा होता.
एक महत्वाची बाब येथे नमूद करणे आवश्यक आहे. नेदरल्यंड, इंग्लंड वा अमेरिकेत बव्हंशी कारखाने विकेंद्रितच आहेत. अगदी खेड्यापाड्यांतही विखुरलेले आहेत. त्याउलट महारष्ट्रातच काय संपुर्ण भारतात पराकोटीचे केन्द्रीकरण झालेले आहे. यामुळे एक प्रकारचा बकालपणा आपण वाढवला आहे. मी गडचिरोलीसारख्या दुरच्या भागात करखाना काढला याचा मला सार्थ अभिमान वाटु लागला आणि नेते व उद्योजकांनी यात पुढाकार घावा आणि संतुलित विकास साधावा असे प्रकर्शाने जानवु लागले. परतल्यानंतर मी याबद्दल काही लेखही लिहिले...पण....
रात्री एका खाजगी निवासात (घरगुती) मुक्काम करून दुस-या दिवशी ट्याक्सीने माझा प्रवास सुरु झाला. या आठवनी १५ वर्षांपुर्वीच्या आहेत आणि मी डायरी ठेवत नसल्याने मला गावांची नावे आठवत नाहीत पण ट्याक्सीच्या प्रवासात शेरवूड हे रोबिनहूडमुळे प्रसिद्ध झालेले अरण्य लागले. मी ते उत्सुकतेने पाहिले पण माझी निराअशा झाली...सह्याद्रीतील अरण्ये पाहिलेला मी माणुस...
पण एक होते...तो ऐतिहासिक ठेवा...अवघ्या ३-४०० एकरमधला...ब्रिटिशांनी अफलातुन जपला होता. भारतीयांना सौदर्यद्रुष्टी नाही या विचारावर शिक्कामोर्तब होत होते. पोहोचलो. एका शांत खेड्यात एका बाजुला तो अवाढव्य कारखाना होता. येथे लोहभुकटी बने. त्यांना आमच्या इलेक्ट्रोलिटिक पद्धतीने बनणा-या अतिशुद्ध लोहभुकटीची आवश्यकता होती. त्याचे नमुने मी बरोबर आणलेलेच होते. त्यांचे आटोम्यशन तंत्रद्न्यान मला पहायचे होतेच. कंपनीचा मालक पक्का खनदानी ब्रिटिश. त्याचे कार्यालयही त्याची साक्ष देणारे...पुरातनपणाचा ब्रिटिशी हव्यास जागोजागी जाणवणारा...त्या अत्याधुनिक कारखान्यात! बोलणे अति-सभ्य पण कोरडे. पण त्याने स्वत: त्याचा कारखाना फिरवून दाखवला...२ तास लागले. मग चर्चा...मी नमुने दिले. ते त्याने तात्काळ त्याच्या प्रयोगशाळेत पाठवले...२० मिनिटांत रिपोर्टही आला. आमच्या लोहभुकटीची शुद्धता ९९.१०% एवढी निघाली. स्वारी खूश झाली. पहिली ओर्डेर त्याने नोंदवली १ टनाची...ही नमुना ओर्डर होती. ती जर व्यवस्थित आली तर पुढे अर्थातच मागणी वाढणार होती. मग त्यांच्या तंत्रद्न्यानाबद्दल चर्चा. खरे तर मला ते तंत्रद्न्यान घेण्यात रस नव्हता कारण मी वेगळे स्वस्त तंत्रद्न्यान स्वत: विकसीत करुन व्यापारी दर्जाची लोहभुकटीचे तंत्रद्न्यान विकसीत केलेले होतेच. पण त्यांचे तंत्रद्न्यान समजावुन घेणे आवश्यक होते. ते काम त्याच्या तंत्रद्न्यांनी चोख बजावले.
परततांना मी ट्याक्सीने नव्हे तर ट्रेनने आलो. खेड्यातील ते रेल्वे स्थानक अफलातुनच होते. ब्रिटिश साम्राज्य वैभव आणि ती खानदानी कलाकुसर त्या छोट्या रेल्वेस्थानकावरही जाणवत होती. विशेष गर्दी अशी नव्हतीच...किंबहुना तुरळक प्रवासी होते. मी परत लंडनला आलो तेंव्हा मध्यरात्र झाली होती. मी अहोटेलवर गेलो आणि ताणुन दिली. सकाळी पुन्हा अम्स्तर्ड्यामला परतायचे होते. कारण त्याच रात्री मला के.एल.एम. ची डेट्रोईट फ़्लाईट पकडायची होती.
डेट्रोईटला मला अनेक कामे होती. संजय कुलकर्णी हा माझा आधी झालेला पत्रमित्र आणि नंतर फोनेमित्र मला भेटणार होता. तो तेथील एका लोहभुकटी बनवणा-या मोठ्या कारखान्यात तंत्रद्न्य (पावडर मेटालर्जिस्ट) म्हणुन काम पहात होता. गम्मत सांगतो...हा प्रत्यक्ष कधी न पाहिलेल्या माझ्या रिसेप्शनिस्टच्या प्रेमातही पडला होता आणि तिला फोन करुन तासंतास बोलत असे. मी या फोनिक-प्रेमिकांच्या या प्रणयाराधनाला कधीच आक्षेप घेतला नाही. पण हे प्रकरण पुढे थांबले आणि या रिसेप्शनिस्टने पुढे लग्न केले...पण संजय नावाच्याच माणसाशी. अर्थात तो मी नव्हेच हे येथे नमूद करणे आवश्यक आहे.
मी दुस-या रात्री फ़्लाईट पकडली. आता मी जरा सरावलो होतो. तेंव्हा आंतरराष्ट्रीय उड्डानांत स्मोकिंगसाठी वेगळे भाग असत. आता ते बंद झाले आहे. दुर्दैव. दुसरे काय? मी छानपैकी पेयपान करत सिगारेटचा आस्वाद घेत हा प्रवास केला. डॆट्रोईट तळावर मला घ्यायला संजय कुलकर्णी आला होता. तोवर मी अमेरिकन लोकांचे स्नेहपुर्ण आणि क्यज्युअल वागणे पाहिले होते. त्यांनी माझे सामान तपासायचेही कष्ट घेतले नाही.
संजयच्या कारमधुन आम्ही एका सबर्बमधील त्याच्या अपार्टमेंट्मद्धे आलो. तेथे एका फ्ल्यटमद्धे तो अन्य २-३ मित्रांबरोबर रहात असे. वाटेत आमच्या गप्पा सुरुच होत्या. डेट्रोईट शहर अवाढव्य असुन वाहन निर्मितीत अग्रगण्य आहे हे माहित होतेच. शिवाय येथे निग्रो लोकांची संख्या मोठी. संजय त्यांना "कल्लु" म्हणे. डोन हार्वे हा आमचा अमेरिकेतील वितरक. तो दोन दिवसांनी भेटायला येणार होता व त्याच्याबरोबर मला ४-५ संभाव्य खरेदीदारांची गाठ घालुन देणार होता हेही मला त्यानेच सांगितले.
संजयने त्याच्या दुस-या मजल्यावरील फ्ल्यटमधील एक रुम माझ्यासाठी तयार करुन ठेवली होती. काही दिवस मराठीचा संबंध तुटलाच होता. येथे घरच्यासारखे वाटत होते. त्यामुळे मी खूश होतो. डेट्रोईतला मराठी माणसे भरपूर होती. त्यामुळे येथे वेळ चांगला जाणार याची खात्रीच होती. तसे झालेही. रोज आम्ही तेथील एका भारतीय रेस्टारंटमद्धे जेवण करत असू. भारतीय फुड अमेरिकन लोकांतही लोकप्रिय आहे हे पहातच होतो.
दुस-या दिवशी संजय ज्या कारखान्यात काम करत होता त्याला भेट दिली. मला तो कारखाना मुळीच आवडला नाही. उत्पादन पद्धती अत्यंत ढिसाळ व कमी दर्जाची पावडर बनवणारी होती. कारखान्याचा मालक एक उमदा तरुण अमेरिकन होता. त्याने सन्मानार्थ मला पार्टीही दिली. मी त्या रात्री चर्चा करतांना संजयला एक प्रपोजल दिले...
मी अमेरिकेतच कारखाना काढतो...तांत्रिक बाबी आणि येथील व्यवस्थापन तू पहा. संजय तर खुशच झाला. ही कल्पनाच रोमांचक होती आणि संभाव्यतेच्या सर्व कक्षेत बसत होती. अमेरिका ही मेटल पावडर आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. माझ्याकडे तंत्रद्न्यान होतेच. मशिनरी भारतात बनवून येथे आनता आली असती म्हणजे भांडवली खर्च कमी झाला असता. तसेही अमेरिकन कंपन्या भारतीय मंडळीला स्वस्तात वापरुन घेत...फक्त विनिमय दरातील तफावतीमुळे ते अल्प वेतन नुसते परवडतच नसे तर भरपूर जमा शिल्लक राही. अमेरिकन लोक हे मुळात उधळे, कर्जावर जगणारे...बुधवार आला कि "i am broke" म्हणत गळे काढणारे. क्रेडिट कार्डांच्या राशीवर जगणारे. ही जी महामंदी अलिकडे आली तिचे मला काहीच आस्चर्य वातत नाही कारण "America is rich country with poor people & India is poor country with rich people." हा सिद्धांत मी अनुभवाने आधीच बनवला होता. अलीकडेच मी एका अमेरिकन चित्रकार मित्र महिलेला ५०० डालरची मदत करून आत्महत्येपासून वाचवले आहे. आमची कधीच प्रत्यक्ष भेट नाही हे येथे लक्षात घेणे गरजेचे आहे हेही मी येथे नमूद करून ठेवतो. असो.
आम्ही चक्क दुस-या दिवशी एका ब्यांकेला भेट दिली...म्यानेजरने (ती महिला होती.) तात्काळ तिने अकाउंट ओपनिंग पासून ते आर्थिक सहायाबद्दलचे कागदपत्र दिले. हे आपल्याकडे १० दिवस हेल्पाटे मारल्याखेरीज त्यावेळी होत नसे. त्याच दिवशी आम्ही कारखाना चालू करता येईल अशा जागाही पाहिल्या. मला अमेरिकेने मुळीच प्रभावित केले नाही आणि आजही माझ्या या मतात बदल होउ शकलेला नाही, ते कसे हे मी पुढे सांगेलच.
डॆट्रोईट शहर हे जगप्रसिद्ध आहे...पण तसे त्या वैभवाचे चित्र मला त्यावेळीस तरी आढळले नाही. लोक वखवखलेले, संधीसाधू आणि बकरे शोधण्यात व्यग्र असे वातले. तेथील महाराष्ट्रीय मंडलीही काही विशेष वेगळी नव्हती. त्यांच्या-त्यांच्यातही असंख्य दुरावे होते...एकतेचे नाटक करत असता हेही मे अनुभवले आणि खिन्न झालो. संस्क्रुतीची जपणुक केवळ आपले वेगळेपण दाखवण्यासाठी असून त्यांत विशेष काही अर्थ नाही हेही लक्षात आले. ज्या आहेत त्या व्यर्थ वंचना. पण येथे कारखाना काढायचा आणि तो यशस्वी करायचा हे मात्र माझ्या मनाने पक्के घेतले.
डोन हार्वे आला. तो तेंव्हा सत्तरीतला व्रुद्ध. मुळचा ब्रिटिश. मला भेटुन खुपच खूश झाला आणि आमच्या उत्पादनाला येथे खूप मार्केट असल्याने तो आता केवळ आमच्याच कंपनीवर फोकस करत आहे असे त्याने सांगितले. मी त्याच्या बरोबर निघालो. त्याने भाड्याची कार आनली होती. जे अंतर तोडायला भारतात किमान १७ तास लागले असते ते अंतर आम्ही चक्क ६-७ तासांत ओलांडले. माझा पुणे-गडचिरोली प्रवासानुभव...) रस्तेच तसे. जेथे हरणे खुप तेथे शेकडो मैल अशी उंच तारेची कंपाउंडे कि हरीण रस्त्यावर येवुन अपघात घडवणार नाही.
अजून एक गम्मत. मी डोनला विचारले...फावल्या वेळेत तो काय करतो?
तो म्हणाला " मी इंग्रजी शिकवतो...."
पक्का ब्रिटिश...आणि अमेरिकन इंग्रजी म्हणजे खरा केरकचरा...
मी प्रथमच जगप्रसिद्ध "पटेल्स मोटेल" या संकल्पनेशी परिचित झालो. त्याच्या गावात मी
मोटेलमद्धे उतरलो. भारतीय अन्न मिळाले नाही तर मेक्सिकन खायचे हे मी आता शिकलो होतो त्यामुळे त्या आघाडीवर चिंताच नव्हती. म्हणजे तेथील भारतीय फुड हे आपल्यासारखेच असते या भ्रमात राहण्यात अर्थ नाही...
नंतर आम्ही ५-६ विविध कंपन्यांना भेटी दिल्या. पण त्यातील एक अविस्मरणीय भेट सांगतो...जेथे माझी मात्रुभुमी मला भेटली आणि मी जन गन मन रडत म्हनालो. उर अभिमानाने भरून आला.
भेट होती एका सिंटर्ड उत्पादने बनवण्यासाठी लागणारी मशिनरी बनवणा-या कारखान्याला. कारखान्यात जातांना लक्ष गेले नाही. भेट झाली...चर्चा झाल्या...बाहेर जायला पडलो...
डोनने मला थांबवले. निर्देश केला. पाहतो तर काय...
अमेरिकन झेंड्याचा बाजुलाच दुस-या पोलवर तिरंगा फडकत होता.
"In your honor Sanjay."
डोन म्हणाला. मी स्तब्ध झालो. विश्वासच बसेना. हात कपाळी गेला आणि मी त्या भुमीवर माझ्या तिरंग्याला अभिवादन करत राष्ट्रगीत म्हटलो...डोळ्यांतुन अश्रु झरत राहिले...डोन स्तब्धपणे माझ्याकडे पहात राहिला. राष्ट्रगीत संपले तसा त्याने वडीलाप्रमाणे हात हाती धरला. मी भरून पावलो. या यश्किश्चित
माणसासाठी हा तिरंगा फडकावला गेला...माझ्या देशाचा सन्मान केला गेला...
नंतर असाच अनूभव पुढे मी जपानमद्धेसुद्धा घेतला.
जगण्याचा अर्थ मला अशाच घटनेने दिला.
आणि आजही माझा देश माझी माणसे हीच माझी जगण्याची प्रेरणा आहे.

Thursday, May 5, 2011
दिवस तसेही...दिवस असेही...(प्रकरण ९)
के.एल.एम. च्या त्या अवाढव्य विमानाने तासाभरात उड्डान भरले. मी खिडकीची सीट मुद्दाम मागुन घेतली होती. हा माझा पहिलाच विदेश प्रवास होता. खरे तर माझ्यासारख्या खेड्यातुन आलेल्याला त्याचे अप्रुप असायला हवे होते. पण प्रत्यक्षात मी कोरडा होतो. काही विशेष वाटत नव्हते. स्वता:बद्दल मला कधीच कशाचे अप्रुप वाटलेले नाही, भावनाहीणच असतो ही एक माझ्या स्वभावातील विसंगती आहे असे म्हणायला हरकत नाही.
उजाडले तेंव्हा ३७-३८ हजार फुटावरुन सुर्योदय कसा दिसेल या उत्सुकतेने टक लावून वाट पहात बसलो. खाली पहावे तर करडी स्लेट पसरली असावी असा समुद्र दिसत होता. काही वेळातच सुर्याचे दर्शन झाले...अंगावर रोमांच् उभे राहिले.
माझा पहिला थांबा होता नेदरल्यांड. विमान शिफोल विमानतळावर उतरलो तेंव्हा रिमझिम पाउस पडत होता. अवाढव्य विमानतळ. मुंबईच्या तळाची मिजास खाडकन उतरली. सारे काही भव्य. स्वछ्छ आणि ताजे-तवाणे. सरकत्या पट्यांवरुन पुढे सरकायची मौजही घेतली. कस्टमच्या तावडीतुन वेगाने सुटका झाली. बाहेर आलो. अनेक होटेल्सचे तेथे स्टाल्स होते. मी आयबिस होटेलची निवड केली. त्यांच्या बसने मी होटेलवर पोहोचलो...चेक-इन केले. जेट ल्यागचा त्रास होईल असे मला सांगण्यात आले होते, पण मला कसलाही त्रास जाणवला नाही. त्यामुळे जो एक दिवस विश्रांतीसाठी ठेवला होता तो कसा घालवायचा हा यक्ष प्रश्न होता. मुळात मी भटक्या नाही. पण हा प्रश्न फार वेगळ्या पद्द्धतीने सुटला. ती एक अविस्मरणीय अशी गम्मतच आहे.
आयबिस हे होटेल अवाढव्य होते. डच सेवाही फार उत्तम होत्या. पण अजून एक उत्तम सेवा मला मिळणार होती. माझ्या रुममधील दैनिके-मासिके चाळत बसलो (बीयर घेत) असता मला चक्क अशा जाहीराती दिसल्या कि मी उडालोच. त्या होत्या उच्चभ्रु वेश्या पुरवणा-या संस्थाच्या. वर्तमानपत्त्रात अशा जाहिराती असू शकतात यावर माझा विश्वासच बसेना. दुस-या दिवशी मी या सेवेचा लाभ घेण्याचे ठरवले. होटेलच्या रेस्टारंटमधील जेवण चांगले असेल अशा आशेने गेलो तर पुर्ण निराश झाली. युरोपियन जेवण दिसायला देखणे दिसले तरी गळ्याखाली उतरेना. त्यामुळे बियरचाच आहार घेतला. भारतीय आणि त्यातल्या त्य्यात घरचे जेवणच मला प्रिय. या अनुभवानंतर पुढे मी जे अनेक विदेश दौरे केले ते घरच्या दशम्या आणि शेंगदाण्याची चटणी घेवुनच!
दुस-या दिवशी मी त्या एजंसीला फोन लावला. त्यांनी प्रथम मी ज्या होटेलमद्धे उतरलो होतो त्याचे नाव विचारुन फोन कट केला. ५ मिनिटांत त्यांचाच उलटा फोन आला. वारे व्हेरिफिकेशन! तासाला ६०० गिल्डर या रेटमद्धे त्यांनी मुलगी पाठवायचे कबूल केले. मला तास भरपुरच वाटला. ठीक आहे म्हणुन मी आता काय अनुभव मिळणार आहे याची वाट पहात बसलो. जीवनातील सर्वच अनुभवांना मी मोकळेपणे सामोरा गेलेलो आहे. त्यांचा मला माझ्या साहित्यलेखनात अनिवार उपयोगही झाला आहे.
तासाभराने एक टंच डच युवती माझ्या रुममद्धे प्रवेशली. दिसायला ती खानदानी दिसत होती. अशा मुली त्याही अशा प्रगत राष्ट्रात वेश्यागिरी करतात याचे मला आश्चर्य वाटले. तीने मला हग केले आणि सोफ्यावर बसली. काहीतरी सुरुवात करायची म्हणुन तिने प्रश्न विचारले...मी उत्तरेही दिली आणि तिलाही उत्सुकतेने प्रश्न विचारले. प्रश्न असा केला कि हे काम सोडुन तु दुसरे काय करतेस?
तिने उत्तर दिले ..." मी तत्वद्न्यानात एम.ए. करते." आता पुन्हा एकदा मी उडालो. तत्वद्न्यान म्हटले आणि माझा दुसराच कीडा वळवळु लागला. मी तिच्याशी सरळ तत्वद्न्यानावर चर्चा करायला सुरुवात केली. तिला भारतातील रजनिश माहित होते पण क्रुष्णमुर्ती नाही. तिला उपनिशदे वगैरेचा गंधही नव्हता पण ती कांट-हेगेलवर भरभरून बोलायला लागली. ग्रीक तत्वद्न्यान तिला चांगले माहित होते. मग काय...अस्मादिकांचे ६०० गिल्डर असेच संपत आले तेंव्हा तीच भानावर आली...माफी मागु लागली. मी म्हटलो "नेव्हर माईंड..." एक तास वाढवून घेवूयात. त्यिने पुन्हा तिच्या एजंसीला फोन लावला...तास वाढवून घेतला...पैसे हाती घेतले...खरी व्यावसायिकता...उरलेला तास.....
सायंकाळी मी ट्यक्सीने अम्स्टर्ड्याम शहरात गेलो. ट्याक्सीवाल्याने सांगितले...एवढे पैसे घालवण्यापेक्षा विमानतळाखालुन असणा-या रेल्वे स्टेशनवर ट्रेन घेतली असती तर मी लवकर पोहोचलो असतो आणि स्वस्तातही...विमानतळाच्याच खाली रेल्वे स्टेशन आहे ही माहिती मला आशर्यकारक वाटली. युरोपने एवढी प्रगती केली आहे याचे कौतुक वाटले. मी अम्स्टर्द्यामच्या सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या परिसरात आलो. अवाढव्य परिसर. पर्यटकांची प्रचंड गर्दी. मी असाच पायी भटकत राहिलो. ट्राममद्धे बसण्याची मौजही अनुभवली. क्यनाल्स पाहिले. पुन्हा चालत येत असतांना मला एक रेस्टारंट दिसले...
त्याच्के नाव होते "गांधी".आणि बाजुलाच त्यांचे कलात्मक छोटे शिल्प होते.
या महात्म्याच्या नावाने एवढ्या दूरदेशी कोणी होटेल चालवत आहे हे मला अभिमानाचे वाटले. येथे भारतीय जेवण मिळेल याची खात्रीच पटली. मी आत प्रवेशलो. हे चक्क डच मालकाचे होते आणि जेवणही दचच होते. गांधी नावाला अशोभणीय प्रकार पण आता तोच माझा अन्नदाता असल्याने हायसेही वाटलेला म्हनजे तेथे दारु मुबलक उपलब्ध होती....आणि जुनी हिंदी गाणी मंद स्वरात मला भारतातच असल्याचा आभास देत होती. मी बीयर घेत सायंकाळ घालवली आणि रेल्वेनेच परत आलो.
तेथील रेल्वे म्हणजे अद्भुत आश्चर्यच होते. अत्यंत स्वछ्छ स्थानके, कालच विकत घेतल्या असाव्यात अशा ट्रेन्स...आपोआप उघडणारे-बंद होणारे दरवाजे...आतील प्रशस्त सीट्स आणि गर्दीचा पुरेपुर अभाव...
दुस-या दिवशी माझे खरे काम सुरु झाले. मला युट्रेच्ट येथे भाजीपाल्यावर निर्जलीकरण प्रक्रिया करणा-या उद्योगाला भेट देवून पाहणी, तांत्रीक सहका-याची बोलणी, आणि महत्वाचे म्हनजे निर्यातीच्या शक्यता अजमावायच्या होत्या. मी शिफोल विमानतळाखालील स्टेशनवर पोहोचलो. प्रवास सुऋ झाला. शहरी भाग ओलांडला आणि नेदर्ल्यांडचे सौन्दर्य उलगडु लागले. मी विस्मीत होवून ट्युलिप्सच्या बागा...हिरवाईने नटलेली अत्याधुनिक शेती पहातच राहिलो. नद्या...जलाशयांचीही रेलचेल होती पण कोठेही ते सौंदर्य डागालण्याचे मानवी हस्तक्षेप नव्हते. स्वाभाविकच आपली शेती आणि सौंदर्यांची जाण नसलेले भारतीय ही तुलना होतच राहिली. विपुल निसर्गक्रुपा असुनही आपले दारिद्र्य का या प्रश्नांची उत्तरेही मिळत राहिली.
युट्रेच्ट येथील कारखान्यात माझे खुपच अगत्याने स्वागत झाले. त्यांच्या अधिका-यांनी मला चहापान व जुजबी गप्पांनंतर सर्व कारखाना दाखवला. अत्यंत कमी कामगार दिसत होते...बव्हंशी सर्वच कामे यांत्रिकीकरणावर होत होती. कांदे, पालक, फुलकोबी यांचे निर्जलीकरण होत होते. कच्चा माल एवढ्या उत्तम प्रतीचा होता कि तसा मी लेह सोडुन भारतात कोठेच पाहिलेला नाही. पुण्यातील भाजीवाल्यांकडील मालाची प्रत आठवली आणि खंतावलो. ते तंत्रद्न्य मला उत्साहाने सारी प्रक्रिया समजावून सांगत होते. कोठेही लपवाछपवीची भावना जाणवली नाही. प्रक्रियाक्रुत माल आणि त्याची होणारी काटेकोर तपासणी आणि लगोलग होणारे प्याकिंग येथवर त्यांनी मला सर्व काही दाखवले. नंतर त्यांच्या conference room मद्धे गेलो. तेथे मी त्यांना भारतातील मालाची उपलब्धता...स्वस्तात होवू शकणारे उत्पादन आणि त्याला येथे असु शकणारे मार्केट यावर बोलत राहिलो. त्यासाठी तांत्रिक आणि विपननविषयक करार करण्यात आमच्या कंपनीला रस असल्याचे सअंगितले व त्यात त्यांना होणारे संभाव्य फायदेही समजावुन सांगितले. त्यांना माझ्या प्रपोजलमद्धे रस असल्याचे जानवत होते त्यामुळे नकळत मी उल्हसित होत होतो. सायंकाळी त्यांनी मला रेल्वे स्टेशनवर सोडले तेंव्हा मी संभाव्य भागिदारीचे आश्वासन घेतले होते. तपशील आणि संभाव्य क्षमता...गुंतवणुक या बाबी मात्र चर्चेत राहणार होत्या. लगोलग करार होईल या अपेक्षेत मी मुळात नव्हतोच.
दुस-या दिवशी मी अजून एका कारखान्याला भेट दिली...पण तो खुपच छोटा होता आणि कांद्यावरच प्रक्रिया करत होता. त्याचा मालक एक जर्मन होता. पुढे त्याने तो कारखाना बंदही केला आणि जर्मनीत जावून स्थाईक झाला.
तिस-या दिवशी मी रोटरड्याम या शहराला जायला निघालो. आपली मुंबई जशी देशाची आर्थिक राजधानी तसेच रोटरड्याम. हे शहर अत्यंत संपन्न आहे. मी येथे world Trade center ला भेट द्यायला आलो होतो. मला असंख्य आकडेवा-यांची गरज होती. फ़ुड इम्पोर्ट-एक्स्पोर्टबद्दलची धोरणे समजावून घ्यायची होती. त्यासाठी माझा पत्रव्यवहार झालेला होताच.
ही ८ मजली पण विस्ताराने भव्य अशी इमारत होती, तेथील अधिकारीही माझ्याशी अत्यंत आपुलकीने वागले. हवा तो डाटा मला फ्हटाफट उपलब्ध करुन दिला. सारा दिवस जाईल असे वातले होते पण प्रत्यक्षात २ तासांत माझे काम आटोपले. भुक लागली होती. बीयरवर जगणे अशक्य झाले होते. मी भारतीय रेस्टारंटची चौकशी करु लागलो...पण प्रत्यक्षात मिळाले ते चायनीज. म्हटलो ठीक आहे...पण तेथील चायनीज फुड हे चायनावाल्यांनाही पचले नसते तर माझी काय गत?
दुस-या दिवशी मला इंग्लंडला जायचे होते. तेथे लोहभुकटीच्या संदर्भात भेटी ठरलेल्या होत्या. त्यामुळे पोहोचताच मी झोपी गेलो.

Tuesday, March 15, 2011
दिवस असेही...दिवस तसेही...!
दिवस असेही...दिवस तसेही...!
-संजय सोनवणी
प्रकरण-८
त्या भीषण अपघाताने माझ्या शरीराच्या उजव्या बाजुची पार वाट लागली होती. उजवा पाय पुरा प्लास्टरमद्धे, ४ बरगड्या फ़्राक्त्चर, तर डोक्याला ३२ टाके अशी अवस्था मी दोन दिवसांनी शुद्धीवर आलो तेंव्हा होती. जवळपास एक महिन्याची स्म्रुती नष्ट झाली होती. मी कारखान्याचे उद्घाटन करुन गडचिरोलीवरुन परत येत असताना हा अपघात झाला असेच मला वाटत होते. प्र्त्यक्षात अपघात नंतर झाला होता. सनसवाडीजवळ...म्हनजे पुण्याला मी जवळपास पोहोचलोच होतो...तेंव्हा...टायर फुटल्यामुळे. दोन दिवस मी बेशुद्धच होतो. ज्यांनी नंतर माझी अपघातग्रस्त कार पाहिली त्यांचा मी जीवंत असण्यावर विश्वासच बसत नव्हता. शुद्धीवर आल्यानंतर दोन दिवसांनी डिस्चार्ज मिळाला. घरी कसे-बसे दोन दिवस काढले. तिस-या दिवशी राणीचे न ऐकताच मी प्लास्टरमधील पाय खुरडत चक्क कार्यालयात पोहोचलो. मी अपघातातुन नुकताच गेलो आहे, जखमी आहे यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. पण कामांचे डोंगर उभे होते. कंपनी नवी होती...मार्केट उभे करायचे होते, उत्पादन सुरळीत करायचे होते...वेळ होताच कोठे आराम करायला? त्याच अवस्थेत काही दिवसांत मी ट्रेनने चेन्नैला जावुन आलो. जातांनाच्या या प्रवासात एक गंम्मतच झाली.
सोलापुरच्या पुढे कसलातरी अपघात झाल्याने ट्रेन जी सोलापुर स्टेशनवर थांबली ती थांबलीच. मी कंटाळुन पेपर घ्यायला खाली उतरलो. काही वेळात संतप्त प्रवाशांची ट्रेनवर जोरदार दगडफेक सुरु झाली. ही पळापळ माजली. माझा पाय पुरा प्लास्टरमद्धे. मला पळताही येइना. एक-दोनदा हेल्पाटलोही. कसाबसा माझ्या डब्यात घुसलो. ट्रेन निघाली ती दुसर्या दिवशी. तोवर हालच हाल. चेन्नई येथील डीलरची नियुक्ती करुन येतांना मग मात्र मी विमानानेच परत आलो.
------२ इ.एम-------------
अपघात होवुन अता १५-१६ दिवस झाले होते. प्लास्टरचे ओझे मला पुरते बेचैन करत होते. हालचालींवर खुप मर्यादा येत होत्या. मी रुबी हालमधील डाक्टरांना प्लास्टर काढण्याबाबत विचारले. त्यांनी मला वेड्यात काढले. किमान १ महिना तरी प्लास्टर काढता येणार नाही असे त्यांनी सांगीतले. मी सरळ हर्डीकर होस्पिटलमद्धे गेलो. त्यांनी एक्स-रे काढला आणि त्यांनीही प्लास्टर काढता येणार नाही असे सांगीतले. पण निराश होइल तो मी कसला? सरळ घरी आलो, राणीला कात्री मागितली. ती मला वेड्यात काढत होती. पण मी हट्टाला पेटलो होतो. प्लास्टर काढणे सोपे जात नव्हते. एक-एक पदर कसाबसा सोडवत तासा-दिडतासात उजवा पाय मोकळा केला. प्लास्टरमद्धे दडपुन ठेवल्याने डाव्या पायापेक्षा पार बारीक वाटत होता. थोडे चालुन पाहिले. जमले. दुस-या दिवशी दुसरी कार चालवत मी कार्यालयात पोहोचलो.
------------------२ इ,एम.--------------
दिपक शिंदेंनी मला घाल घाल शिव्या घातल्या. म्हातारपणी या एडचाप साहसवादाची फळे भोगावी लागतील अशी खरी ठरणारी भविष्यवाणीही केली. मी निर्लज्जाप्रमणे हसत होतो. त्याला माझ्या समोरील समस्यांची कदाचित त्यावेळीस जाणीव नव्हती. म्हातारपणी काय होइल यापेक्षा मला त्या काळातील समस्या मोठ्या वाटत होत्या. सुरेश पद्मशाली आणि इतर मंडळीने नवे उपद्व्याप सुरु केले होते. पुण्यातील अन्य संचालकांना त्याशी काही विशेष देणेघेणे नव्हते. तेथील पाचही संचालक कारखाना म्हनजे आपली खाजगी मालमत्ता आहे अशाप्रमाणे वागत होते. सुरेश पद्मशाली तर कामगारांचे साप्ताहिक वेतन आपल्यच हस्ते दिले जावे यासाठी भांडत असे. त्याला राजकिय महत्त्वाकांक्षा आहेत आणि पब्लिक लिमिटेड कंपनी आणि सहकारी संस्था यातील फरक त्याच्या समजाबाहेरचा आहे हे लक्षात येत होते. तेथील सर्व संचालक व इतरांचे भाग-भांडवल पाच लाखाच्या आतच होते...म्हनजे एकुन भांडवलाच्या २.५%. पन आपण बरोबरीचे हिस्सेदार आहोत या समजात ते होते. याचा परिणाम होत होता तो दैनंदिन उत्पादनावर आणि वितरनावर. अय्यर नावाचा प्लांट म्यानेजर होता...त्याला हे लोक नाचवायला लागले होते. जणु तो खाजगी नोकर होता. मी वारंवार तेथे जावुन तेथील व्यवस्था नीट लावायचा प्रयत्न करत होतो. कधी कधी भडकतही होतो. विजय वडेट्टीवारांना उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रेक्षकांत बसवले याचा अजुनही राग होता. मी परोपरीने सांगायचो...अरे मी कंपनीचा अध्यक्ष असुन मी प्रेक्षकांत बसलो त्याचे मला काही वाटत नाही तर तुम्ही अशा क्षुद्र गोष्टी कशाला मनाला लावुन घेता? आदिवासी भागात कारखान्याचे स्वप्न साकार झाले हे महत्वाचे नाही का? पण त्यांच्या मनोव्रुत्त्याच वेगळ्या होत्या आणि त्यांच्याशी जमणे अशक्य आहे हे लवकरच लक्षात आले.
दरम्यान उत्पादन सुरळीत होवु लागले असले तरी अपेक्षित उत्पादन मर्यादा गाठता येत नव्हती. कारण तेथील भयंकर पावसाळा. इलेक्ट्रोलिटिक पद्धतीत तांब्याचे बसबार वापरले जातात. तेथील पराकोटीच्या बाष्पमय हवेमुळे त्यांच्या प्रुष्ठभागावर ओक्सोईड्सचा थर येइ आणि जेवढा करंट आणि वोल्टेज क्यथोड आणि अनोडमद्धे जायला हवा तेवढा जात नसे. वारंवार साफ करणे एवढेच आम्ही करु शकत होतो. पल्वराईझरमद्धे आयर्न चिप्सची पावडर बनवत असता त्यावरही लवकर गंज येई आणि ती अनीलींग केली तरी पावडरमधील ओक्साईड्सचे प्रमाण हव्या त्या मर्यादेपर्यंत खाली येत नसे. त्यामुळे भरपुर चाचण्या घ्याव्या लागल्या...शेवटी हवे तसे उत्पादन घेण्यात यशस्वी झालो. इतके कि अमेरिकेतील डोन हार्वे या मेटल पावडरच्या मोठ्या वितरकाने आमचे उत्पादन अमेरिकेत वितरीत करण्याबद्दल रस दाखवला. आमचे सारे नमुने त्यांच्या कसोट्यांवर पुरेपुर उतरले होते. ही आनंदाची बाब होती.
कारखान्यात असणे ही फार आनंददायक बाब असायची. सुरुवातीची आमची शेड ५००० स्क्वे. फ़ुटांची होती तर कार्यालय ४५० स्क्वे. फुटांचे. एक खानसामा होता. तांत्रिक कर्मचारी व माझे जेवण तेथेच व्हायचे. एलेक्ट्रोलिटिक प्लांट विभाग ते अनीलिंग विभाग यात सारखे फिरत कणाकणाने क्यथोड्सवर जमा होणार्या शुद्ध लोह-भुकटीचा चंदेरी थर पहाणे ही वेगळीच अनुभुती होती. त्या वेळीस ७०-७२ कामगार होते आणि २४ तास चार शिफ़्टमद्धे कारखाना चालु असायचा.
असे असले तरी मी संतुष्ट नव्हतो. पद्मशाली तेथील लोहखनीज खानीचे हक्क मिळवुन देण्यात अपयशी ठरल्याने आमची उत्पादन पद्धती बदलावी लागली होती आणि कच्चा माल पार गुजराथेतुन आणावा लागत असल्याने आम्हाला स्थानिक फायदे शुन्य उरले होते. कामगार स्वस्त असले तरी ते तेवढेच कमी उत्पादक होते...त्यामुळे तोही फायदा होत नव्हता. उत्पादन खर्चात वाढ झाली होती ती वेगळीच. यामुळे मी टीकेचे लक्ष होत चाललो होतो. ज्या ध्येयाने कारखाना सुरू केला ते ध्येय, स्थानिकांना रोजगार मिळवुन देण्यापलीकडे यशस्वी झाले नव्हते. सरकारी यंत्रणेचा पराकोटीचा संताप येत होता. पण याही स्थितीवर मात करण्याची जिद्द होती. काय वाट्टेल ते झाले तरी मी येथील कारखाना यशस्वी करणार होतो. एवढेच नव्हे तर सिंटर्ड उत्पादनांचा कारखानाही येथेच उभारणार होतो. जो आतबट्ट्याचा व्यवहार ठरेल अशी भिती जी वाटु लागली होती, तीवर मात करनार होतो. थोडक्यात अति-उच्च शुद्धतेची लोहभुकटी बनवण्यासोबतच अन्य स्वस्त कच्चा माल वापरुन व्यापारी दर्जाची कमी शुद्धतेची लोह भुकटीही उत्पादित करणे आवश्यक होते. ती भुकटी सिंटर्ड आणि वेल्डिंग रॊड निर्मितीसाठी लागत होती. पण त्यासाठी भांडवल कसे उभे करायचे हा एक प्रश्नच होता.
----------२ इ.एम.--------------
गडचिरोलीवरुन परतत असतांना सहज विचार आला...आपण कंपनीचा पब्लिक इस्श्यु आनला तर?
कल्पना आकर्षक होती.
पण ती प्रत्यक्षात कशी आनायची हा प्रश्न होताच. लिस्टींग एवढे सोपे नव्हते. मला वा आमच्या कोनत्याही संचालकाजवळ तेवढा अनुभवही नव्हता. माहितीही नव्हती. लोकांनी आपल्या कंपनीत का पैसे गुंतवायचे? आम्हाला कोणी गाडफादरही नव्हता. आणि नवे तंत्रद्न्यान कोनते वापरायचे हाही प्रश्न होता. प्रवासात काही कल्पना ठळक होत गेल्या. त्यातील अडचणी कोणत्या यावरही विचार केला.
पुण्यात आल्यावर दुसर्या दिवशी मी अभय साहेबांसमोर पब्लिक इश्युची कल्पना मांडली. त्यांनी स्वभावता:च प्रतिक्रिया व्यक्त न करता त्यांचा एक नातेवाइक तरुण मर्चंट ब्यांकेत कामाला आहे असे सांगुन त्याला फोन करुन यायलाही सांगीतले. मी खुष झालो. पुण्यातील इतर संचालकांनी मला वेड्यात काढले. पब्लिक इश्यु म्हनजे काही जोक नव्हता. मला तो जोक वाटत नव्हता. इश्यु वास्तवात येणारच होता.
खरी अडचण झाली होती ती गडचिरोलीच्या संचालकांची. पद्मशाली संख्येच्या बळावर कारखाना ताब्यात घेण्याच्या वल्गना करु लागला होता. त्याला अजुनही ही सहकारी संस्थाच वाटत होती. मी त्याला शह देण्यासाठी थोडे राजकारणही खेळलो आणि त्याचे काही खंदे लोक त्यांचे शेअर्स विकत घेवुन त्यांना दुर सारले, राजीनामे घेतले. यामुळे पद्मशाली चिडले. त्यांनी नीनावी पत्रे सर्वत्र पाठवण्याचा सपाटा सुरु केला. अगदी महाराष्ट्र ब्यंकेलाही त्याने पत्रे पाठवली. हे कळताच कधी न संतापणारे अभयसाहेबही चिडले आणि पद्मशालीची संचालक मंडळावरुन हकालपट्टी करण्यात आली.
मागे वळुन पहाता आता असे वाटते कि ती जरा घाईत केली गेलेली चुक होती. पद्मशालीला ओळखण्यात मी सपशेल चुकलो होतो. त्याला काढुन टाकल्यावर तो अजुनच चिडला. पत्रकार परिषद घेतली आणि आमच्यावर आरोप करायला सुरुवात केली. या कारखान्याचे खरे मालक गडचिरोलीचे भुमीपुत्र असुन पुणेकरांनी त्यावर बेकायदेशीर कब्जा केला आहे असे हास्यास्पद आरोप सुरु केले. ते तिकडील व्रुत्तपत्रांत छापुनही आले. हे माझे पित्त भडकवायला पुरेसे होते. मी त्यावर पद्मशालीची भेट घेवुन त्याला शांत करायला हवे होते...आणि कारखान्याच्या कामात जास्त लक्ष घालायला हवे होते, पण उलट मी संतापुन त्याचे आरोप खोडत बसलो. माझा संताप रास्तही होता कारण अक्षरश: काहीएक न करता त्याला हुकुमशाही गाजवायची होती. प्रत्यक्षात प्रत्येक बाबतीत...अगदी वाहतुकीसाठी ट्रुक मिलवायलाही आमचे काय हाल होत होते हे तो डोळ्यांनी पहातच होता. किंबहुना त्यामुळेच आम्ही निराश होवुन पळुन जावू असा त्याचा होरा असावा. पण तसे घडनार नव्हते. आणि समजावुन सांगुन उपयोग होत नाही असा जुना अनुभवही होताच. पण मी किमान जाहीर प्रत्त्युत्तरे तरी टाळु शकलो असतो. या स्थितीचा फायदा तेथील चिंधीचोर पत्रकारांनी घ्यायला सुरुवात केली. शेवटी पद्मशालीची मजल पाच लाख रुपये द्या नाहीतर कारखाना बंद पादणार या धमकीपर्यंत येवुन पोहोचली. हे अतीच होते. मी ब्ल्याकमेलींगला बळी पडणारा नव्हे हे त्याला कळालेच नाही. मी त्याला एक रुपयाही दिला नाही. उलट त्याच्यावर पुण्यात बदनामी व अन्य अनेक फौजदारी खटले दाखल केले. प्रतिक्रिया म्हणुन त्यानेही गदचिरोलीत असेच बदनामीचे खटले दाखल केले. त्याला पैसे द्यायचे नाही या नादात आम्ही कोर्टात भरपुर पैसे बरबाद केले. नैतिक द्रुष्टीने मी बरोबर होतो...पण व्यावसायिक द्रुष्टीने ती घोडचुक होती.
कारण यामुळे कंपनीची...आमची बदनामी तर होतच होती...पण महत्वाचा वेळही वाया जात होता.
याचा अर्थ कामे थांबली होती असा नाही. इंग्लंडमधील आटोमाशन सिस्टेम या कंपनीबरोबर माझी तांत्रिक सहकार्याची चर्चा सुरु होती. ती कंपनी आटोमाशन पद्धतीने लोहपावडर बनवण्याचे तंत्रद्न्यान पुरवत असे. त्या कंपनीचा मालक भारतात आमच्याकडे येवुन गेला...तांत्रिक सहकार्याचा करारही त्याच्याबरोबर केला. तोवर काही प्रमानात अमेरिकेत निर्यातही सुरु झाली होती. पब्लिक इश्युसाठी मुंबईतील एका कंपनीची मर्चंट ब्यांकर म्हणुन नियुक्तीही झाली होती. अर्थव्यवस्था महत्वाकांक्षांना मोकळे रान देत होती. डोक्यात असंख्य प्रकल्प घॊळत होते. एकच स्वप्न होते ते १००० कोटीचे मराठी मानसांचे साम्राज्य उभे करण्याचे. प्रत्येक क्षेत्रात मला उतरायचे होते. अवाढव्य प्रकल्प उभारायचे होते. मी मुळचा स्वप्नाळु...स्वप्नांना कष्टांची आणि धाडसाची जोड होतीच. दैनंदिन व्यवस्थापन हे माझे कधीच क्षेत्र नव्हते. त्यासाठी अद्याप आप्मच्याकडे कोणी धुरन्धर नव्हता. पण शोध सुरु होता...ट्रायल-एरर चालुच होते. सर्वांमद्धे एक धेय असावे यासाठे प्रयत्न होते. अशोक चांदगुडे यांची मला चांगली साथ मिळत होती. गडचिरोलीला असो वा अन्य कोनत्याही संकल्पनेतील प्रकल्प...ते माझ्या सोबतच असत. बाकी मंडळीकडुन मी आता अपेक्षा बालगण्याचे सोडुन दिले होते. यामुळे माझ्यावरील कामांचा लोड वाढला होता. घराकडे माझे विशेष लक्षही नव्हते. येणारा प्रत्येक पैसा, मग तो कमाइचा असो कि कर्जाचा, व्यवसायात वा इतर संचालकांच्या गरजांसाठीच जात होता...मी अजुनही भाड्याच्याच घरात रहात होतो.
---------------२ इ.एम-----------
पब्लिक इश्यु आणने ही काही चेष्टेची बाब नव्हती हे खरेच आहे. कसलीही व्यावसायिक पार्श्वभुमी नसतांना वयाच्या तिसाव्या वर्षी मी दोन लिस्टेड कंपन्यांचा संस्थापक अध्यक्ष झालो ही महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक घटना आहे यातही शंका नाही. गडचिरोलीसारख्या नुसत्या आदिवासीच नव्हे तर नक्षलवादी भागात अगणित अडचणी सोसत तब्बल पाच वर्ष कारखाना चालवला हेही खरे. असे धाडस आजही करण्याची हिम्मत कोणात असेल असे मला वाटत नाही.
गडचिरोलीला कारखाना काढुन कारखानदार म्हणुन मिरवणे हा माझा उद्देश कधीच नव्हता. त्याबाबत माझा द्रुष्टीकोन स्वच्छ होता. नक्षलवाद उफाळुन यायला कारण होते तेथील पराकोटीचे दारिद्र्य आणि अद्न्यान. सरकारने या भागाकडे पुरेपूर दुर्लक्ष केले होते. कोणी वाली नव्हता. एकिकडुन नक्षलवादी आणि दुसरीकडुन पोलिस या कात्रीत आदिवासी सापडलेले होते. त्यांची अवस्था पाहिली तर अश्रुच डोळ्यात उभे रहात. आम्हालाही नक्षलवाद्यांच्या धमक्यांची पत्रे यायला सुरुवात झाली होती. पोलिस काय करनार? तेही छापे मारत...गवगवा करुन घेत...माहिती मिळवण्यासाठी आदिवासींचा पराकोटीचा छळ करत. पोलिस गेले कि नक्षलवादी उगवत आणि ते अवघ्या आदिवासी वस्तीवर अत्याचार करत. हे चित्र भयावह होते. अस्वस्थ करणारे होते. या विभागात पुरेपुर औद्योगिक क्रांती झाल्याखेरीज हे चित्र बदलु शकणार नाही हे समज्त होते. मी अडखळत का होईना येथे सुरुवात केली होती. स्थानिक अधिकारी/सुशिक्षित नागरिकांना त्याचे अप्रुप नसले तरी जनसामान्य मला देवासारखेच मानत असत. गडचिरोली हीच माझी नकळत कर्मभुमी बनुन गेली होती. माझ्या यशामुळे अनेक उद्योग येथे येतील ही आशाही होतीच. तशा आशयाचे अनेख लेख मी लिहितही होतो.
एके दिवशी मी गडचिरोलीत असतांनाच एक बातमी वाचण्यात आली. एका अत्राम नावाच्या गरीब आदिवासीला नक्षलवादी समजुन गडचिरोली पोलिसांनी छळ करुन त्याची हत्या केली होती. ही घटना संतापजनक होती. सामान्यांनी जायचे तरी कोठे? पोलिस त्या भागात अक्षरश: हुकुमशहा बनले होते. येणारे सारे पोलिस अधिकारी बव्हंशी शिक्षेवर असत वा प्रशिक्षनार्थी असत. त्यांना स्थानिक प्रश्नांशी काहीएक घेणेदेणे नव्हते. ते असत लगोलग बदल्या करवुन घेण्याच्या प्रयत्नांत. अनेकजण तर रुजुही होत नसत वा दीर्घ सुट्ट्यांवर निघुन जात. अत्त्रामच्या हत्येचे पराकोटीचे दु:ख झाले...पण करनार काय? नुसत्या निषेधांनी काय होणार? आम्ही मयत अत्रामच्या परिवाराला आर्थिक मदत दिली. यामुळे गडचिरोली पोलिस माझ्यावर खूप संतापले. पोलिस मरतात तेंव्हा कोण मदत देतो काय असा प्रश्न मला एका डी. वाय. एस. पी. ने विचारला. मी म्हनालो...तुम्हाला सरकार पैसा देते...हुतात्मा ठरवते...परिवाराची काळजी घेते...या आदिवासींना कोणी काही दिलेय काय? या प्रसंगाने पोलिस आणि माझ्यात एक दरी निर्माण झाली हे खरे.
काहीही झाले तरी येथे यशस्वी व्हायलाच हवे होते. नवा कच्चा माल शोधुन स्वस्त उत्पादनपद्धती राबवायलाच हवी होती. स्पोंज आयर्न बनवणार्या काही कंपन्या विदर्भात होत्या. तो कच्चा माल म्हणुन वापरता येईल काय या द्रुष्टीने माझा अभ्यास चाललाच होता. आणि भांडवलासाठी पब्लिक इश्युची कल्पना सुचली होतीच!
पण हे होत असतांना अननुभवाचे फटके कसे बसतात हे सांगणे आवश्यक आहे. जागतिकीकरणाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी त्यावेळी खुपजण स्पर्धेत उतरले होते. विदेशी तंत्रद्न्यान....भागिदा-या...तांत्रिक सहकार्य हे परवलीचे शब्द बनले होते. ग्रीन हाऊस प्रकल्पांची लाट आली होती. ग्रीन हाऊस प्रकल्प म्हणजे अक्षरशा: कागदावरील प्रकल्प. ते प्रत्यक्षात आनण्यासाठी चक्क पब्लिक इश्यु आणले जात. मर्चंट ब्यांकर्सची तर एवढी भाउगर्दी उसळली होती कि त्याला सीमाच नाही. किंबहुना तेच अनेकांना घोड्यावर बसवुन इश्यु आनायला प्रोत्साहित करत. सारेच इश्यु यशस्वी होत नसत हेही खरे पण हे ब्यांकर्स त्यासाठीही आयडिया घेवुन येत...आणि या कल्पना प्रवर्तकांना शेवटी खड्ड्यात लोटनार-या असत.
मर्चंट ब्यंकर म्हणजे काय हे आधी समजावुन घ्या. पब्लिक इश्यु आणायच्झा असेल तर अशा कंपनेला प्रथम लीड म्यानेजर नियुक्त करावा लागतो. ही जबाबदारी शासनमान्य मर्चंट ब्यांकर कंपन्या घेत. पब्लिक इश्युसाठी ज्या कंपनीचे काम स्वीकारले आहे तिचा सढ्याचा प्रकल्प/त्याचे आर्थिक अहवाल आणि प्रत्यक्ष कामकाज तपासणे, तसे अहवाल बनवणे, तसेच पुढील नियोजित प्रकल्पाची सर्वांगीण छानणी करणे, रसा अहवाल बनवणे व सेबीकडुन पब्लिक इश्युची अधिक्रुत अनुमती घेणे हे त्यांचे महत्वाचे काम असते. आजही अशीच परिस्थीती आहे, पण कायदे खुप बदलले आहेत...हर्षद मेहता आणि केतन पारेखची मेहेरबानी.
या कालात जो इश्युवरील खर्च अभिप्रेत असे तो कोनत्या-ना-कोनत्या कारणाने वाढवत नेण्यात हे सारेच मर्चंट ब्यांकर वस्ताद होते. मग ते खर्चासाठी अतिरिक्त पैसे नसले तर शेअर्स पुनर्खरेदीच्या तत्वावर विकुन ६० ते ७०% प्रतिवर्षी अशा भयंकर व्याजदराने उभे करुन देत....शेअरचे लिस्टींग झाले कि ते शेअर बाजारात विकुन त्यांचे पैसे काढुन घेतील असे सांगीतले जायचे आणि त्यासाठी असंख्य कंपन्यांचे भाव लिस्टींग होताच भराभर चढले अशी उदाहरणे दिली जात. त्यामुळे ६०% काय आणि १००% काय...व्याजदर कागदावरच राहील, शेअरचे भाव वाढल्यामुळे ते बाजारात शेअर विकुन वसुली करुन घेतील अशा दाखवल्ल्या गेलेल्या व्यर्थ आशेपोटी त्या पधतीने प्रवर्तक मंडळी पैसे उभे करत...आणि गंमत म्हनजे हे पैसे देणारे अशाच कंपन्यांचे अधिकारी वा त्यांचे नातेवाईक असत.
या कंपनीचे अधिकारी होते रानडे आणि दास नावाचा उडिया माणुस. आम्हालाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मीही या पद्धतीने पैसे उभे केले. त्यातील काही चक्क माझ्या व्यक्तिगत नावावरही घेतले. (आणि मी आजही ते फेडतोच आहे.) जवळपास वर्षभर सेबीची परवानगी आणि इतर पुर्तता करण्यात गेले. तोवर मी विदेशी तंत्रद्न्यान आयात करायचे नाही हा निर्णय घेतला होता...कारण मीच तोवर अत्यंत स्वस्तात लोहभुकटी उत्पादित करण्याचे सोपे आणि स्वस्त तंत्रद्न्यान गडच्रोली येथील कारखान्यातच भरपूर चाचण्या घेवुन शोधुन काढले होते. आणि ते होत स्पोन्ज आयर्न पासुन प्राथमिक भुकटी तयार करुन ती म्यग्नेटिक सेपरेशन आणि अनीलींगद्वारे शुद्ध बनवणे. यात वीजेची बचत होती तसेच कच्चा माल स्वस्त आणि निकट उपलब्ध असल्याने उत्पादन खर्च अत्यंत कमी होत होता. त्या उत्पादनाच्या यशस्वी ट्रायल्स घेतल्या आणि एक वेगळेच तंत्रद्न्यान जन्माला आले...पुढे कावासाकी स्टीलच्या पावडर मेटालर्जी विभागाला मी जपानमद्धे त्या प्रक्रियेचा डेमो दिला तेंव्हा जपानी तंत्रद्न्यही अवाक झाले होते.
असो. पण इकडे तेंव्हा मला मी नव्या आर्थिक पेचात जात आहे हे लक्षात आले नाही हेही खरे. उलट लोहभुकटीपासुन जी सिंटर्ड उत्पादने होतात ती स्वता:च गडचिरोलीत उत्पादित करण्याची स्वप्ने मला पडत होती. सिंटर्ड गियर्स ते बुशींग/कपलिन्ग तेथे उत्पादित करण्याची योजना होती. त्यासाठी मशिनरीचाही शोध सुरु केला...भारतात त्या मिळत नाहीत हे लक्षात येताच अमेरिकेकडे मोहोरा वळवला.
तेंव्हा इंटरनेट नव्हते. मोबाइल फोनही यायचेच होते. त्यामुळे फ्यक्स आणि फोन हीच काय ती संपर्काची साधने होती...अर्थात पारंपारिक पत्रे/कुरियर इ. वगळता.
मी "सुर्योदय सिंटर्ड प्रोडक्तस लि. या कंपनीची स्थापना केलेली होतीच...तिचा प्रकल्प अहवालही तयार होता आणि ब्यांकेतुन कर्ज घेवुन तो कारखाना उभारायचा मानस होता...पण हा सुगावा लागताच रानडे यांनी कर्ज कशाला घेता...त्यापेक्षा त्यासाठी पब्लिक इश्यु आणुन भांडवल उभे करता येइल असे सांगितले...तसे आश्वासनही दिले. मी साशंक होतो खरा पण हा माणुस चमत्कार घडवुन आणेल अशी आशाही होती...आणि याही कंपनीचा पब्लिक इश्यु आणायचा निर्णय घेतला.
-----------२ इ.एम-------------
दर्म्यान लेखन सुरुच होते. एव्हाना क्लीओपात्रा, ओडीसी, म्रुत्युरेखा इ. ४-५ कादंब-या प्रसिद्ध झाल्या होत्या. पुष्प प्रकाशनाचे कामही वेगात सुरु होते. कर्वे रोडवर आम्ही हजार चौरस फुटाचे कार्यालयही विकत घेतले होते. त्यामुळे पुष्पला नारायणपेठेतील कार्यालय स्वतंत्रपणे वापरता येवु लागले. विनोद सर्व कारभार पहाण्यात निष्णात झाला होता. माझा प्रत्यक्ष सहभाग हळु-हळु संपत आला होता...एवढा कि माझ्या पुस्तकांच्या नव्या आव्रुत्त्या आल्यात हे मला त्या प्रसिद्ध झाल्यावर कळे. विनोदला तसा प्रकाशन व्यवसाय आवडत नसे, पण आता हळुहळु तो रुळला होता.
मी १९९४ मद्धेच नीतिशास्त्र नावाचा नीतितत्वांचा आधुनिक परिप्रेक्षात वेध घेत, वैद्न्यनिक पायावर नैतीक मुल्यांची नव्याने व्याख्या करत त्याची आधुनिक काळाला सुसंगत अशी मांडनी करनारे पुस्तक लिहायला सुरुवात केली होती. जागतिक पातळीवर जी. ई. मूर नंतर नीतिशास्त्रांवर नवी मांडणी कोणी केलीच नव्हती. मला ते एक आव्हान वाटले. या पुस्तकातील "विश्वनिर्मिती-उभारणी आणि संहार" हे प्रकरण लिहित असताना मी आधुनिक संशोधनांचाही सखोल आढावा घेत असता बिग ब्यंग सिद्धांतातील त्रुटी लक्षात येवु लागल्या. मग मी झपाटुन भौतिकशास्त्र आणि विश्वनिर्मिती शास्त्राच्या मागे लागलो. या सिद्धांतात अवकाशाला अगदीच ग्रुहित धरण्यात आले असल्याचे माझ्या लक्षात आले. म्हणजे अवकाशावर वस्तुमानाचा प्रभाव पडतो हे जसे गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात मान्य केले आहे तसेच क्वंटम मेक्यनिक्स मद्धेही वस्तुमान हे सभोवतालच्या अवकाशास प्रभावित करते हे मान्य केले आहे...पण विश्वाचा महाविस्तार पचवण्यासाठी ते अमर्याद उपलब्ध आहे असे चुकिचे ग्रुहितक घेतले गेल्याचे माझ्या लक्षात आले. स्थिर विश्व सिद्धांतात विश्व-विस्तार मान्य केला आहेच पण निरंतर विस्तारामुळे रिक्त होणा-या अवकाशात १ चौ. मीटर= १ हायड्रोजनचा अणु या प्रमाणात नवनिर्मिती होते असे मानुन स्थैर्य आणि विस्ताराचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
हे सारे अमान्य करुन मी नवीन सिद्धांत मांडायला सुरुवात केली. त्यात मी अवकाश हेच मुलभुत एकमेकद्वितीय मुलदभूत आस्तित्व विश्वारंभी होते हे ग्रुहितक घेत "अवकाशताण सिद्धांत आणि विश्वनिर्मिती" या सिद्धांताची रचना केली. हा सर्वच सिद्धांत येथे सांगत नाही, पण या सिद्धांतानुसार वस्तुमान म्हणजे modified space असुन गुरुत्वाकर्षण हे क्रुत्रीम बल आहे व ते वस्तुमानातील अतिरिक्त धन उर्जांच्या समतोलासाठी निर्माण होते...तसेच प्रकाशवेग हा विविध गुरुत्वत्रिकोणांतुन प्रवास करत असतांना वारंवार वेग बदलत (कमी-जास्त) असल्याने प्रकाशवेगच्या आधारावर दोन तारे वा दिर्घिकांमधील काढलेले अंतर चुकीचे येईल आणि एकून विश्वाचा विस्तार वा आयुष्य त्या आधारावर मोजता येणार नाही हे स्पष्ट केले. (अलीकडेच २० अब्ज प्रकाशवर्षे दुर असलेली दीर्घिका सापडल्यामुळे महास्फोट सिद्धांतावर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहीले आहेच. तूवर विश्वाचे वय १६ अब्ज वर्ष मानले जात होते.) या सिद्धांतात मी जी प्रमेये सिद्ध केली आहेत त्यामुळे विश्वनिर्मितीतील अनेक अनुत्तरीत प्रश्न सोडवण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला आहे...अर्थात कोणताही सिद्धांत परिपुर्ण असु शकत नाही हे मला माहित आहेच. हा सिद्धांत मराठीत पुस्तकरुपाने २००६ साली प्रसिद्ध झाला असला तरी त्यातील काही प्रकरणे तत्पुर्वी इंग्रजीतुन प्रसिद्ध झाली होती आणि त्याला जगभरच्या वैद्न्यानिक विश्वातुन चांगला प्रतिसाद मिळाला. अपवाद अर्थातच मराठीचा...आणि वर मराठीतुन मुलभूत विद्न्यानावर लिहिले जात नाही ही बोंब आहेच.
असो. पण या सिद्धांतामागे मी जवळपास ७-८ वर्ष पडल्याने नीतिशास्त्र मागे पडले...ते मी शेवटी पुर्ण केले येरवडा तुरुंगात जामीनाची वाट पहात असतांना. तोही टिळक यार्डमद्धे...जेथे ते राजद्रोहाची शिक्षा भोगत होते...हा एक दैवदुर्विलासच म्हनायला हवा. कारण टिळकांनी राजद्रोहाच्या आरोपात शिक्षा भोगत असतांना गीतारहस्य लिहिले...आणि मी ...?
असो त्याबद्दल पुढे.
नीतिशास्त्र या ग्रंथाचीही मराठीने वाट लावली असल्याने तो आता ईंग्रजीत अनुवादित करुन प्रसिद्ध करण्याच्या मागे आहे. आधुनिक परिप्रेक्षात वैद्न्यानिक आणि अभावनायुक्त उत्स्फुर्ततावादी नीतितत्वे मांडनारा हा एकमेव ग्रंथ आहे हे मी कसलेही औद्धत्य न करता सांगु इच्छितो.
असो. हे सारे सुरू असताना पद्मशालीचे उपद्व्याप सुरुच होते. मी त्याला पाच लाख द्यायला नकार दिल्यावर त्याने आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करने सुरु केले...जणु ही सहकारी संस्था होती जेथे संचालक भ्रष्टाचार करु शकतील. पण तिकडील पत्रकारही बिनडोक...ते बिन्धास्त तो म्हणेल तसे छापत होते. मी त्याच्यावर एकामागोमाग एक बदनामीचे दावे दाखल करत चाललो होतो. एकुण ५८ दावे केले मी. एकदा त्याला न्यायालयात हजर रहात नाही म्हणुन पोलिसांनी पकडुन आणले...आणि पट्ठ्या खवळला. त्याने कंपनीत गैरव्यवहार असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
येथे एक नवे वादळ सुरु झाले. इश्युची तारीख घोषित झाली होती. तो यशस्वी करणे हे एकमात्र ध्येय होते. त्यासाठी पळापळ होत होती. मुम्बैच्या वा-या पराकोटीच्या वाढल्या होत्या. एकदा मुंबईतुन परततांना रात्री अपघातही झाला. एक बंद पडलेला रस्त्यावर तिरपा पसरलेला ट्रक समोरुन येणा-या ट्रकच्या हेडलाइट मुळे दिसलाच नाही...त्या ट्रकच्या मागच्या कोप-याला कार धडकली आणि उजव्या बाजुला रस्त्यावर काही कळण्याच्या आतच गर्रकन वळाली. कारची डावी बाजु पार फाटली. नशीब तिकडे कोणी बसलेला नव्हता...आणि समोरुन दुसरा ट्रक येत नव्हता...नाहीतर...असो...मी पुन्हा एकदा वाचलो.
त्यावेळीस श्री लक्ष्मीनारायण नावाचे एस. पी. गडचिरोलीला होते. अत्यंट कडक-कर्तव्यदक्ष माणुस म्हणुन त्यांची ख्याती होती. इंतरपोलसाठी त्यांचीए निवड झाली आहे अशा वदंता होत्या. त्यांनी एकदा गडचिरोलीच्या कलेक्टरला अटक करण्याचा पराक्रमही केला होता. (गडचिरोलीत कलेक्टरपेक्षा पोलिस अधिक्षकाला जास्त अधिकार आहेत.) त्यांनी मला समंस पाठवले. मी खवळलो. मी तत्काळ "असल्या खोट्या आरोपांसाठी मला समंस पाठवण्याचा तुम्हाला कसलाही अधिकार नाही" असा उलट फ्यक्स पाठवला. मला त्यावेळीस माझ्या न्याय्य बाजुचा सार्थ अहंकार होता. कोणी एक ब्लाकमेलर खोट्या तक्रारी करतो आणि परस्पर शहानिशा न करता पोलिस मलाच जबाबासाठी बोलवतात म्हनजे काय़? त्यांना आस्म्ही एवढ्या लांबून हा कारखाना कसा चालवतो हे माहित नाही काय? ते स्वत: कारखान्याला भेट देवुन प्रत्यक्ष कामकाज पाहून शहानिशा करुन घेवू शकत नाहित काय?
त्यात अत्रामच्या कुटुंबियांना आम्ही केलेली मदत त्यांच्या डोळ्यात सलत असावी. नाहीतर एका फालतु (सरकारी वकीलही नंतर पोलिसांना हेच म्हणाले) ज्यात फक्त आरोप आहेत अशा तक्रारीच्या आधारावर त्यांनी गुन्हा नोंदवलाच नसता. मी रागावलो होतो. या कारखान्याला शासनाने एक रुपयाची मदत केली नव्हती. आम्ही होते नव्हते ते सारे गहान ठेवून हा कारखाना एक स्वप्न साकारन्यासाठी चालवत होतो. वारंवार जीव धोक्यात घालत होतो. एकाही व्रुत्तपत्राने वा सामाजिक संघटनांनी त्या प्रयत्नांची दखल घेतली नव्हती...घ्यावी ही अपेक्षाही नव्हती...पण आरोप? गुन्हा दाखल?
माझ्या संतप्त फ्याक्सची परिणती अशी झाली कि श्री. लक्ष्मीनारायण यांनी त्या तक्रारीच्या आधारावर खरोखरच गुन्हा दाखल केला. झाले. चौकशीचे सत्र मागे लागले. अटकपुर्व जामीण घ्यावा लागला. दर्म्यान इश्यु यशस्वीरित्या भरला गेला. लिस्टींगची प्रक्रिया सुरु झाली. आणि त्याच्वेळीस नागपुरवरील जवळपास सर्वच व्रुत्तपत्त्रांनी आमच्याविरुद्ध...विशेश्ता: माझ्या, आघाडी उघडली. पद्मशाली हीरो बनला. मी सर्व व्रुत्तपत्त्रांना निवेदने पाठवली...काहींनी छापली...काहींनी नाही. मी ग्रुहमंत्री ते मुखमंत्र्यांना निवेदने पाठवली. पण उपयोग शुन्य. तसाही विदर्भाकडे लक्ष द्यायला वेळ कोणाकडे असतो?
पण खरा कळस चढवला तो पुण्यातील नव्यानेच सुरु झालेल्या एका व्रुत्तसमुहाच्या पुणे आव्रुत्तीने. त्यांचा एक प्रतिनिधी मला भेटायला आला...अत्यंत मित्रत्वाच्या नात्याने माझ्याशी बोलला...माझ्याविरुद्ध त्याच्या व्रुत्तपत्त्रात बातमी येण्याची शक्यता सांगितली...मी लगोलग त्यांच्या संपदकांना जावुन भेटलो...सारी बाजु सांगण्याचा प्रयत्न केला...पण उपयोग शुन्य. त्यांनी काही ऐकुनच घेतले नाही.
दुस-या दिवशी भाग एक प्रसिद्ध. क्रमश: मालिका प्रसिद्ध करण्याचा निर्धार. जेही काही लिहिलेले ते अत्यंत चुकीचे आणि ज्यातील काहीच कळत नाही त्यावरुनचे निश्कर्ष. उदा. ३.२५ लाखाला घेतलेली अमोनिया क्र्यकर फर्नेस ताळेबंदात दुस-या वर्षी २.७५ लाखाची कशी झाली? म्हणजे भ्रश्ताचार...यांना घसारा नावाची काय गोष्ट असते हेही माहित नाही? मी संतापलो. सरळ श्री. श्याम अगरवालांकडे गेलो. त्यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले...लिही...त्यावेळीस त्यांचे सायंदैनिक "संध्यानंद" नुकतेच सुरु झाले असले तरी लोकप्रिय होते. मी पराकोटीचा प्रति-आघात केला. सायंकाळी ४ वाजता तो पेपर येताच अक्षरश: धुमाकुळ उडाला. खुद्द त्या पेपरमधील वातावरण तंग झाले. तेथील अनेक मित्रांनी मला फोन केले आणि मी योग्य तेच केले असा निर्वाळा दिला. दुस-याही दिवशी पुढचा भाग...माझे सायंकाळी उत्तर...शेवटी त्या व्रुत्तपत्त्रवर खुलासा छापायची वेळ आली. सात दिवस ते ती मालिका चालवणार होते ती तीन दिवसांत गुंडाळली. मला एशिअन एज आणि अजुन काही राष्ट्रस्तरीय व्रुत्तपत्त्रांनी पुरेपुर पाठिंबा दिला. पण त्यामुळे पुण्यातील बव्हंशी श्रमिक पत्रकार खवळले. त्यांना हा माझा व्रुत्तपत्रिय लेखन स्वतंत्र्यावरचा आघात वाटला. दरम्यान मला ज्येष्ठ पत्रकार आदरणीय श्री. गोपाळराव पटवर्धन यांनी घरी बोलावुन घेतले आणि माझी बाजु विचारली. मी त्यांना अथ-पासुन इतिपर्यंत सारे काही सांगितले. माझे स्पष्टीकरण त्यांना पटले. काही दिवसांत पुणे श्रमिक पत्रकार संघाने माझ्या निषेधाचा ठराव मांडायचा निर्णय घेतला. पण गोपाळरावांच्या विरोधामुळे जरी ठराव पास झाला असला तरी तो झाला माझे नाव वगळुन. खरोखर अशी निरपेक्ष भुमिका घेणारे गोपाळरावांसारखे पत्रकार झाले नाहित याचा खेद वाटतो.
दर्म्यान मी श्री लक्ष्मीनारायण यांच्याही विरुद्ध आघाडी उघडली होती. अक्षरश: हजारो निवेदने मी सारे आमदार/मंत्री/पोलिस महासंचालक यांना पाठवली. मी पोलिसांच्या आतताईपनामुळे प्रक्षुब्ध झालो होतो. हा सरळ सरळ अन्याय होता. तपासात मी सहकार्य करत होतो पण मी त्यासाठी म्हणुन एकदाही गदचिरोलीला गेलो नाही आणि गेलो तरी श्री लक्ष्मीनारायण यांना भेटलो नाही. माझ्या असंख्य निवेदनांचा त्यांनाही फटका बसला...त्यांची पुढे बदली झाली ती एका पोलिस ट्रेनिग केंद्रावर.
पण आता वाटते मी त्यांना आधीच भेटलो असतो तर कदाचित हा एवढा संघर्ष करण्याची मुळात वेळच आली नसती. मी कायद्याचे पालन करत समंसचा आदर ठेवायला हवा होता. पण सत्य माझ्या बाजुला आहे याचा पराकोटीचा विश्वास त्यावेळीस माझ्यावर हावी होता एवढेच काय ते खरे. आणि यामुळे मला जगाची नवी रुपे दिसली, विलक्षण अनुभव आले हेही खरे. पत्रकारिता ही कोणत्या थराला गेली आहे हे बघुन आजही मन विषण्ण होते. पुण्यातील पत्रकारांनी तर माझे नाव प्रदिर्घ काळ वाळीत टाकले ते टाकलेच. काही वाईट बातमी माझ्याबाबत असली तरच ती प्रसिइद्ध होई...एवढेच. (आजही अपवाद वगळता हीच स्थिती आहे.) पण फायदा हा झाला कि नंतर प्रदिर्घ काळ त्या विशिष्ट व्रुत्तपत्त्रानेच काय अन्य व्रुत्तपत्त्रांनीही कोणाही विरुद्ध व्यक्तिगत बदनाम्या करनारी भडक व्रुत्ते "शोध-पत्रकारितेच्या" गोंडस नावाखाली छापणे बंद केले.
तत्पुर्वी अनेकांना आयुष्यातुन अक्षरशा: उठवण्यात आले होते. पुणे विद्यापीठातील एका संशोधकाला तर शेवटी देशत्याग करावा लागला होता तर एक बिल्डर जवळपास वेडा झाला होता...कशामुळे तर त्यांच्याविरुद्ध अशा बिनबुडाच्या सवंग बातम्या छापल्या गेल्याने. आजही प्रत्येक घटनेची दुसरी बाजु असते याचे भान मराठी पत्रकारितेला कमीच आहे. पण त्यामुळे एखादा आयुष्यातुन उठु शकतो याची जाणीव असावी ही अपेक्षा आहे. पण एकंदरीत हे सारेच प्रकरण त्यावेळी खुप गाजले, असंख्य लोकांनी माझ्या धाडसाला दाद दिली हेही खरे. पण हाच धाडसी आणि त्याच वेळीस परिणामांबद्दल बेपर्वा असनारा माझा स्वभाव मला अनेकदा अडचणीत आणनार आहे याची मला तेंव्हा जाणीव नव्हती. समोरच्या लोकांना त्यांच्या फेस व्यल्युवर घेणे आणि तसे वर्तन करणे हा माझा मोठाच दोष आहे.
-----------२ इ.एम-------------------
गडचिरोली पोलिसांचा तपास कधी संपला हेही कळाले नाही. जवळपास दोन वर्षांनी एके दिवशी पोलिसांचे पत्र आले...
"तुमच्याविरुद्ध कसलेही पुरावे मिळाले नसल्याने केस ’सी" समरी करुन तपास बंद करण्यात आला आहे."
अर्थात ही बातमी छापतील ती व्रुत्तपत्त्रे कसली?
---------२ इ.एम.---------
अमेरिकेतुन आमच्या लोह भुकटीला चांगला प्रतिसाद येत होता. डोन हार्वे हा आमचा तेथील वितरक. शिवाय याच काळात तेथील एका आयर्न पावडर बनवणार्या कंपनीतील भारतीय मेटालर्जी इन्जिनीयर संजय कुलकर्णीशी ओळख झाली होती. त्याला आमच्या आयर्न पावडरची शुद्धता खुप आवडली होती. तो ज्या कंपनीत काम करत होता त्यांनीही एवढी शुद्धता गाठली नव्हती. अमेरिकेत आपण खुप मोठे मार्केट उभे करु शकतो असा त्याला विश्वास होता. पण त्यासाठी मला अमेरिकेला जाणे आवश्यक होते. याच वेळीस निर्जलीक्रुत फळभाज्यांच्या उत्पादनातही पडण्याची माझी तयारी सुरु होती. त्यासाठीही कंपनी स्थापन करुन ठेवली होती. होलंड व इन्ग्लंड येथील काही उत्पादक व वितरकांशीही दर्म्यान बोलणी सुरु होती. त्यांनीही चर्चेसाठीचे निमंत्रण दिले होते. सिंटर्ड उत्पादनासाठीच्या मशिनरीज सप्लायर्सनाही भेटायचे होते.
निर्जलीक्रुत फळभाज्यांचे ते मांस-मासे यांचे उत्पादन का तर मला या व्यवसायात अवाढव्य भवितव्य दिसत होते. प्रत्येक क्षेत्रात आमच्या "सुर्योदय" ग्रुपचे स्थान असावे असे माझे स्वप्न होते आणि वेगाने शिकता येइल एवढी प्रतिभा देवाने मला देवुन ठेवली होती. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या देशातील शेतीची स्थिती अशीच हलाखीची राहील जोवर क्रुषिमालावर प्रक्रिया करणारे अवाढव्य उद्योग उभे राहणार नाहीत. ही जाणीव मला तेंव्हाच झाली होती. त्या उत्पादनांना जागतीक बाजारपेठ उपलब्ध तर होतीच पण देशांतर्गतही होती व आहे...पण अजुनही या क्षेत्रात काही घडले नाही. आणि तशी इछाशक्ती भारतीय उद्योजक वा सरकारमद्धे नाही. आजही भारतात प्रक्रिया उद्योगांअभावी लाखो टन शेतमालाचे वाटोळे होत आहे. त्याचा ना खरेदीदारास फायदा, ना शेतकर-याला...अब्जावधी रुपयांचे राष्ट्रीय उत्पादन वाया जात आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे तर कधी अनुपलब्धतेने भाव गगनाला भीडतात म्हणुन खरेदीदार रस्त्यावर येत आहेत अशी विनोदी स्थिती भारतात आहे.
मी संगतवार माझा दौरा ठरवला. अर्थात त्याचे नियोजन केले ते माझे मित्र आणि काही काळ संचालक असलेले श्री. प्रशांत वाणी यांनी. प्रथम होलंड मग इंग्लंड आणि मग अमेरिकेतील डेट्रोइट येथे जायचे होते. सर्व भेटी ठरवण्यात आल्या होत्या. विसा तयार होते. निघायचा दिवस आला. रात्रीची फ़्लाईट होती. मी त्या दिवशी फारच गंभीर होतो. मनात नाना कल्लोळ उठले होते. विदेशगमनाचा कसलाही आनंद नव्हता...होती ती जबाबदारीची वाढलेली जाणीव. मी येथवर कंपनीचा गाडा अक्षरशा: खेचत आनला होता...बाहेरचे विरोधी ठीक होते...बाह्य संघर्ष मला आव्हानदायी वाटत...त्याशी तोंड देणे आव्हानदायी असे. पण अंतर्गत विरोधाचे अनेक सुप्त प्रवाह होते...त्याची मला चांगलीच जाण होती. माझा वेग नको तेवढा जास्त आहे हे कळत होते...पण जर मराठी मानसांचे एक नवे साम्राज्ज्य उभे करायचे असेल तर त्याला इलाज नव्हता. माझ्यात नुसती कल्पकता नव्हती तर कल्पनांना साकार करण्याची अदम्य इछ्छा होती...आणि मी काही गोष्टी अल्पावधीत केल्याही होत्या...
आणि हाच माझा वेग अनेकांना पसंत नव्हता...
आणि जे करुन ठेवले होते त्याकडेही बघायची इछ्छा नव्हती...
मला मार्ग काढावे लागणार होते...पण कसे हे मला कळत नव्हते. दैनंदिन व्यवस्थापन आणि अचुक वित्त व्यवस्थापन यासाठी मला अशाही स्थितीत अवलंबुन रहावे लागत होते कारण मी त्यात पुर्ण अडाणी होतो...
के.एल.एम. च्या अवाढव्य जंबो-जेटमद्धे बसलो तेंव्हा मला नकळत खुप एकाकी वाटु लागले.
अश्रु झरु लागले.
----------------------------------------------------------------------------------------

Comments
Post a Comment