भारतीय इतिहास -२०
भारतीय इतिहास
- मुहम्मद इब्न कासिम

- मुहम्मद इब्न कासिम : (आठव्या शतकाचे पहिले चतुर्थक). एक तरुण तडफदार अरब सेनानी. आठव्या शतकाच्या सुरुवातीस सिंधचा राजा दाहिर (दाहर) व इराकचा अरब सुभेदार अल् हज्जाज यांत वितुष्ट झाले. तेव्हा अल् हज्जाजने दाहिरवर स्वारी करण्यासाठी मुहम्मद बिन कासिम या तरुण अधिकाऱ्याची फौज देऊन नेमणूक केली.
- मुहम्मद घोरी

- मुहम्मद घोरी : (कार. ११७५–१२०६). भारतातील मुस्लिम सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला सुलतान. घोरी घराण्यातील हा कर्तबगार सुलतान. शिहाबुद्दीन उर्फ मुइझ्झुद्दीन घोरी ऊर्फ मुहम्मद या नावांनी इतिहासात प्रसिद्ध आहे.
- मुहम्मद तुघलक

- मुहम्मद तुघलक : (कार. १३२५–२० मार्च १३५१). तुघलक घराण्यातील एक लहरी व महत्त्वाकांक्षी दिल्लीचा सुलतान. त्याचे मूळ नाव उलुवूखान. वडिलांच्या मृत्यूनंतर मुहम्मद हे नाव धारण करून तो १३२५ मध्ये गादीवर बसला. वडिलांच्या कारकीर्दीत १३२१ व १३२३ मध्ये त्याने वरंगळवर स्वारी करून तेलंगण जिंकले.
- मैत्रक घराणे

- मैत्रक घराणे : प्राचीन भारतातील एक गुप्तकालीन प्रसिद्ध राजघराणे. या वंशाचे अनेक कोरीव लेख सापडले आहेत. त्यांपैकी फारच थोडे शिलालेख असून उर्वरित ताम्रपट आहेत.
- मोगलकाळ

- मोगलकाळ : हिंदुस्थानात तेराव्या शतकात मुस्लिम सत्तेचा उदय झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर (१७०७) तिला अवनत अवस्था प्राप्त झाली. दिल्लीच्या सुलतानशाहीचा मोगलपूर्व काळ हा भारतातील मुस्लिम सत्तेचा पहिला कालखंड ठरतो. [→ मुसलमानी अंमल, भारतातील].
- यझदानी, गुलाम

- यझदानी, गुलाम : (२२ मार्च १८८५–१३ नोव्हेंबर १९६२). भारतातील एक श्रेष्ठ संशोधक, पुरातत्त्वज्ञ व कलासमीक्षक. त्यांचा जन्म सनातनी मुस्लिम कुटुंबात दिल्ली येथे झाला. वडील मुन्शी गुलाम जीलानी व आई मखोली बेगम.
- यशोधर्मन्

- यशोधर्मन् : (इ. स. सहावे शतक). प्राचीन भारतातील औलिकर वंशातील एक पराक्रमी श्रेष्ठ राजा. त्याच्याविषयीची माहितीमुख्यत्वे कोरीव लेखांवरून मिळते. यशोधर्मन् किंवा यशोधर्मा याला विष्णुवर्धन असेही दुसरे नाव होते.
- यशोवर्मन

- यशोवर्मन : (इ. स. सु. सातवे शतक). कनौजचा सुप्रसिद्ध प्राचीन राजा. इ. स. सातव्या शतकाच्या पूर्वार्धात तो होऊन गेला असावा. याच्या पूर्वजांविषयी काही माहिती नाही.
- यादव घराणे

- यादव घराणे : महाराष्ट्रातील मध्ययुगातील एक इतिहास प्रसिद्ध राजघराणे. त्याची महाराष्ट्र व त्यालगतच्या प्रदेशावर पाचवा भिल्लम (कार. ११८५ – ९३) याच्या कारकीर्दीपासून यादव घराण्याच्या ऱ्हासापर्यंत (इ. स. १३१८) अधिसत्ता होती.
- याल्टा परिषद

- याल्टा परिषद : दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळात याल्टा (क्रिमिया–सोव्हिएट रशिया) येथे तीन बड्या दोस्त राष्ट्रांत झालेली परिषद. ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँक्लिन रूझवेल्ट व रशियन पंतप्रधान जोसेफ स्टालिन यांत ४ ते ११ फेब्रुवारी १९४५ दरम्यान अनेक बैठकी झाल्या.
Comments
Post a Comment