भारतीय इतिहास-१२

भारतीय इतिहास

गोरिंग, हेरमान व्हिल्हेल्म 
गोरिंग, हेरमान व्हिल्हेल्म : (१२ जानेवारी १८९३ — १६ ऑक्टोबर १९४६). जर्मन मुत्सद्दी व वायुसेनाप्रमुख. ह्याचा जन्म बव्हेरियातील रोझेनहाइम ह्या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९१२ मध्ये त्याने कैसरच्या भूसेनादलात प्रवेश मिळविला.
गोविंद, तिसरा 
गोविंद, तिसरा : (७७६? — ८१४). महाराष्ट्रातील राष्ट्रकूट वंशातील एक पराक्रमी राजा. तो ध्रुव राजाचा मुलगा. गोविंद हा कनिष्ठ मुलगा असूनही ध्रुवाने त्याचीच भावी वारस म्हणून नियुक्ती केली आणि त्यास औपचारिक रीत्या राज्यभिषेकही केला.
गौतमीपुत्र सातकर्णि 
गौतमीपुत्र सातकर्णि : (इ. स. ?–८६). सातवाहन वंशातील एक अत्यंत बलाढ्य आणि थोर राजा. हा इ. स. ६२ मध्ये गादीवर आला, तेव्हा सातवाहन वंशाला अवनत स्थिती प्राप्त झाली होती. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ हे प्रदेश शकवंशी क्षत्रपांनी बळकावले होते.
ग्रीक सत्ता, भारतातील 
ग्रीक सत्ता, भारतातील : अलेक्झांडरच्या भारतावरील इ. स. पू. ३२६ च्या आक्रमणानंतर भारतामध्ये काही प्रदेशांनी त्याचे मांडलिकत्व पतकरले, तर काही भागांवर त्याने आपले अधिकारी (क्षत्रप) नेमले. अशा प्रकारे ग्रीक सत्तेचा भारतात प्रारंभ झाला.
ग्रीकांश संस्कृति 
ग्रीकांश संस्कृति : (हेलेनिस्टिक सिव्हिलायझेशन). अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या अंकित साम्राज्याचे विभाजन झाले,परंतु त्यातील समाजावर ग्रीक संस्कृतीची छाप पडली. त्यांतील प्राचीन संस्कृतींच्या व ग्रीक संस्कृतींच्या मिश्रणातून एक नवीन संस्कृती उदयाला आली. तिला ग्रीकांश संस्कृती ही संज्ञा देण्यात येते.
घोरी घराणे 
घोरी घराणे : दहाव्या शतकात घौरच्या अफगाणांनी घोर येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले. घोरी व गझ्नी यांतील अनेक वर्षांच्या तंट्यातून घोरी घराणे इतिहासाला परिचित झाले. शन्सबानी वंशातील मलिक इझ्झुद्दीन अल् हुसैन याच्या कुत्बुद्दीन, सैफुद्दीन व अलाउद्दीन या तीन मुलांनी नावलौकिक मिळविला.
चंदेल्ल घराणे 
चंदेल्ल घराणे : मध्य प्रदेशातील एक प्रसिद्ध राजपूत वंश. या वंशाचे नाव तद्‌वंशीयानी बांधलेल्याखजुराहो येथील मंदिरामुळे अजरामर झाले आहे. राजपुतांच्या श्रेष्ठ अशा छत्तीस कुलांत चंदेल्लांची गणना होते. ते आपला वंश अत्रिपुत्र चंद्र यापासून निघाला असे मानीत व म्हणून त्यांनी चन्द्रात्रेय (चंदेल्ल) असे नाव धारण केले.
चुंद्रगुप्त, दुसरा 
चुंद्रगुप्त, दुसरा : (सु. ३७६ — ४१४). गुप्तवंशातील प्रसिद्ध कलाभिज्ञ राजा. समुद्रगुप्तानंतर दुसरा चंद्रगुप्त सु. ३७६ किंवा ३८६ मध्ये गुप्त साम्राज्याच्या गादीवर आला. तो दत्तदेवी या समुद्रगुप्ताच्या पट्टराणीचा मुलगा.
चंद्रगुप्त, पहिला 
चंद्रगुप्त, पहिला : (? — ३३५). गुप्त वंशातील पहिला प्रसिद्ध राजा. याच्या जन्मासंबंधी तसेच बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तो ३१८ मध्ये मगधाच्या गादीवर आला असावा. त्याच्या पित्याचे नाव घटोत्कच. घटोत्कचाचा राज्यविस्तार फार नसावा; कारण त्याच्या लेखात महाराज ही साधी पदवी लावली आहे.
चंद्रगुप्त मौर्य 
चंद्रगुप्त मौर्य : (इ. स. पू. ? — इ. स. पू. ३००). मौर्य वंशाचा संस्थापक व पहिला राजा. चंद्रगुप्ताच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. याच्या जन्माबद्दल अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. मौर्य वंशाबद्दल पौराणिक, बौद्ध आणि ग्रीक आधारग्रंथांतून भिन्न मते आढळतात.

Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा