भारतीय इतिहास -२४
भारतीय इतिहास
- सेन घराणे

- सेन घराणे : बंगालमधील एक मध्ययुगीन राजघराणे. त्याच्या मूलस्थानाविषयी तसेच मूळपुरुषाविषयी इतिहासतज्ञांत एकमत नाही. ते स्वतःस कर्नाट-क्षत्रिय, ब्रह्म-क्षत्रिय आणि क्षत्रिय मानत. त्यावरून सेन राजे हे कर्नाटकातून बंगालमध्ये आलेले क्षत्रिय होते.
- सोमवंश

- सोमवंश : इक्ष्वाकु जसा सूर्यवंशाचा तसा पुरूरवा हा सोमवंशाचा मूळ पुरुष होय. तो सोम किंवा बुध याला इला या स्त्रीपासून झाला होता; म्हणून त्याला ऐल असेही नाव पडले होते.
- सोळंकी घराणे

- सोळंकी घराणे : गुजरात, कच्छ, सौराष्ट्र इ. प्रदेशांवर राज्य करणारा एक मध्ययुगीन राजवंश. याचा चौलुक्य वा चालुक्य राजवंश असाही उल्लेख करतात. राजपुतांच्या चार अग्निकुलांत याचा अंतर्भाव होतो. वरील प्रदेशांवर सोळंकी घराण्याचा दहावे ते तेरावे शतकांदरम्यान अंमल होता.
- लालबहादूर शास्त्री

- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील निष्ठावान कार्यकर्ते, थोर राष्ट्रभक्त आणि भारताचे दुसरे पंतप्रधान
- मुद्गल

- मुद्गल : कर्नाटक राज्याच्या रायचूर जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या ११,४५८ (१९८१). हे रायचूरच्या नैर्ऋत्येस सु. ९६ किमी. वर असून शहर व त्याच्या परिसरात अनेक ऐतिहासिक कोरीव लेख आहेत. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला काकतीय राजवटीच्या काळात मुद्गल हे महत्त्वाचे सैनिकी ठाणे होते.
- मुधोळ

- मुधोळ : कर्नाटक राज्याच्या विजापूर जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे ठिकाण व भूतपूर्व मुधोळ संस्थानाची राजधानी, लोकसंख्या २१,३५६ (१९८१). हे जमखंडीपासून दक्षिणेस १९ किमी.वर घटप्रभा नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. जुन्या काळी ‘मुदुवोलाल’ (सुंदर शहर) या नावाने ते ओळखले जाई.
- मोंघीर

- मोंघीर : (मुंगीर). बिहार राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठाणे आणि इतिहासप्रसिद्ध शहर. लोकसंख्या १,२९,१८७ (१९८१). हे पाटण्याच्या पूर्वेस १६० किमी. अंतरावर गंगा नदीच्या उजव्या काठावर वसले आहे. याच्या नावाविषयी निरनिराळी मते आढळतात.
- गुरु गोविंदसिंग

- शिखांचे दहावे व अखेरचे गुरू. शिखांचे नववे गुरू तेगबहादुर हे यांचे वडील. आईचे नाव गुजरी. जन्म बिहारमधील पाटणा येथे. लहानपणी ‘गोविंदराय’ या नावाने ते ओळखले जात.
- लाला लजपत राय

- भारतीय स्वातंत्र्य-चळवळीतील एक थोर क्रांतिकारक नेते. त्यांचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके (जागराँ तहसील) या गावी जैन घराण्यात झाला.
- बिपिनचंद्र पाल

- भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर बंगाली नेते. त्यांचा जन्म उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात पॉइल (सिल्हेट जिल्हा) या गावी झाला.
Comments
Post a Comment