भारतीय इतिहास-१७
भारतीय इतिहास
- पालवंश

- पालवंश : बंगालमधील एक प्राचीन राजवंश. सातव्या शतकाच्या पहिल्या पंचविशीत बंगालचा राजा शशांक याच्या निधनानंतर कनौजचा हर्ष आणि आसामचा भास्करवर्मा यांनी बंगालची आपसांत वाटणी केली.
- पिसुर्लेकर, पांडुरंग सखाराम

- पिसुर्लेकर, पांडुरंग सखाराम : (३० मे १८९४ – १० जूलै १९६९). गोव्यातील एक प्रसिध्द इतिहासकार. त्यांचा जन्म गोव्यातील शेणवी कुटुंबात पिसुर्ले (ता. सत्तरी) येथे झाला. आईचे नाव कृष्णाबाई. त्यांचे शिक्षण साखळी व पणजी येथे झाले.
- पुराभिलेखविद्या

- पुराभिलेखविद्या : इतिहासकाली लिहिलेला मजकूर म्हणजेच पुराभिलेख. असे लेखन इतिहासकालात राजवंश, सरंजामदार, धार्मिक संस्था, व्यापारी, प्रवासी, धर्मगुरु इत्यादींनी केले असून त्यांनी व्यवहार लिहून ठेवले आणि त्याचे रक्षण केले.
- पुलकेशी, दुसरा

- पुलकेशी, दुसरा : (सु.६१०/११–६४२).बादामीच्या चालुक्य घराण्यातील एक पराक्रमी आणि कलाभिज्ञ राजा. आपला पिता पहिला कीर्तिवर्मा याच्या मृत्युसमयी हा अल्पवयी असल्याने त्याचा चुलता मंगलेश हा राज्य करू लागला.
- पुळुमावि (यि)

- पुळुमावि (यि) : पुराणांतील राजवंशावळींत सातवाहन वंशातील तीन पुळुमावी राजांचा उल्लेख आहे. त्यांपैकी वासिष्ठीपुत्र पुळुमावी आणि तिसरा पुळुमावी यांचेच कोरीव लेख व नाणी सापडली आहेत. त्यांतही पहिला विशेष प्रसिद्ध आहे.
- पुष्यमित्र शुंग

- पुष्यमित्र शुंग : (इ.स.पू.१८७–१५१). शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती. मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु. १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. मौर्य वंशातील अखेरचे राजे अत्यंत निर्बल होते.
- पूरुवंश

- पूरुवंश : ऋग्वेदकाली पूरू हे एका आर्यवंशाचे नाव होते (शतपथ ब्राह्मण व वायुपुराण यांनी ‘पूरू’च्या ऐवजी ‘पुरु’ असे म्हटले आहे.) ऋग्वेदात यदू, तुर्वश, द्रुह्यू, अनू ह्यांच्या बरोबर पूरू या वंशाचा निर्देश येतो. ही सर्व नावे बहुवचनी असतात (ऋग्वेद १.१०८.८). म्हणून ती व्यक्तिनामे नसून वंशनामे ठरतात.
- पृथुवैन्य

- पृथुवैन्य : पृथु (क्कचित् पृथि किंवा पृथी) याचे नाव वैदिक वाङ्मयात -ऋग्वेद ८.९.१०; १०.९३.१४; १०.१४८.५; अथर्ववेद ८.९.१०; ८.९.२४; पंचविंशब्राह्मण १३.५.१९; जैमिनीय उपनिषद्ब्राह्मण १.१०.९ इ. अनेक ठिकाणी येते. तो कृषिविद्येचा संशोधक होता, असे अथर्ववेदात म्हटले आहे.
- पेंढारी व ठग

- पेंढारी व ठग : भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना ही एक प्रकारे धार्मिक हिंसाचारी गुप्त संघटना होती.
- पेनुकोंडे

- पेनुकोंडे : आंध्र प्रदेश राज्यातील इतिहासप्रसिद्ध किल्ल्याचे स्थळ. अंनतपूर जिल्ह्यात ते अंनतपूरपासून सु. ७० किमी. वर गुंटकल-बंगलोर मार्गांवर वसले आहे. टॉलेमीने त्याचा उल्लेख पिकेंडका असा केला आहे. पेनुकोंडा म्हणजे मोठी टेकडी
Comments
Post a Comment