भारतीय इतिहास-१०

भारतीय इतिहास

औरंगजेब 
औरंगजेब : (२४ ऑक्टोबर १६१८ - २०फेब्रुवारी १७०७). दिल्लीच्या मोगल घराण्यातील सहावा बादशहा. संपूर्ण नाव मुहियुद्दीन मुहंमद औरंगजेब ⇨ शाहजहान व मुमताज यांचा तिसरा मुलगा. गुजरातमधील दोहद येथे जन्मला. शाहजहानच्या बंडामुळे वयाच्या सहाव्या वर्षी त्यास जहांगीरकडे ओलीस रहावे लागले.
कण्व (काण्व) वंश 
कण्व (काण्व) वंश : उत्तर हिंदुस्थानातील प्राचीन मगध प्रदेशावर इ. स. पू. ७५ ते इ. स. पू. ३० च्या दरम्यान राज्य करणारा एक प्राचीन ब्राह्मण वंश. त्यास काण्वायन असेही म्हणतात. या राजांनी ४५ वर्षे राज्य केले. त्यांच्या शासनकालाविषयी विद्वानांतमतभेद आहेत.
कत्यूरी वंश 
कत्यूरी वंश : हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कुमाऊँ (उत्तर प्रदेश) प्रदेशातील एक प्राचीन वंश. ह्या वंशातील राजे नवव्या शतकाच्या अखेरीपासून दहाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत राज्य करीत होते. या वंशाला हे नाव त्या प्रदेशातील कत्यूर खोऱ्यावरून पडले आहे; पण ते त्यांच्या कोरीव लेखांत आढळत नाही.
कदंब वंश 
कदंब वंश : दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यातील उत्तर कानडा (कॅनरा) प्रदेशातील एक प्राचीन वंश. ह्या वंशातील राजांनी उत्तर कानडा,हानगल, गोवा व त्याच्या जवळपासच्या प्रदेशांवर ३४० ते ६१० च्या दरम्यान, जवळजवळ अडीचशे वर्षे राज्य केले.त्यांच्या लेखांवरून त्यांच्या वंशाची का हीशी कल्पना येते, मात्र त्यांच्या काळाविषयी निश्चित माहिती मिळत नाही.
कनिष्क 
कनिष्क : (सु. पहिले शतक). कुशाण वंशातील सर्वश्रेष्ठ राजा. हा विम कडफिससनंतर गादीवर आला, पण त्याचा त्या कुशाण राजाशी असलेला संबंध निश्चितपणे माहीत नाही. त्याच्या कारकीर्दीचे आरंभीचे लेख उत्तर प्रदेशात सारनाथ येथे सापडले आहेत.
कलचुरी वंश 
कलचुरी वंश : प्राचीन भारतातील एक प्रसिद्ध वंश. उत्तर किंवा दक्षिण भारतातील कोणत्या ना कोणत्या प्रदेशावर ५५० पासून १७४० पर्यंत, म्हणजे जवळजवळ बाराशे वर्षे हा वंश राज्य करीत होता. त्यांच्या कोरीव लेखांवरून ह्या वंशाची बरीच माहिती ज्ञात होते. त्यांत या वंशाचे नाव कटच्चुरी, कटचुरि, कलचुरी, कालच्चुरि, कलतुर्य, कळचुर्य इ. प्रकारांनी येते.
काकतीय वंश 
काकतीय वंश : आंध्रमधील एक प्रसिद्ध वंश. ह्या वंशाचे राजे अनमकोंडा व वरंगळ ह्या राजधानींमधून सु.१०७५ ते १३०३ च्या दरम्यान आंध्र प्रदेशावर राज्य करीत होते. तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यांनी उत्तरेस विजगापट्टण, दक्षिणेस चित्तूरच्या आसपास, पूर्वेस समुद्रकिनारा व पश्चिमेस गुलबर्गा असे प्रदेश व्यापले.
कुत्बुद्दीन ऐबक 
कुत्बुद्दीन ऐबक : (?—१२१०). दिल्लीच्या तख्तावर बसणारा पहिला मुसलमान सुलतान व गुलाम घराण्याचा संस्थापक. हा मुइझ्झुद्दीन मुहम्मद घोरीचा गुलाम होता. स्वत:च्या कर्तृत्वामुळे तो थोर पदास चढला. हिंदुस्थानातील साम्राज्याचे रक्षण करण्याकरिता मुइझ्झुद्दीनने त्यास आपला प्रतिनिधी म्हणून नेमले.
कृष्णदेवराय 
कृष्णदेवराय स्वत: विद्वान होता आणि त्याने अनेक विद्वानांना व कलावंतांना आश्रय दिला. तेलुगू साहित्यातील प्रख्यात आठ कवी त्याच्या दरबारात होते आणि ‘अष्टदिग्गज’ म्हणून ओळखले जात. तो स्वत: कन्नड भाषी असूनही तेलुगू व संस्कृत या भाषांवर त्याचे चांगले प्रभुत्व होते व त्याने ह्या भाषांत ग्रंथनिर्मितीही केली आहे.
खर्ड्याची लढाई 
खर्ड्याची लढाई : मराठे आणि निजामुल्मुल्क यांच्यात ११ मार्च १७९५ रोजी झालेली महत्त्वपूर्ण लढाई. मराठ्यांच्या इतिहासात नाना फडणीसाच्या कर्तृत्वाचा परमोच्च बिंदू म्हणजे खर्ड्याची लढाई होय. १७२४ मध्ये निजामुल्मुल्काने स्थापलेली हैदराबादची आसफशाही व मराठेशाही ह्या दोन्हीही स‌त्ता दक्षिणेत आपले आसन स्थिर करीत होत्या.

Comments