भारतीय इतिहास-६

भारतीय इतिहास

पुष्यमित्र शुंग 
पुष्यमित्र शुंग : (इ.स.पू.१८७–१५१). शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती. मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु. १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. मौर्य वंशातील अखेरचे राजे अत्यंत निर्बल होते. त्यांच्या काळी बॅक्ट्रियाच्या डीमीट्रिअस या ग्रीक राजाने उत्तर भारतावर स्वारी करून साकेत (अयोध्या), मथुरा व पांचाल हे प्रदेश पादाक्रांत केले आणि पाटलिपुत्रापर्यंत धडक मारली.
पुळुमावि (यि) 
पुळुमावि (यि) : पुराणांतील राजवंशावळींत सातवाहन वंशातील तीन पुळुमावी राजांचा उल्लेख आहे. त्यांपैकी वासिष्ठीपुत्र पुळुमावी आणि तिसरा पुळुमावी यांचेच कोरीव लेख व नाणी सापडली आहेत. त्यांतही पहिला विशेष प्रसिद्ध आहे. कोरीव लेखांत व नाण्यांवरील लेखांत यालाच ‘शीवश्री पुळुमावी’असेही म्हटले आहे.
पूरुवंश 
पूरुवंश : ऋग्वेदकाली पूरू हे एका आर्यवंशाचे नाव होते (शतपथ ब्राह्मण व वायुपुराण यांनी ‘पूरू’च्या ऐवजी ‘पुरु’ असे म्हटले आहे.) ऋग्वेदात यदू, तुर्वश, द्रुह्यू, अनू ह्यांच्या बरोबर पूरू या वंशाचा निर्देश येतो. ही सर्व नावे बहुवचनी असतात (ऋग्वेद १.१०८.८). म्हणून ती व्यक्तिनामे नसून वंशनामे ठरतात. पंजाबमधील पंचजनांत त्यांची गणना केली आहे. त्यांचे निवासस्थान सरस्वती नदीच्या दोन्ही तीरांवर होते. अर्थातच ते तृत्सू व भरतांचे शेजारी होते आणि त्यांची तृत्सूंशी व भरतांशी केव्हा मैत्री तर केव्हा युद्धे होत.
पृथुवैन्य 
पृथुवैन्य : पृथु (क्कचित् पृथि किंवा पृथी) याचे नाव वैदिक वाङ्मयात -ऋग्वेद ८.९.१०; १०.९३.१४; १०.१४८.५; अथर्ववेद ८.९.१०; ८.९.२४; पंचविंशब्राह्मण १३.५.१९; जैमिनीय उपनिषद्ब्राह्मण १.१०.९ इ. अनेक ठिकाणी येते. तो कृषिविद्येचा संशोधक होता, असे अथर्ववेदात म्हटले आहे. पंचविंशब्राह्मणात त्याला दोन्ही लोकांचा तसेच मनुष्य आणि पशू यांचा अधिपती म्हटले आहे. अनेक ठिकाणी त्याच्या नावाला वैन्य (वेनाचा पुत्र) हे उपपद लावले आहे. तो पृथ्वीचा पहिला राजा होता.
पृथ्वीराज चौहान 
पृथ्वीराज चौहान : (सु. ११६६ ते ११९२). राजपूत इतिहासातील चाहमान घराण्यातील एक प्रसिद्ध राजा. या वंशातील सोमेश्वर यास पृथ्वीराज व हरिराज असे दोन मुलगे होते. पृथ्वीराज ११७७ मध्ये पित्याच्या निधनानंतर गादीवर आला; परंतु तो लहान असल्यामुळे त्याची आई कर्पूरदेवी ही कंदबवास ह्या मंत्र्याच्या साहाय्याने काही काळ राज्याकारभार पाहत होती.
पेंढारी व ठग 
पेंढारी व ठग : भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत रयतेची लूटमार व वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या. यांपैकी पेंढाऱ्यांच्या सशस्त्र संघटित टोळ्या राजकीय सत्ताधाऱ्यांच्या आश्रयाने उदयास आल्या. ठगांची संघटना ही एक प्रकारे धार्मिक हिंसाचारी गुप्त संघटना होती.
पेनुकोंडे 
पेनुकोंडे : आंध्र प्रदेश राज्यातील इतिहासप्रसिद्ध किल्ल्याचे स्थळ. अंनतपूर जिल्ह्यात ते अंनतपूरपासून सु. ७० किमी. वर गुंटकल-बंगलोर मार्गांवर वसले आहे. टॉलेमीने त्याचा उल्लेख पिकेंडका असा केला आहे. पेनुकोंडा म्हणजे मोठी टेकडी. त्याला पेनुगोंडे असेही म्हणतात. जैनांच्या अठरा तीर्थांपैकी ते एक असून येथे अनेक कोरीव लेख आहेत.
पेशवे 
पेशवे : मुख्यप्रधान या अर्थी मराठी अंमलात वापरलेली संज्ञा. प्राचीन काळी मुख्यप्रधान हे पद अस्तित्वात होते किंवा काय ह्याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. परंतु मुसलमानी अंमलात पेशवा ह्या शब्दाने मुख्यप्रधानाचा उल्लेख आढळतो. एखादे मोठे देवस्थान किंवा एखाद्या मोठ्या घराण्याची जहागीर ह्यांची व्यवस्था पाहणाऱ्या प्रमुख व्यक्तीस पेशवा किंवा प्रधान आणि पुढे मुख्यप्रधान म्हणू लागले.
पोरस 
पोरस : (इ. स. पू. चौथे शतक). वेदकालीन पूरु वंशातील एक पराक्रमी व स्वाभिमानी राजा. याचे राज्य मध्य पंजाबात चिनाब व झेलम नद्यांच्या दुआबात होते. तक्षशिला ह्या त्याच्या शेजारील राज्याचा अंभी राजा पोरसचा शत्रू होता. पोरसच्या पराक्रमाची त्याला दहशत बसली होती.
पोर्तुगीज सत्ता, भारतातील 
पोर्तुगीज सत्ता, भारतातील : सोळाव्या शतकात व्यापारासाठी अनेक यूरोपीय हिंदुस्थानात आले. त्यांपैकी पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या. पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील गोवा, दमण, दीव या प्रदेशांवर १९६१ अखेर अधिसत्ता गाजवली. नौदलात पुढारलेले पोर्तुगीज पंधराव्या शतकात दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून व्यापारासाठी भारतात आले.

Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा