भारतीय इतिहास-२१
भारतीय इतिहास
- रंगो बापूजी

- गो बापूजी : (एकोणिसावे शतक). सातारचे ⇨प्रतापसिंह भोसले (कार. १८०८−१८३९) यांचा निष्ठावान सेवक, मुत्सद्दी व वकील. त्याचे पूर्ण नाव रंगो बापूजी गुप्ते-देशपांडे. त्याचा जन्म शिवकालात प्रसिद्धीस आलेल्या रोहिडखोऱ्याच्या दादाजी नरस प्रभू यामावळ्यातील ऐतिहासिक घराण्यात झाला.
- रक्तहीन राज्यक्रांति

- रक्तहीन राज्यक्रांति : इंग्लंडमध्ये इ. स. १६८८ साली मानवी रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेली राज्यक्रांती. या क्रांतीचाउल्लेख वैभवशाली राज्यक्रांती असाही केला जातो. स्ट्यूअर्ट घराण्यातील दुसरा चार्ल्स या राजाच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ दुसराजेम्स (कार. १६८५–८८) हा इंग्लंडच्या गादीवर आला. ईश्वरदत्त व अनियंत्रित राजसत्तेच्या तत्त्वांवर त्याचा विश्वास होता.
- रघुनाथराव पेशवे

- घुनाथराव पेशवे : (१ ऑगस्ट १७३४-११ डिसेंबर १७८३). उत्तर पेशवाईतील अल्पकाळ सत्तेवर (१७७३) असलेला एक पेशवा. पहिला बाजीराव व काशीबाई यांचा हा दुसरा मुलगा असून तो राघो भरारी, राघोबा, दादासाहेब इ. नावांनीही ओळखला जातो.
- रझिया सुलतान

- रझिया सुलतान : ( ?–१३ नोव्हेंबर १२४०). दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणारी तार्तर (इल्बारी) घराण्यातील पहिली राणी. तिचे चारित्र्य, चरित्र आणि कर्तृत्व यांविषयी इतिहासात अनेक कथा-दंतकथा-वदंता प्रचलित आहेत.
- रणजितसिंग

- रणजितसिंग : (१३ नोव्हेंबर १७८० – २७ जून १८३९). पंजाबातील शीख सत्तेचा संस्थापक. त्याचा जन्म अजोळी म्हणजे जीदनजीकच्या बुद्रुखान या खेड्यात झाला; तथापि गुजराणवाला हेही त्याचे जन्मगाव असल्याचे एक मत आहे. त्याचे वडील महासिंग (महासिंह) आणि आईचे नाव बिबी राजकौर.
- रट्ट घराणे

- रट्ट घराणे : कर्नाटकातील एक प्राचीन राजघराणे. या घराण्याचा रट्टगुडी किंवा रट्टगुड्लू असाही उल्लेख करतात. या घराण्याचा संस्थापक पृथ्वीराम. या घराण्याचा अंमल इ. स. ८५० ते १२५० दरम्यान कलदारि-बेळगावच्या परिसरातल्या कुंडी नामक प्रदेशावर होता.
- राजदप्तरविद्या

- राजदप्तरविद्या : (डिप्लोमॅटिक्स). प्राचीन भारतातील नृपती परराज्याशी केलेले करारमदार, सरदार-सरंजामदारांस दिलेल्या सनदा, प्रजेच्या कल्याणासाठी काढलेले जाहीरनामे, बक्षीसपत्रे, हुकूमनामे आदी महत्त्वाचे दस्तऐवज एका सिलबंद पेटीत आपल्याजवळ प्रासादात वा जामदारखान्यात ठेवीत असत.
- राजपुतांचा इतिहास

- राजपुतांचा इतिहास : मध्ययुगात राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या भागात वर्चस्व प्रस्थापित करणारे बहुविध राजवंश. राजस्थानात उदयास आलेल्या राजवंशांना राजपुत्र अशी संज्ञा आहे. राजपूत हा तिचा अपभ्रंश होय. संस्कृतातील ‘राजन्य’ शब्दासारखाच राजपूत याचा क्षत्रिय या अर्थी उपयोग होतो.
- राजाराम, छत्रपति

- राजाराम, छत्रपति : (२ मार्च १६७० – १५ मार्च १७००). छत्रपती शिवाजी महाराजांचा सोयराबाईपासून झालेला धाकटा मुलगा व छ. संभाजींचा सावत्र भाऊ. त्यांचा जन्म रायगडावर झाला. राजारामांचे लग्न प्रतापराव गुजराची मुलगी जानकीबाई हिच्याशी झाले (१५ मार्च १६८०).
- राणा कुंभ

- राणा कुंभ : (कार. सु. १४३३ – ६८), गुहिलोत वंशातील एक पराक्रमी आणि कलाभिज्ञ राजा. त्याच्या जन्ममृत्युंच्या तारखा उपलब्ध नाहीत. मोकल हा त्याचा पिता. त्याच्या खुनानंतर तो मेवाडच्या गादीवर आला. त्याचा उल्लेख राणाकुंभ, कुंभकर्ण, कुंभवर्ण इ. भिन्न नामांतरांनी करतात.
Comments
Post a Comment