Skip to main content
भारतीय इतिहास-१५
भारतीय इतिहास
- ताराबाई

- ताराबाई : (? १६७५–९ डिसेंबर १७६१). कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजारामाची बायको व हंबीरराव मोहिते यांची मुलगी. १६८३–८४ च्या सुमारास तिचे राजारामाशी लग्न झाले.
- तुघलक घराणे

- तुघलक घराणे : तुघलक किंवा तुघलुक. मध्ययुगीन हिंदुस्थानातील मुसलमान राजघराणे. १३२१ ते १३८८ या काळात ते दिल्लीच्या तख्तावर होते. तुघलक घराण्याचा मूळ पुरुष घियासुद्दीन तुघलक हा अलाउद्दीन खल्जीच्या काळात हिंदुस्तानात आला.
- तैनाती फौज

- तैनाती फौज : (सब्सिडिअरी फोर्स) हिंदुस्थानात सार्वभौम सत्ता स्थापन करण्यासाठी फ्रेंच आणि इंग्रज यांनी अवलंबिलेली एक उपाययोजना. तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली. १७४८–४९ मध्ये द्यूप्लेक्स व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली.
- तोडरमल

- तोडरमल : (१५३५ ?–१० नोव्हेबर १५८९). अकबरचा एक ख्यातनाम खत्री जातीचा वित्तमंत्री. अयोध्या प्रांतातील लाहरपूर गावी टंडन कुळात त्याचा जन्म झाला, असे मानतात. प्रथम त्याने शेरशाहाकडे नोकरी केली.
- दाभाडे घराणे

- दाभाडे घराणे : महाराष्ट्रातील अठराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे. मराठी अंमलात या घराण्यातील पुरूषांनी पराक्रम दाखवून सन्माननीय पदे मिळविली. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी हा पुण्याजवळील तळेगावचा पाटील.
- दाशराज्ञ युद्ध

- दाशराज्ञ युद्ध : ऋग्वेदकाळी लढले गेलेले एक महत्त्वाचे युद्ध. हे युद्ध ऋग्वेदकाळी भरतवंशी राजा सुदास आणि त्याचे वायव्येकडील व पश्चिमेकडील शत्रू यांच्यामध्ये झाले. हे शत्रू दहा राजे होते असे ऋग्वेदात (७·८३·७) म्हटले आहे. म्हणून या युद्धाला दाशराज्ञ असे नाव पडले.
- दुर्गादास राठोड

- दुर्गादास राठोड : (१३ ऑगस्ट १६२८?–२२ नोव्हेंबर १७१८). औरंगजेबकालीन एक स्वामिनिष्ठ व स्वदेशाभिमानी राजपूत. जोधपूरच्या जसवंतसिंग राठोडचा मंत्री अजकर्ण याचा मुलगा. वडिलांप्रमाणे त्याने जसवंतसिंगाची प्रामाणिकपणे नोकरी केली.
- द्रविड (द्राविड) संस्कृति

- द्रविड (द्राविड) संस्कृति : भारतातील एक संस्कृती. भारतीय इतिहासात आणि संस्कृतीत द्रविडांचा मोठा वाटा आहे. सर्वसाधारणपणे भारतीय संस्कृतीची संमिश्र वाढ मुख्यत्वेकरून आर्य आणि द्रविड यांमधील संपर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांमुळे झाली, हे आता सर्वमान्य झाले आहे.
- पंचजन

- पंचजन : वैदिक वाङ्मयात पंचजन किंवा त्यांच्या समानार्थक पंच मानव, पंच कृष्ट्यः, पंच क्षितयः पंच चर्षण्यः इ. उल्लेख अनेक ठिकाणी योतात; पण त्यांच्या योगे नक्की कोणते पाच जन विवक्षित होते, हा प्रश्न वादग्रस्त झाला आहे. ऐतरेय ब्राम्हणात(१) देव, (२) मनुष्य, (३) गंधर्व व अप्सरा, (४) सर्प आणि (५) पितर हे पंचजन, असे म्हटले आहे.
- पटवर्धन घराणे

- पटवर्धन घराणे : पेशवाईतील एक निष्ठावंत व कर्तबगार घराणे. हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवड गावचे होय. या घराण्याचा मूळ पुरुष हरिभट पटवर्धन. त्याला कृष्ण, बाळ, त्रिंवक, गोविंद, रामचंद्र, माधव य भारकर असे सात मुलगे होते.
Comments
Post a Comment