भारतीय इतिहास

भारतीय इतिहास

संत श्री ज्ञानेश्वर 
महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्त्वज्ञानी आणि संतकवी. महाराष्ट्रातील भागवत तथा वारकरी संप्रदायाचा तत्त्वज्ञ प्रवर्तक.
संत मुक्ताबाई 
ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण आणि मराठी संत कवयित्री. ज्ञानदेवादि चारी भावडांच्या जन्मकाळासंबंधी मतैक्य नाही. मुक्ताबाईचा जन्म एका मतानुसार १२७७, तर दुसऱ्या मतानुसार १२७९ ठरतो.
संत तुकाराम 
वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी चार श्रेष्ठ संतांपैकी अखेरचे संतकवी. पित्याचे नाव बोल्होबा किंवा बाळोबाबावा; मातेचे कनकाई. कुलनाम मोरे; उपनाव अंबिले.
संत नामदेव 
वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवींपैकी एक. पित्याचे नाव दामाशेटी; आईचे गोणाई. नरसी-बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते
संत एकनाथ 
महाराष्ट्रातील एक श्रेष्ठ संतकवी. जन्म पैठण येथे. संत भानुदासांचे पणतू. वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे रुक्मिणी.
संत सावता महाराज 
एक मराठी संतकवी. ते संत ज्ञानदेव-नामदेव यांचे समकालीन असून पंढरपूरजवळील अरणभेंडी (अरण) ह्या गावचे रहिवासी होत.
संत चोखामेळा 
संत चोखोबा हे संत ज्ञानेश्र्वरांच्या प्रभावळीतले संत! संत शिरोमणी नामदेव हे त्यांचे गुरू होत.
संत जनाबाई 
संत जनाबाई या संत कवयित्री म्हणून जनमानसात लोकप्रिय आहेत. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया जात्यावर दळण दळताना, कांडताना त्यांच्या ओव्या गातात.
संत गोरोबा कुंभार 
संत ज्ञानेश्र्वरकालीन संत प्रभावळीतील सत्पुरुषांपैकी ‘कोणाचा आध्यात्मिक अधिकार किती मोठा’ याचा निर्णय करण्याचा आध्यात्मिक अधिकार असलेले, सर्वार्थाने ज्येष्ठ - गोरोबाकाका!
मीराबाई 
मध्ययुगीन भारतातील एक श्रेष्ठ कृष्णभक्त संत कवयित्री. ‘मीरा’किंवा ‘मीराँ’ हा शब्द फार्सी भाषेतून राजस्थानीत आला असावा. त्याचा अर्थ ‘श्रेष्ठ’, ‘श्रीमंत’ असा आहे. ‘अमीर’ या शब्दाचे ते संक्षिप्तरूप आहे. संस्कृतमध्येही ‘मीर’ शब्द आहे;


Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा