भारतीय इतिहास-११
भारतीय इतिहास
- खाफीखान

- खाफीखान : (सु.१७–१८ वे शतक). एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार. संपूर्ण नाव मुहम्मद हाशिम अली-खाफीखान. पण ते खाफीखान या टोपण नावानेच अधिक ओळखला जातो. खोरासानमधील खाफ या प्रादेशिक नावावरून हे नाव पडले.
- खारवेल

- खारवेल : (इ.स.पू.सु.पहिले शतक). प्राचीन कलिंगदेशाचा चेदिवंशातील चक्रवर्ती राजा. अशोकाच्या कारकीर्दीत कलिंगदेश मौर्य साम्राज्यात समाविष्ट झाला होता, पण अशोकाचे वंशज दुर्बल झाल्यामुळे तो त्यांच्या अंमलाखाली फार काळ राहिला नाही.
- गंग घराणे

- गंग घराणे : भारतातील कर्नाटक व ओरिसा राज्यांत चौथ्या शतकापासून ते पंधराव्या शतकांपर्यंत गंग घराण्याचे प्राबल्य होते, तथापि आठव्या शतकापासून पुढे ओरिसामध्ये त्याचा जोर अधिक वाढला आणि गंग घराणे प्रबल झाले.
- गझनी घराणे

- गझनी घराणे : (गझ्नवी घराणे) भारतात कायमच्या मुसलमानी सत्तेची सुरुवात करणारा पहिला तुर्की वंश. यास यमिनी वंश असेही म्हणतात. या वंशाच्या मूळ संस्थापकाचे नाव अलप्तगीन. अलप्तगीननंतर इसहाक इब्राहीम (९६३–६६), बल्कातिगीन (९६६–७२) व पीराई (९७२–७७) हे तीन राजे गादीवर आले; पण त्यांच्या कारकीर्दी फारशा महत्त्वाच्या ठरल्या नाहीत.
- गायकवाड घराणे

- गायकवाड घराणे : मराठेशाहीतील एक सुप्रसिद्ध घराणे. त्याचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील धावडी हे होय. या घराण्याचा पूर्वज दमाजी हा खंडेराव दाभाड्यांच्या सैन्यात एक सरदार होता. पुढे तो गुजरातवर स्वतंत्रपणे खाऱ्या करी. दमाजीने निजामाबरोबर बाळापूर येथे झालेल्या लढाईमध्ये बराच नावलौकिक मिळविला.
- गुप्तोत्तरकाल

- गुप्तोत्तरकाल : हर्षपूर्वकाल. गुप्त साम्राज्याच्या अवनतीनंतर उत्तर हिंदुस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली व अनेक लहानमोठे राजवंश सत्ता गाजवू लागले. तथापि एकही स्थिर राज्य निर्माण झाले नाही.
- गुलाम घराणे

- गुलाम घराणे : तेराव्या शतकात सु. १२०६ ते १२९० च्या दरम्यान दिल्ली येथे राज्य स्थापन करणारा तुर्की गुलाम ⇨कुत्बुद्दीन ऐबक ह्याच्या घराण्यास गुलाम घराणे किंवा गुलाम वंश म्हणतात. या घराण्यातील दहा सुलतानांपैकी ऐबक, ⇨ अल्तमश व⇨बल्बन हे तीनच राज्यकर्ते गुलाम होते.
- गुहिलोत घराणे

- गुहिलोत घराणे : राजपुतान्यातील एक राजपूत घराणे. गुहिलोत (गुहिलपुत्र) हा वंश मेदपात (मेवाड) प्रदेशात राज्य करीत होता. राजस्थानातील सर्व राजपूत वंशांमध्ये त्याला त्या वंशातील अनेक राजांच्या शौर्याने, कर्तबगारीने, धर्माभिमानाने आणि दुर्दम्य स्वातंत्र्यप्रीतीने मानाचे स्थान मिळवून दिले होते.
- गोंडसत्ता

- गोंडसत्ता : मध्य प्रदेशातील गढा-मंडला, देवगढ, खंडाल आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर (चांदा) येथे गोंड राज्ये होऊन गेली. या प्रदेशाला गोंडवन असेही संबोधीत.
- गोखले, बापू

- गोखले, बापू : (? १७७७ — १९ फेब्रुवारी १८१८). मराठी राज्याचा हा शेवटचा सेनापती. पूर्ण नाव नरहर गणेश गोखले. याचे मूळ गाव कोकणातील तळेखाजण. नंतर तो पिरंदवणे ता. विजयदुर्ग येथे राहत होता.
Comments
Post a Comment