भारतीय इतिहास -१३
भारतीय इतिहास
- चन्नमा राणी

- चन्नमा राणी : (? - सु १६९७) इक्केरी-बिदनूर येथील केळदी नायक राजघराण्यातील एक शूर राणी. ती चन्नम्माजी या नावाने कर्नाटकात प्रसिद्ध होती. तिच्या पतीचे नाव सोमशेखर नायक. पतीच्या हयातीत व मृत्युनंतर (१६७७) तिने अत्यंत हुशारीने राज्य कारभार चालविला.
- चन्नव्वा राणी

- चन्नव्वा राणी : (सु. १७७८-सु. १८३२). बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर संस्थानची शूर राणी. बेळगावजवळ धुळप्पा देसाई या सामान्य इनामदाराच्या कुटुंबात जन्मली. कित्तूरचा मल्लेसर्जा हा संस्थानिक तिच्या सौंदर्यावर भाळला आणि त्याने तिच्याशी लग्न केले.
- चांदबीबी

- चांदबीबी : (सु. १५४७ - ९९). निजामशाही घराण्यातील एक कर्तबगार आणि शूर स्त्री. ती हुसैन निजामशाहाची मुलगी. पहिल्या अली आदिलशाहाशी १५६४ साली तिचे लग्न झाले. तिने त्यास राज्यकारभारात बहुमोल मदत केली.
- चाणक्य

- चाणक्य : (इ.स.पू.सु. चौथे शतक). प्राचीन भारताच्या राजकीय विचारपरंपरेत चाणक्याचे म्हणजे कौटिल्याचे विशिष्ट व महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याने अर्थशास्त्रसंज्ञक ग्रंथ राज्यशास्त्रावर लिहीला. मात्र त्या ग्रंथात कोठेही चाणक्य म्हणून नामानिर्देश येत नाही, तर कौटिल्य असाच वारंवार नामनिर्देश येतो.
- चालुक्य घराणे

- चालुक्य घराणे : दक्षिणेत विशेषतः कर्नाटक व महाराष्ट्र यांत पाचव्या शतकात उदयास आलेला एक प्रसिद्ध वंश. या वंशाची एक शाखा अधिक प्रसिद्ध पावली. ती म्हणजे बादामीचे चालुक्य व त्यांचे वंशज कल्याणीचे चालुक्य, याशिवाय त्यांच्या इतर लहान शाखा गुजरात, तेलंगण व इतरत्र पसरल्या होत्या.
- चावडा घराणे

- चावडा घराणे : या घराण्याचे नाव कोरीव लेखांत चाप वा चापोत्कट असे येते. वसिष्ठांच्या अग्निकुंडातून जे वीर पुरुष निघाले त्यांमध्ये या वंशाचा मूळ पुरुष होता असे पृथ्वीराजरासोत म्हटले आहे. यांची आरंभीची राजधानी भिल्लमाल (राजपुतान्यातील भिनमाळ) ही होती.
- चाहमान घराणे

- चाहमान घराणे : एक प्रसिद्ध राजपूत वंश. हा वंश आठव्या शतकाच्या मध्यास उदयास आला व चौदाव्या शतकाच्या शेवटी अस्तास गेला. याची शाकंभरी (सांभर) येथील शाखा मुख्य आणि रणथंभोर नड्डूल (नाडोल), जाबालिपूर (जालोर) व सत्यपुर (साचोर)–देवडा येथील शाखा गौण होत. बिजोलिया येथील कोरीव लेखात या वंशाचा मूळपुरुष, वत्सगोत्री सामंतनामक ब्राह्मण होता, असे म्हटले आहे.
- चेतसिंग

- चेतसिंग : (सु. १७४८ ? – १८१०). वाराणसीचा राजा. प्रथम तो आयोध्येच्या नबाबाचा मांडलिक होता; पण पुढे त्याने ईस्ट इंडिया कंपनीचे मांडलिकत्व पतकरले.
- चेर वंश

- चेर वंश : दक्षिण भारतातील एक प्राचीन वंश. याचा चेर, केरळ इ. नावांनी प्राचीन वाङ्मयात उल्लेख आढळतो. इ. स. पू. पहिले शतक ते इ. स. चे पहिले शतक या कालखंडात चोलांनी चेरांवर वर्चस्व स्थापिले होते; मात्र त्यानंतर चेर बलवान झाले. ३०० ते ९०० च्या दरम्यान मलबार किनाऱ्यावर चेरांचे राज्य भरभराटीत होते.
- चोल वंश

- चोल वंश : दक्षिण हिंदुस्थानातील एक प्राचीन सुप्रसिद्ध वंश. त्याचा इतिहास फार प्राचीन काळापर्यंत जातो. अशोकाच्या शिलालेखात चोलांचा स्वतंत्र देश म्हणून उल्लेख आहे. त्यानंतर इ. स.च्या प्रारंभीच्या सुमारास करिकाल चोलनामक अत्यंत विख्यात आणि थोर राजा होऊन गेला.
Comments
Post a Comment