.भारतीय इतिहास-२

भारतीय इतिहास

समर्थ रामदास 
ज्ञानी, भक्तिमान आणि कर्मयोगी संतकवी. मूळचे नाव नारायण; उपनाव ठोसर. ‘रामदास’ हे त्यांनी पुढे स्वतःसाठी घेतलेले नाव. एक थोर सिद्धपुरुष म्हणून लोक त्यांना आदरपूर्वक ‘समर्थ’ किंवा ‘समर्थ रामदास’ असे आजही म्हणतात.
छत्रपती शिवाजी महाराज 
महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी ⇨शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर तालुका – पुणे जिल्हा) झाला.
शहाजीराजे भोसले 
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही – आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो.
राजमाता जिजाबाई 
हिंदवी स्वराज्याच्या आड येणार्‍या भेकडांशी लढण्याचं धैर्य शहाजीपुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणे जगण्याच्या संस्कारांतून.
बाजीप्रभू देशपांडे 
स्वराज्यासाठी अतुलनीय पराक्रम करून प्राणार्पण करणारे आणि हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे ‘शूर सरदार’!
तानाजी मालुसरे 
आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर!
कान्होजी आंग्रे 
मराठ्यांच्या इतिहासातील प्रसिद्ध नाविक योद्धा. पुणे जिल्ह्यातील काळोसे हे त्यांचे मूळ गाव व संकपाळ हे मूळ आडनाव. काळोसेतील आंगरवाडी या भागामुळे त्यांस आंग्रे हे उपनाव प्राप्त झाले.
महात्मा ज्योतीबा फुले 
महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत.
अहिल्याबाई होळकर 
एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. त्यांचा जन्म चौंडी या छोट्याशा गावात (जिल्हा बीड) माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला.
छत्रपती शाहू महाराज 
महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते

Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा