भारतीय इतिहास -२७

भारतीय इतिहास

इक्ष्वाकु 
एका प्राचीन भारतीय राजाचे व राजवंशाचे नाव. भारताच्या ऐतिहासिक परंपरेनुसार इक्ष्वाकु हा वैवस्वत मनूचा पुत्र होय.
उदयपूर संस्थान 
ब्रिटिशांकित हिंदुस्थानमधील राजस्थानातील एक राजपूत संस्थान. क्षेत्रफळ ३२,८६८ चौ. किमी.
उदयसिंह 
मेवाडचा विषयासक्त दुर्बल राजा. राणा संग्रामसिंह व राणी कर्णवती यांचा मुलगा.
उदयसिंह 
मेवाडचा विषयासक्त दुर्बल राजा. राणा संग्रामसिंह व राणी कर्णवती यांचा मुलगा.
कुरुयुद्ध 
कुरुक्षेत्रावर झालेले कौरव-पांडवांमधील महाभारतकालीन प्रसिद्ध युद्ध. हस्तिनापूर येथे झालेल्या द्यूतात कौरवांची सरशी होऊन पांडवांना बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला.
कुरुवंश (पौराणिक) 
महाभारतकाली सुप्रसिद्ध असलेल्याकुरुवंशाचा उल्लेख ऋग्वेदात येत नाही. ऋग्वेदकाली विख्यात असलेल्या तृत्सु, भरत व पूरु या आर्यवंशाचे मीलन होऊन त्यांना पुढे ‘कुरू’ हे नाव प्राप्त झाले असावे.
कुल्ली संस्कृति 
दक्षिण बलुचिस्तानातील कोल्वा जिल्ह्यातील एक प्राचीन प्रगत संस्कृती. कुल्ली, मेही, शाहीटुंप वगैरे दश्त नदीच्या खोऱ्यातील ठिकाणी ही संस्कृती विकसित झाली.
कोचीन संस्थान 
स्वातंत्र्यपूर्वकाळातील ब्रिटिशांकित हिंदुस्थानमधील पूर्वीच्या मद्रास इलाख्यातील एक संस्थान. हा प्रदेश सध्या केरळ राज्यात समाविष्ट झाला आहे.

Comments