भारतीय इतिहास -२३
भारतीय इतिहास
- लिटन, लॉर्डएडवर्ड रॉबर्ट बुलवर

- लिटन, लॉर्डएडवर्ड रॉबर्ट बुलवर : (८ नोव्हेंबर १८३१-२४ नोव्हेंबर १८९१). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल (१८७६-८०) आणि प्रसिद्ध कवी. त्याचा जन्म सुखवस्तू उमराव घराण्यात लंडन येथे झाला.
- लिन्लिथगो, लॉर्ड व्हिक्टर अलेक्झांडर जॉन होप

- लिन्लिथगो, लॉर्ड व्हिक्टर अलेक्झांडर जॉन होप : (२४ सप्टेंबर १८८७-५ जानेवारी १९५२). दुसऱ्या महायुद्ध काळातील ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय (१९३६-४३). त्यांचा जन्म खानदानी घराण्यात ॲबरकॉर्न (पश्चिम लोथिअन-स्कॉटलंड) येथे झाला.
- लोदी घराणे

- लोदी घराणे : (१४५१-१५२७). मुसलमानी अंमलातील दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेले मोगलपूर्व काळातील शेवटचे प्रसिद्ध घराणे. ⇨फिरोझशाह तुघलकच्या काळात (१३०९?- १३८८) भारतात आलेल्या अफगाण घराण्यांपैकी लोदी घराणे हे एक होय.
- वाकाटक घराणे

- वाकाटक घराणे : महाराष्ट्रातील एक प्राचीन प्रसिद्ध राजवंश. या वंशाची माहिती पुराणे, शिलालेख व तांम्रपट यांतून मिळते. प्राचीन काळी भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली,त्यांमध्ये वाकाटक साम्राज्याचा अंतर्भाव होतो.
- वाघेल वंश

- वाघेल वंश : गुजरात मधील एक प्रसिद्ध मध्ययुगीन राजपुत वंश. या वंशाची माहिती तत्कालीन कोरीव लेख, प्रबंधचिंतामणि(मेरूतुंग), तीर्थकल्पतरू (जिनप्रभा सुरी) यांसारखे ग्रंथ व तत्कालीन प्रवाशांचे वृत्तांत यांतून मिळते. राजपुतांच्या छत्तीस कुळांत वाघेल वंशाची गणना होते.
- विक्रमादित्य

- विक्रमादित्य : प्राचीन भारतीय राजांनी धारण केलेले एक सन्मान्य बिरुद. विक्रमादित्य या नावाने प्राचीन भारताच्या इतिहासातील अनेक महापराक्रमी राजे ओळखले जातात. विक्रमादित्य−म्हणजे पराक्रमाचा सूर्य−हे गौरवदर्शक विरूदही आहे.
- सातवाहन वंश

- सातवाहन वंश : प्राचीन भारतातील एक बलाढ्य सुप्रसिद्घ राजवंश. या वंशातील राजांनी इ. स. पू. सु. दुसऱ्या शतकापासून इ. स. तिसऱ्या शतकादरम्यान मुख्यत्वे महाराष्ट्रात अधिसत्ता गाजविली. या वंशाविषयीची माहिती मुख्यत्वे त्यांची नाणी, शिलालेख, रुद्रदामनचा जुनागढ येथील प्रस्तरलेख, आपस्तंब धर्मसूत्र, वायु, विष्णु, मत्स्य आदी पुराणे; जैन ग्रंथ वगैरेंतून मिळते.
- सिंघण

- सिंघण : ( ? –? जून १२४७). यादव घराण्यातील एक महाप्रतापी व कलाभिज्ञ राजा. त्याच्या पूर्वजीवनाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही; तथापि त्याचे अनेक ताम्रपट आणि शिलालेख महाराष्ट्र, कर्नाटक, माळवा, गुजरात, दक्षिण कोकण वगैरे प्रदेशांत उपलब्ध झाले आहेत.
- सूर घराणे

- सूर घराणे : मुसलमानी अंमलातील मोगलकाळात उदयाला आलेला एक अफगाण वंश. या वंशातील सुलतानांनी अठरा वर्षे (इ. स. १५३८– ५६) दिल्लीच्या तख्तावर अधिसत्ता गाजविली. या घराण्यात शेरशाह (कार. १५३८– ४५), इस्लामशाह (कार. १५४५— ५४), फीरुझशाह (कार. १५५४) आणि मुहम्मद आदिलशाह (कार. १५५४– ५६) हे सुलतान झाले.
- सूर्यवंश

- सूर्यवंश : मनू प्रजापतीचा जेष्ट पुत्र इक्ष्वाकू याच्या पासून सुरु झालेल्या वंशाला सूर्यवंश असे नाव पडले. याच्या शाखांचे राज्य कोसल, विदेह, वैशाली आणि सुराष्ट्र या प्रदेशांवर होते. मनूने इक्ष्वाकूला मध्यदेशाचे राज्य दिले होते.
Comments
Post a Comment