भारतीय इतिहास-१९

भारतीय इतिहास

भोसले, प्रतापसिंह 
भोसले, प्रतापसिंह : (१८ जानेवारी १७९३-४ ऑक्टोबर १८४७). महाराष्ट्रातील एक सद्‌गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजा. हा छत्रपती दुसरा शाहू (कार. १७७७-९८) व आनंदीबाई यांचा थोरला मुलगा. छत्रपती शाहूनंतर साताऱ्याच्या गादीवर आला.
मराठा अंमल 
मराठा अंमल : छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. सतराव्या शतकात महाराष्ट्रात हिदवी स्वराज्य स्थापन करून मराठी सत्तेचापाया घातला. आठराव्या शतकात हिंदूस्थानभर मराठी सत्तेचा विस्तार झाला.
मराठा राजमंडळ 
मराठा राजमंडळ : सामान्यत: छत्रपती शाहूनंतर सर्व किंवा एकेकटा सरदार स्वत:स मराठा राजमंडळ असे संबोधी. अशा सर्व सरदारांचे मिळून राजमंडळ होई. शिवाजी महाराज लोकविलक्षण योद्धे आणि अजब कारभारी होते.
मराठे–निजाम संबंध 
मराठे–निजाम संबंध : दक्षिण हिंदुस्थानच्या इतिहासातील अठराव्या शतकातील मराठे –निजाम संबंध वा संघर्ष ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. हैदराबादच्या निजाम घराण्याचा संस्थापक निजामुल्मुल्क हा गाजीउद्दीन हाताखाली तयार झालेला एक युद्धकुशल सेनापती होता.
महाजनपद 
महाजनपद : प्राचीन भारतातील जनसंपदा एक समूह. इ. स. पू. सहाव्या शतकाच्या आरंभी उत्तर भारतात अनेक लहान मोठी स्वतंत्र राज्ये अस्तित्वात होती. यांतील कालांतराने काही जनपदे मिळून महाजनपद निर्माण झाले. सोळा महाजनपदांची माहिती प्राचीन बौद्ध व जैन वाङ्मयातून मिळते.
मलिक अंबर 
मलिक अंबर : (?१५४९?–११ मे १६२६). अहमदनगरच्या निजामशाहीतील एक कर्तबगार आणि मुत्सद्दी मुख्यप्रधान. त्याच्या पूर्वायुष्याबाबत आणि घराण्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. त्याचा जन्म एका सामान्य हबशी (ॲबिसीनियन) कुटुंबात झाला, असे बहुतेक इतिहासकार मानतात.
महमूद गझनी 
महमूद गझनी : (१ नोव्हेंबर ९७१−३० एप्रिल १०३०?). अफगाणिस्तानातील गझनीच्या यमीनी घराण्यातील सर्वश्रेष्ठ व पराक्रमी सुलतान. भारतातील तुर्की किंवा यमीनी या मुसलमानी घराण्याच्या सत्तेशी सुरुवात महमूदापासून झाली.
मितानी संस्कृति 
मितानी संस्कृति : उत्तर मेसोपोटेमियाच्या उत्तर भागातील इंडो-इराणी जमातीचे साम्राज्य. ते टायग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यांत इ. स. पू. १७०० ते इ. स. पू. १३६० दरम्यान टिकून होते. त्याचा पूर्वेकडे विस्तार किर्कूक आणि झॅग्रॉस पर्वत व पश्चि मेकडे ॲसिरियापासून भूमध्य समुद्रापर्यंत झाला होता.
मीनांदर 
मीनांदर : (सु. इ. स. पू. १११–९०). प्राचीन काळचा एक सुप्रसिद्ध यवन (ग्रीक) राजा. याच्याविषयी बरीच माहिती पाली ग्रंथ ⇨मिलिंदपञ्ह (मिलिंदप्रश्न) यावरून मिळते. शाकल (पंजाबातील सियालकोट) येथील बलाढ्य यवन नृपती मिलिंद याने बौद्ध भिक्षू नागसेन याला बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान यांविषयी विचारलेले अनेक प्रश्न आणि नागसेनाने दिलेली त्यांची उत्तरे हा या ग्रंथाचा विषय आहे.
मीर जुम्ला 
मीर जुम्ला : ( ?–१ एप्रिल १६६३). मोगल काळातील एक धूर्त मुत्सद्दी आणि व्यापारी. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. त्याचे पूर्ण नाव मीर जुम्ला मीर मुहम्मद सय्यद. त्याचे वडील इराणात तेलाचा धंदा करीत होते. १६३० मध्ये मीर जुम्‌ला व्यवसायानिमित्त भारतात आला आणि गोवळकोंड्यात स्थायिक झाला.

Comments