भारतीय इतिहास-१४

भारतीय इतिहास

चौथाई - सरदेशमुखी 
चौथाई - सरदेशमुखी : मराठी राज्याच्या सतराव्या-अठराव्या शतकांतील उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्वाच्या बाबी. या दोन्ही मुख्यतः मराठी राज्याबाहेर – छत्रपतींच्या स्वराज्याबाहेर – पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल करीत.
छत्रसाल बुंदेले 
छत्रसाल बुंदेले : ( ४ मे १६४६ ? – ४ डिसेंबर १७३१). औरंगजेब बादशाहाच्या कारकीर्दीत माळव्यात व मध्य भारतात हिंदूंची सत्ता स्थापन करणारा वीर पुरुष. हा चंपतराय बुंदेल्याचा चौथा मुलगा. वडिलांच्या मृत्यूनंतर मिर्झा राजा जयसिंगाच्या शिफारसीने त्याने काही काळ मोगल सैन्यात चाकरी केली आणि पुरंदर व देवगड (१६६७) च्या मोहिमांत चांगला पराक्रम केला.
जयसिंग, सवाई 
जयसिंग, सवाई : (? १६६९–२१ सप्टेंबर १७४३). जयपूरचा एक कर्तबगार व विद्याप्रेमी राजा. हा अंबेरच्या विष्णुसिंह कच्छवाहाचा मुलगा. १७०० मध्ये गादीवर येताच पूर्वापार चालत आलेले मोगलांबरोबरचे मैत्रीचे संबंध त्याने दृढ केले.
जहांगीर 
जहांगीर : (३० ऑगस्ट १५६९–२८ ऑक्टोबर १६२७). अकबराचा मुलगा व चौथा मोगल सम्राट. त्याचे पहिले नाव सलीम. युवराज असताना त्याने आपल्या बापाविरुद्ध बंड केले. तसेच त्याने आपल्या बापाचा विद्वान मित्र अबुल फज्लचा खून करविला; पण नंतर दोघांत समझोता झाला.
टिपू सुलतान 
टिपू सुलतान : (२० नोव्हेंबर १७५०–४ मे १७९९). म्हैसूरचा एक प्रसिद्ध व पराक्रमी राजा. त्याचे पूर्ण नाव शाह बहाद्दूर फत्ते अल्लीखान असे होते. टिपू याचा अर्थ कन्नडमध्ये वाघ असा होतो. त्याच्या एकूण स्वभावगुणांवरून हे नाव त्यास मिळाले असावे.
डच सत्ता, भारतातील 
डच सत्ता, भारतातील : डच लोक व्यापारासाठी भारतात आले. आपल्या जहाजातून लिस्बनला येणारा हिंदुस्थानातील माल ते यूरोप खंडात नेत असत. १५८८ नंतर लोक भारतात येण्याचा मार्ग शोधू लागले. १५७९ ते १५९६ पर्यंत लीनस्कोटेन, कार्नीलियस, हौटमन, वगैरेंच्या मार्गदर्शनाखाली ते भारतात आले.
डफ ग्रँट 
डफ ग्रँट : (८ जुलै १७८९–२३ सप्टेंबर १८५८). मराठ्यांच्या इतिहासावर लिहिणारा सुप्रसिद्ध इतिहासकार. पूर्ण नाव कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ. ग्रँट या नावाने तो अधिक परिचित आहे. त्याचा जन्म बॅम्फ (स्कॉटलंड) येथे झाला.
डफरिन, लॉर्ड फ्रेडरिक टेम्पल हॅमिल्टन 
डफरिन, लॉर्ड फ्रेडरिक टेम्पल हॅमिल्टन : (२१ जून १८२६–१२ फेब्रुवारी १९०२). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८८४–८८ या काळातील व्हाइसरॉय व गव्हर्नर जनरल. फ्लॉरेन्स (इटली) येथे जन्म. लहानपणापासून डफरिनवर त्याच्या हुशार आईचा (हेलनचा) प्रभाव होता.
डलहौसी, लॉर्ड जेम्स अँड्र्यू ब्राउन रॅमझी 
डलहौसी, लॉर्ड जेम्स अँड्र्यू ब्राउन रॅमझी : (२२ एप्रिल १८१२–१९ डिसेंबर १८६०). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८४८–५६ च्या दरम्यानचा गव्हर्नर-जनरल व एक ब्रिटिश मुत्सद्दी. डलहौसी कॅसल (स्कॉटलंड) येथे सधन घराण्यात जन्म.
तात्या टोपे 
तात्या टोपे : (? १८१४–१८ एप्रिल १८५९). इंग्रजांविरुद्ध मुकाबला करणारा १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी. संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग भट (येवलेकर). टोपे या त्याच्या उपनावाबद्दल तज्ञांत एकमत नाही.

Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा