भारतीय इतिहास-७
भारतीय इतिहास
- प्रबोधनकाल

- प्रबोधनकाल : यूरोपच्या इतिहासाची स्थूलमानाने प्राचीन युग, मध्ययुग व आधुनिक युग अशा तीन कालखंडांत विभागणी करतात. ग्रीक आणि रोमन संस्कृतींचा कालखंड म्हणजे प्राचीन युग होय. यूरोपमध्ये रोमन बादशाह कॉन्स्टंटीन याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतल्यापासून प्रबोधनकालापर्यंतचा म्हणजे तेराव्या शतकापर्यंतचा कालखंड हे मध्ययुग होय.
- बदाऊनी, अब्दुल कादिर

- बदाऊनी, अब्दुल कादिर : (२१ ऑगस्ट १५४०-?). प्रसिद्ध मुस्लिम इतिहासकार व अकबराच्या दरबारातील एक विद्वान. जन्म जयपूर संस्थानातील तोडा (तडाभीम) या गावी झाला. वडील मुलूकशाह यांनी त्यास भरतपूर संस्थानातील बसावर या ठिकाणी लहानपणी नेले. पुढे वयाच्या बाराव्या वर्षी वडिलांनी त्यास संभळ येथे शेख हाकीम संभाली याच्या मार्गदर्शानाखाली ठेवले.
- बरनी, जियाउद्दीन

- बरनी, जियाउद्दीन : (?१२८४?-?१३५७?). भारतातील एक मुस्लिम इतिहासकार. त्याच्या जन्ममृत्यूच्या नेमक्या तारखा उपलब्ध नाहीत. दिल्लीचा सुलतान धियासुद्दीन बल्बन याच्या कारकीर्दीत (इ. स. १२६६-८७) आणि नंतरच्या खल्जी काळात (१२९०-१३२०) त्याच्या घराण्यातील लोकांना दरबारी अधिकारपदे लाभली होती. मुअयिद-अल्-मुल्क हे त्याचे वडील. त्याचे मामा मलिक-अला-अल्-मुल्क हे दिल्लीचे कोतवाल होते.
- बरीदशाही

- बरीदशाही : द.भारतात बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर निर्माण झालेल्या पाच शाह्यांपैकी कर्नाटक राज्यातील बीदर येथे स्थापन झालेली एक शाही. बरीदशाहीचा संस्थापक कासिम बरीद ऊर्फ बरीद उल्-मलिक (कार. १४९०-१५०४) हा होय. हा शिहाबुद्दीन महमूदशाह बहमनी (कार. १४८२-१५१८) याच्या कारकीर्दीत मुख्य वजीर होता.
- बल्बन, घियासुद्दीन

- बल्बन, घियासुद्दी न : (? १२०७ – ? १२८७). गुलाम घराण्यातील दिल्लीचा नववा सुलतान. अल्तमशच्या तुर्की गुलामांतील एक विश्र्वासू गुलाम. ह्याचे पूर्वज एलबरीमधील होते. ह्याचे मूळ नाव वहाउद्दीन. अल्तमशने बल्बनची गुलामगिरीतून मुक्तता करून त्याची नियुक्ती चाळीस सरदारांच्या गटात केली. रजिया सुलतानाच्या कारकीर्दीत अमीर-इ-शिकार या पदावर त्यास बढती मिळाली.
- बहमनी सत्ता

- बहमनी सत्ता : (इ. स. १३४७-१५३८). मध्ययुगात द. भारतात स्थापन झालेली एक मुसलमानी सत्ता. चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता. त्याच्या विरूद्ध इ. स. १३२७ पासून बंडाळीला सुरूवात झाली होती. ती शमविण्यासाठी मुहंमद तुघलक याने दक्षिणेतील अमीरांना विश्र्वासघाताने ठार मारण्याचा कट रचला; पण तो उघडकीस येऊन सुलतानाने पाठविलेल्या दूतासच ठार मारण्यात आले
- बाप्पा रावळ

- बाप्पा रावळ : (इ.स. आठवे शतक). राजपुतान्यातील गुहिलोत घराण्यातील मेवाडचा (मेदपात) एक प्रसिद्ध राजा. परंपरेप्रमाणे गुहिलोत घराण्याचा हा मूळ पुरुष असावा असे मानले जाते; तथापि याबाबत इतिहासकारांत मतैक्य नाही. अनंतपूर येथील कोरीव लेखात (इ.स.९७७) गुहिलोत घराण्यातील वीस पिढयांचा उल्लेख आहे. त्यांत बाप्पा रावळ असा निर्देश नाही; पण उनाव व एकलिंग लेखांत उल्लेख मिळतो.
- बाबर

- बाबर : (१४ फेब्रुवारी १४८३ - २६डिसेंबर १५३॰). हिंदुस्थानातील मोगल सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला मोगल बादबाह. पूर्ण नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर. वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा आणि आईचे कुत्लघ निगार खानम वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता.
- बाला दित्य

- बाला दित्य : (इ. स. पाचवे शतक). भितरी येथील मुद्रेवरून तो पूरुगुप्ताचा पुत्र आणि दुसऱ्या कुमारगुप्ताचा पिता होता, असे कळते. त्याच्या कारकीर्दीविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तो इ. स. ४७०-७३ दरम्यान गादीवर असावा. त्याचे मूळ नाव नरसिंहगुप्त. त्याच्या सोन्याच्या नाण्यांवर ‘नर’ असे आढळते. त्याच नाण्यांवर त्याचे ‘बालादित्य’ असे बिरुद आले आहे.
- आदिलशाही

- आदिलशाही (१४८९ - १६८६) : पंधराव्या शतकाच्या अखेरीस दक्षिण हिंदुस्थानात स्थापन झालेली एक मुसलमानी राजसत्ता. ðबहमनी सत्ता निष्प्रभ झाल्याचा फायदा घेऊन त्याच राज्यातील विजापूरचा सुभेदार यूसुफ आदिलखान १४८९ मध्ये स्वतंत्र झाला.
Comments
Post a Comment