भारतीय इतिहास -१६

भारतीय इतिहास

पटवर्धन, परशुराम भाऊ 
पटवर्धन, परशुराम भाऊ : (? १७४०-१७ सप्टेंबर १७९९). उत्तर पेशवाईतील एक मातबर सरदार. उत्तर पेशवाईत ज्या प्रसिद्धि व्यक्ती होऊन गेल्या, त्यांत नाना फडणीस, महादजी शिंदे, हरिपंत फडके यांच्या बरोबरीने परशुरामभाऊ हाही होता
पट्टदकल 
पट्टदकल : कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यामधील प्राचीन मंदिरांच्या वास्तु-शिल्पशैलीसाठी प्रसिद्ध असलेले एक स्थळ. बादामी गावाच्या ईशान्येस सु. २० किमी. वर हे मलप्रभा नदीकाठी वसले आहे.
परमार घराणे 
परमार घराणे : एक प्रसिद्ध राजपूत घराणे. परमारांची गणना चार राजपूत अग्निकुलांत होते; पण त्यांचा मूळ पुरुष परमार हा अर्बुद पर्वतावर वसिष्ठ ऋषींच्या होमाग्नीतून उत्पन्न झाला, ही कल्पना त्यांच्या आरंभीच्या कोरीव लेखांत येत नाही.
परीक्षित् 
परीक्षित् : परीक्षित् असाही नामनिर्देश आहे. पुराणानुसार होऊन गेलेल्या पाच राजांचे नाव. (१) एफ्. ई. पार्जिटरच्या मते, कुरुला जे तीन मुलगे झाले, त्यांपैकी सर्वात थोरला मुलगा परीक्षित्. हा वैदिक कालात होऊन गेला. त्याचा उल्लेख अथर्ववेदात (२०.१२७.७–१०) आला आहे.
पल्लव वंश 
पल्लव वंश : दक्षिण भारतातील एक प्राचीन वंश. त्याच्या मूलस्थानाविषयी तसेच वंशाच्या उत्पत्तीसंबंधी विद्वानांत मतैक्य नाही. काही विद्वानांच्या मते, पल्लव हे पार्थियन वंशाचे होते; कारण क्षत्रप रुद्रदामनच्या गिरनार येथील लेखात पार्थियन अधिकाऱ्‍याला पहलव म्हटले आहे; पण या मताला सबळ आधार नाही.
पवार घराणे 
पवार घराणे : पेशवाईतील एक प्रसिद्ध मराठा घराणे. शिंदे व होळकर यांबरोबर पवारांनी उत्तरेत मराठी राज्याचा विस्तार केला. या घराण्याचा मूळ पुरुष कृष्णाजी शिवकालात होता. त्याचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील सुपे.
पवित्र रोमन साम्राज्य 
पवित्र रोमन साम्राज्य : विभिन्न प्रदेशांवर राज्य करणाऱ्‍या जर्मन राजांच्या साम्राज्याला ही संज्ञा सर्वसाधारणपणे आठव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत लावीत. वस्तूतः सेक्रम रोमॅनस इम्पेरियम ही पवित्र रोमन साम्राज्यसदृश संज्ञा १२५४ नंतरच प्रचारात आली.
पांड्य घराणे 
पांड्य घराणे : दक्षिण हिंदुस्थानातील एक प्राचीन घराणे. यांचा व त्यांच्या प्रदेशाचा प्रथम उल्लेख अशोकाच्या लेखात येतो. दक्षिणेत चोल, चेर व पांड्य हे प्रदेश अशोकाच्या साम्राज्याच्या बाहेर होते.
पानिपतच्या लढाया 
पानिपतच्या लढाया : हरयाणा राज्याचा कर्णाल जिल्ह्यातील पानिपत या ऐतिहासिक स्थळी झालेल्या तीन प्रसिद्ध लढाया. हे स्थळ दिल्लीच्या वायव्येस सु. ८५ किमी. वर दिल्ली-अंबाला हमरस्त्यावर आहे.
पारसनीस, दत्तात्रेय बळवंत 
पारसनीस, दत्तात्रेय बळवंत : (२७ नोव्हेंबर १८७०-३१ मार्च १९२६). महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध इतिहाससंशोधक व ऐतिहासिक साधनांचे संग्राहक. जन्म बोरगाव ता. कोरेगाव जि. सातारा येथे.

Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा