भारतीय इतिहास-८

भारतीय इतिहास

चौथाई - सरदेशमुखी 
चौथाई - सरदेशमुखी : मराठी राज्याच्या सतराव्या-अठराव्या शतकांतील उत्पन्नांच्या बाबींपैकी दोन महत्वाच्या बाबी. या दोन्ही मुख्यतः मराठी राज्याबाहेर – छत्रपतींच्या स्वराज्याबाहेर – पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल करीत.
जनपद 
जनपद : जन म्हणजे समान संस्कृतीचे किंवा एका जमातीचे लोक. त्यांनी स्थापन केलेल्या वसाहतींना जनपद म्हणत किंवा जनवस्ती करून राहिलेल्या ठिकाणांना जनपद ही संज्ञा लावण्यात येत असे. वैदिक साहित्यात ग्राम, विश व जन या संज्ञा वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांच्या समूहांसाठी वापरलेल्या आहेत.
अकबर 
अकबर : (१५ ऑक्टोबर १५४२-२७ ऑक्टोबर १६०५). भारताचा तिसरा मोगल सम्राट. संपूर्ण नाव जलालुद्दीन महम्मद अकबर. वडील ⇨हुमायून व आई हमीदाबानू परागंदा असताना अमरकोट (सिंध) येथे जन्म. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी आग्रा येथे मृत्यू. याच्या जन्ममृत्यूच्या तारखांत एकवाक्यता दिसून येत नाही.
अकबर नामा 
अकबर नामा : मोगल (मुघल) सम्राट अकबराच्या दरबारातील ⇨अबुल फज्ल याने लिहिलेला ग्रंथ. मोगल कालखंडावरील मौल्यवान अशा ऐतिहासिक साधनग्रंथात याची गणना होते. याचे तीन भाग आहेत. पहिल्यात तैमूरपासून हुमायूनपर्यंतचा इतिहास असून दुसऱ्यात अकबराच्या कारकीर्दीतील अबुल फज्लच्या मृत्यूपर्यतच्या घटनांचे वर्णन आहे.
अजातशत्रू 
पितृहत्या करून अजातशत्रूने राज्यरोहण केले; नंतर काही वर्षांनी गौतम बुद्धाच्या दर्शनास गेला असता, त्या पातकाचा उच्चार करून क्षमायाचना केली, असा वृत्तांत बौद्ध साहित्यास आढळतो. परंतु जैन साहित्यात बिंबिसाराने वृद्धपकाळी स्वतःच राज्यसत्ता अजातशत्रूला दिली, असा निर्देश आहे.
अठराशे सत्तावनचा उठाव 
अठराशे सत्तावनचा उठाव : भारतीयांनी १८५७ मध्ये इंग्रजी सत्तेविरूद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. १८५७ च्या उठावामागे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी अशी अनेकविध कारणे होती.
इंग्रज-अफगाण युद्धे 
इंग्रज-अफगाण युद्धे : अफगाणिस्तानात स्वतःची किंवा आपल्या अंकिताची सत्ता स्थापन करण्यासाठी इंग्रजांनी अफगाणांबरोबर तीन युद्धे केली.
इंग्रज-गुरखा युद्धे 
इंग्रज-गुरखा युद्धे : (१८१४-१८१६). हिमालयाच्या दक्षिण उतरणीवर सतलजपासून सिक्कीमपर्यंत पसरलेल्या प्रदेशात पूर्वी मंगोलियन वंशाचे लोक राहत होते. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीस हिंदुस्थानातील राजपुतांनी हा प्रदेश जिंकून तेथे आपली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. त्या राज्यांमध्ये काठमांडूच्या नेवार राजाला प्रमुख पद देण्यात आले.
इंग्रज-निजाम संबंध 
इंग्रज-निजाम संबंध: मीर कमरुद्दीन ð निजामुल्मुल्क आसफजाह दक्षिण भारतातील सहा सुभ्यांचा सुभेदार म्हणून १७२४ मध्ये कायम झाला. त्यानंतर जरी तो नावाला मोगल साम्राज्याचा सुभेदार म्हणून वागत असला, तरी वस्तुतः स्वतंत्र सत्ताधीशच बनला होता.
इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील 
इंग्रज-फ्रेंच युद्धे, भारतातील : सतराव्या शतकात भारतात डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच असे अनेक पाश्चात्य लोक व्यापाराच्या निमित्ताने प्रथम आले. त्यांनी हळूहळू अंतर्गत राजकीय घडामोडींत भाग घेण्यास सुरुवात केली.

Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा