भारतीय इतिहास-५

भारतीय इतिहास

मुंबईचा इतिहास 
मुंबई हे भारताचे आर्थिक केंद्र असून देशाचे आर्थिक शक्तीस्थान आहे तसेच हिंदी चित्रपट सृष्टीचे हृदय आणि कापड उद्योगापासून रसायनांपर्यत सर्व उद्योगांचे केंद्रस्थान आहे
1 मे - महाराष्ट्र दिन 
याच दिवशी 1960 साली तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.
आझाद हिंद सेना 
सुप्रसिध्द भारतीय पुढारी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यासाठी सिंगापूर येथे जुलै १९४३ मध्ये उभारण्यात आलेली लष्करी संघटना.
बक्सारची लढाई 
मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई.
स्वातंत्र्यवीर सावरकर 
भारतीय स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे थोर देशभक्त, साहित्यिक आणि समाजसुधारक. ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणून विख्यात.
राजा राममोहन रॉय 
आधुनिक भारतातील अग्रगण्य धर्मसुधारक व ब्राह्यो समाकजाचे संस्थापक. पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्हातील राधानगरी या गावी त्यांचा जन्म झाला.
महाश्‍मयुगीन संस्कृति 
महाश्मयुगीन संस्कृति : प्रागितिहास कालात विशेषत: इ. स. पू. दुसऱ्या-पहिल्या सहस्रकांत यूरोपात जी मोठमोठ्या ओबडधोबड शिळांची रचना करून स्मारके उभी करण्याची पद्धती होती; त्या लोकांच्या संस्कृतीला महापाषाण किंवा महाश्मयुगीन संस्कृती (मेगॅलिथिक कल्चर) ही सर्वसाधारण संज्ञा देण्यात येते.
महावीर वर्धमान 
महावीर वर्धमान : (इ.स.पू. ५९९–५२७). जैन धर्मातील चोवीस तीर्थंकरांपैकी अखेरचे तीर्थंकर. महावीरांच्या आधी जैन धर्माचे २३ तीर्थंकर होऊन गेले, असे जैन धर्माचे अनुयायी मानतात आणि त्यामुळे महावीर हे जैन धर्माचे संस्थापक ठरत नाहीत; परंतु जैन धर्माला प्रभावशाली बनविण्याचे फार मोठे श्रेय महावीरांकडे जात असल्यामुळे जगातील प्रमुख धर्मसंस्थापकांच्या मालिकेतील गौतम बुद्ध वगैरेंच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाते.
पुराभिलेखविद्या 
पुराभिलेखविद्या : इतिहासकाली लिहिलेला मजकूर म्हणजेच पुराभिलेख. असे लेखन इतिहासकालात राजवंश, सरंजामदार, धार्मिक संस्था, व्यापारी, प्रवासी, धर्मगुरु इत्यादींनी केले असून त्यांनी व्यवहार लिहून ठेवले आणि त्याचे रक्षण केले. त्यांच्या जतनास व अभ्यासास पुराभिलेखविद्या ही संज्ञा देतात.
पुलकेशी, दुसरा 
पुलकेशी, दुसरा : (सु.६१०/११–६४२).बादामीच्या चालुक्य घराण्यातील एक पराक्रमी आणि कलाभिज्ञ राजा. आपला पिता पहिला कीर्तिवर्मा याच्या मृत्युसमयी हा अल्पवयी असल्याने त्याचा चुलता मंगलेश हा राज्य करू लागला. पुढे पुलकेशी वयात आल्यावर त्यास राज्य न देता आपल्या मागून आपला मुलगा गादीवर यावा, अशी खटपट मंगलेशने सुरू केली. तेव्हा पुलकेशीला त्याच्याशी लढावे लागले. त्यात मंगलेश मारला जाऊन पुलकेशी गादीवर आला.

Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा