भारतीय इतिहास-१८

भारतीय इतिहास

पेशवे 
पेशवे : मुख्यप्रधान या अर्थी मराठी अंमलात वापरलेली संज्ञा. प्राचीन काळी मुख्यप्रधान हे पद अस्तित्वात होते किंवा काय ह्याविषयी विद्वानांत मतभेद आहेत. परंतु मुसलमानी अंमलात पेशवा ह्या शब्दाने मुख्यप्रधानाचा उल्लेख आढळतो.
पोरस 
पोरस : (इ. स. पू. चौथे शतक). वेदकालीन पूरु वंशातील एक पराक्रमी व स्वाभिमानी राजा. याचे राज्य मध्य पंजाबात चिनाब व झेलम नद्यांच्या दुआबात होते. तक्षशिला ह्या त्याच्या शेजारील राज्याचा अंभी राजा पोरसचा शत्रू होता.
फडके, हरिपंत 
फडके, हरिपंत : (? १७२९–२० जून १७९४). उत्तर पेशवाईतील एक मुत्सद्दी व सेनानी. त्यांच्या जन्मतारखेविषयी निश्चित माहिती मिळत नाही. त्यांचे घराणे मूळचे कोकणातील गुहागराचे. येथील दीक्षित–पटवर्धन घराण्यांबरोबर हे घराणे इ. स. १७०० च्या आगेमागे देशावर आले.
फाहियान 
फाहियान : (इ. स. सु. ३४० –सु. ४२२ ?). भारतात इ. स. ४०० ते ४११ च्या दरम्यान आलेला एक चिनी प्रवासी. त्याची चरित्रात्मक माहिती फारशी मिळत नाही. तो उत्तर चीनमधील चांगानचा राहणारा. त्याचा जन्म शान्सी प्रांतातील वूयांग येथे झाला.
फिरिश्ता 
फिरिश्ता : (१५५० ? - १६२३ ?). भारतातील मध्ययुगीन मुसलमानी रियासतीचा फार्सी इतिहासकार. पूर्ण नाव मुहम्मद कासिम हिंदू शाह; तथापि फिरिश्ता या नावानेच तो अधिक परिचित आहे. त्याचा जन्म आस्ताराबाद (इराण) येथे झाला.
फिरोजशाह तुघलक 
फिरोजशाह तुघलक : (? १३०९ ? - २० सप्टेंबर १३८८). फिरोझशाह (फीरूझशाह) हा तुघलक घराण्यातील दिल्लीच्या तख्तावर बसणारा तिसरा सुलतान. या घराण्यातील पहिला सुलतान घियासुद्दीन (कार. १३२०-१३२५) याचा भाऊ सिपेहसालार रजब याचा हा मुलगा.
फ्रेंच सत्ता, भारतातील 
फ्रेंच सत्ता, भारतातील : भारतात व्यापाराच्या निमित्ताने डच, पोर्तुगीज, ब्रिटिश इ.यूरोपीय लोकांनी सोळाव्या शतकापासून प्रवेश करण्यास सुरुवात केली. व्यापाराबरोबरच भारतात सत्तासंपादन करण्याचीही स्पर्धा या यूरोपीयांत सुरू झाली [⇨ इंग्रजी अंमल, भारतातील; ⇨ डच सत्ता भारतातील; ⇨ पोर्तुगीज सत्ता, भारतातील ].
भरत 
भरत : ऋग्वेदकाली या देशात भरत नावाचा मानवसमूह होता. ऋग्वेदाच्या तीन, सहा आणि सात या मंडलांमध्ये भरत हा शब्द अनेकदा बहुवचनी आला असून त्याचा अर्थ भरतनामक जनसमूह असा होतो. विश्वामित्र हा मंत्रद्रष्टा भरत गणातलाच होता.
भोसले घराणे 
भोसले घराणे : सतराव्या शतकात उदयास आलेले आणि सत्ताधीश झालेले एक थोर मराठा घराणे. भोसले कुळाच्या मूलस्थानाविषयी तसेच प्राचीन इतिहासाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकापासून (१६७४) भोसले घराण्याचा उदेपूरच्या शिसोदे (राजपूत) कुळाशी संबंध जोडण्यात आला.
भोसले, चतुरसिंग 
भोसले, चतुरसिंग : (? - १५ ऑगस्ट १८१८). उत्तर पेशवाईतील एक तडफदार सेनानी. त्याचे घराणे मूळ शिवाजीच्या वंशातील. मालोजी भोसल्याचा धाकटा भाऊ विठोजी याच्या खापर पणतूचा मुलगा. याचा मोठा भाऊ विठोजी सातारच्या रामराजास १७७७ मध्ये दत्तक गेला.

Comments

Popular posts from this blog

संत मुक्ताबाई

संत जनाबाई

पहिला बाजीराव पेशवा